ई-पीक पाहणी ॲपद्वारे आपल्या शेताच्या बांधावरील झाडे कशी नोंदवावी?
महसूल विभागा मार्फत राज्यात ई-पिक पाहणी या प्रकल्पाद्वारे शेतकऱ्यांना आपला पीक पेरा स्वत: हून नोंदविण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. या मोबाईल ॲपद्वारे शेतकरी आपल्या पिकांच्या नोंदी, बांधावरच्या झाडांच्या नोंदी, व चालू पड / कायम पड क्षेत्राच्या नोंदी अक्षांस व रेखांशासह नोंदविण्याची सोय देण्यात आलेली आहे. ई-पीक पाहणी या मोबाईल ॲपमध्ये आपल्या शेताच्या बांधावरील (Bandavaril Zade E Peek Pahani) झाडे कशी नोंदवावी ? या विषयी सविस्तर माहिती आपण या लेखा मध्ये पाहणार आहोत.
ई-पीक पाहणी ॲप डाउनलोड करा आणि शेताच्या बांधावरील झाडे नोंदवा! Bandavaril Zade E Peek Pahani :
ई-पीक पाहणी ॲप डाउनलोड करून मोबाईल मध्ये इन्स्टॉल करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
https://play.google.com/store/apps/E-Peek Pahani App
ई-पीक पाहणी ॲप मोबाईल मध्ये इन्स्टॉल केल्यानंतर ओपन करून खालील स्टेप्स नुसार आपल्या शेताच्या बांधावरील झाडांची नोंद ई-पीक पाहणी ॲप करा.
१) ई-पीक पाहणी ॲपच्या होम पेजवर असलेल्या बांधावरील झाडे नोंदवा या टॅबवर क्लिक करा.
२) आपण बांधावरील झाडांची नोंदणीसाठीच्या पानावर प्रविष्ठ व्हाल. आपण नोंदणी करत असलेला दिनांक आपोआप दिसेल.
३) त्यानंतर खाते क्रमांक निवडा या वर क्लिक करून हवा असलेला खाता क्रमांक निवडा. त्यानंतर शेताचा गट क्रमांक या वर क्लिक करून हवा असलेला गट क्रमांक निवडा.
४) त्यांनतर बांधावरची झाडे निवडा या पर्यायावर क्लिक करा. आपणास झाडांची यादी दिसेल ती आवश्यकतेप्रमाणे स्क्रोल करून तुम्हाला हव्या असलेल्या झाडाची निवड करा.
५) बांधावरील झाडाचे छायाचित्र घेण्यासाठी कॅमेऱ्याच्या बटनवर क्लिक करा आपला मोबाईल कॅमेरा कार्यान्वित होईल. त्यानंतर बांधावरची झाडे जास्तीत जास्त दिसतील अश्या रीतीने फोटो काढावा व बरोबर च्या बटनवर टिक करावे.
६) त्यानंतर आपण नोंदणी केलेली माहिती दर्शविणारे पेज उघडेल नोंदविलेली माहिती योग्य असल्याची खात्री झाल्यावर त्याखाली दिलेल्या स्वयं घोषणेवर क्लिक करून पुढे जा बटनवर क्लिक करावे.
७) आपण नेटवर्क मध्ये असल्यास आपण नोंदविलेली माहिती सबमिट व अपलोड झाल्याचा संदेश दाखविला जाईल. जर आपण नेटवर्क मध्ये नसाल तर आपणास आपली माहिती सबमिट झाली आहे तथापि इंटरनेट अभावी अपलोड झालेली नाही, आपण नेटवर्क मध्ये आल्यानंतर होम पेज वरील अपलोड पर्याय वापरून माहिती अपलोड करावी.
८) माहितीमध्ये दुरुस्ती करावयाची असल्यास डाव्या कोपऱ्यातील रद्द या बटनवर क्लिक करावे. आपणास परत मागील पानावर नेले जाईल. आवश्यक ते दुरुस्ती करून वर सांगितल्या प्रमाणे प्रक्रिया पूर्ण करावी.
९) शेतकरी बंधुंनो याठिकाणी महत्वाचा मुद्दा लक्षात ठेवा कि या नोंदणीसाठी मोबाईल नेटवर्क ची आवश्यकता नाही, आपण नोंदविलेली माहिती सबमिट बटन वर क्लिक करून साठविली जाईल व मोबाईल नेटवर्कमध्ये आल्यावर ती तुम्ही डॅशबोर्डवर असलेल्या अपलोड टॅबवर क्लिक करून अपलोड करू शकता.
१०) अश्या प्रकारे आपण आपल्या शेताच्या बांधावरील झाडांची नोंद ई-पीक पाहणी ॲपद्वारे सहज रित्या करू शकता. जर तुम्हाला आणखी काही प्रश्न असतील तर ॲप मधील मदत या बटनवर क्लिक करून तिथे दिलेल्या प्रश्न उत्तरामधून आपल्या प्रश्नांचे निराकरण करू शकता. तसेच ई-पीक पाहणी ॲप मधील अभिप्राय नोदवा या टॅबवर क्लिक करून आपला अभिप्राय नोंदवू शकता.
हेही वाचा – ई-पीक पाहणी ॲपद्वारे ७/१२ वर पिकांची नोंदणी ऑनलाईन करा – E Peek Pahani App
वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.
आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी येथे क्लिक करा !!