Balsangopan Yojana : बालसंगोपन योजनेतून या मुलांना मिळणार महिन्याला २,२५० रुपये !
क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले बालसंगोपन योजनेतून (Balsangopan Yojana) एकल पालक असणाऱ्या मुलांना आता २ हजार २५० रुपये मिळतात. या योजनेत पूर्वी १ हजार १०० रुपये मिळत होते. त्यामध्ये वाढ करण्यात आली आहे. विधवा, घटस्फोटित महिला तसेच अनाथ बालकांना ही योजना मिळवण्यासाठी महिला व बालकल्याण विभागाकडे अर्ज करणे आवश्यक आहे.
बालसंगोपन योजनेतून या मुलांना मिळणार महिन्याला २,२५० रुपये ! Balsangopan Yojana:
महिला व एकात्मिक बालविकास विभागाच्या कार्यालयात (पंचायत समिती) कुटुंब संरक्षण अधिकारी यांच्याकडून अर्ज पूर्ण भरून तालुका स्तरावर तपासून घ्यावा व जिल्ह्याच्या ठिकाणी बालकल्याण समितीसमोर मुलांना समक्ष नेऊन फॉर्म जमा करणे आवश्यक आहे. कोरोनानंतर या योजनेच्या लाभार्थ्यांच्या संख्येत वाढ झाली असून राज्यातील असंख्य लाभार्थी या योजनेचा लाभ घेत आहेत.
दरम्यान, या योजनेत सुरवातीला अर्जदारांची गृहचौकशी करण्यात येते. पालकाचे उत्पन्न एक लाख रुपयेपर्यंत असणे आवश्यक आहे. खरोखर गरजू असणाऱ्यास लाभ दिला जातो.
योजने अंतर्गत मिळणारा लाभ:-
बालसंगोपन – (Balsangopan Yojana योजने अंतर्गत प्रती बालक दरमहा देण्यात येणा-या परिपोषण अनुदानात अनुक्रमे रु. ११००/- वरून रू. २२५०/- व स्वयंसेवी संस्थेच्या सहायक अनुदानात रु. १२५/- वरून रु २५०/- अशी वाढ करण्यात आली आहे.
या योजनेअंतर्गत प्राप्त होणाऱ्या अनुदानातून बालकांना अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण, वैद्यकीय सुविधा इ. सुविधा संबंधित कुटुंबांमार्फत पुरविण्यात येतील.
नियम व अटी
१) एकल पालक म्हणजे ज्या मुलांचे आई किंवा वडील वारले आहेत, अशा एक पालक असलेल्या मुलांना, कॅन्सर किंवा एचआयव्ही बाधित दुर्धर आजार असलेल्या पालकांच्या मुलांना, तुरुंगात असलेल्या कैद्यांच्या मुलांना ही योजना मिळते.
२) अशा पालकांच्या कोणत्याही दोन अपत्यांना वयाची १८ वर्षे पूर्ण होईपर्यंत प्रत्येक महिन्याला प्रत्येकी २ हजार २५० रुपये मिळतात. त्यामुळे दोन्ही अपत्यांचे स्वतंत्र फॉर्म भरावेत.
३) घटस्फोटित व परित्यक्ता महिलांच्या मुलांनाही हा लाभ मिळतो. फक्त घटस्फोटित महिलांनी घटस्फोट झाल्याचे कागदपत्रांसह अर्ज करावा तर ज्या महिला पतीपासून विभक्त राहत आहेत, त्यांनी तसे पुरावे व सक्षम अधिकाऱ्यांच्या सहीचे पत्र सादर करावे.
आवश्यक कागदपत्रे:
१) योजनेसाठीचा विहित नमुन्यातील अर्ज. (याचा छापील अर्ज कुटुंब संरक्षण अधिकारी यांच्याकडून घ्यावा)
२) पालकाचे व बालकाचे आधारकार्ड झेरॉक्स.
३) मुलांचे शाळेचे बोनाफाईड सर्टिफिकेट.
४) तहसीलदार यांचा उत्पन्नाचा दाखला.
५) पालकांचे मृत्यू असल्यास मृत्यूचा दाखला.
६) पालकांचा रहिवासी दाखला. (ग्रामपंचायत / नगरपालिका यांचा).
७) मुलांचे बँक पासबुक झेरॉक्स व ते नसल्यास पालकांचे पासबुक.
८) मृत्यूचा अहवाल (कोविडने जर मृत्यू झाला असेल तर मृत्यूचा अहवाल)
९) रेशनकार्ड झेरॉक्स.
१०) घरासमोर पालकांसोबत बालकांचा फोटो. ४ बाय ६ फोटो पोस्ट कार्ड आकाराचा रंगीत फोटो (दोन मुले असल्यास दोन्ही मुलांसोबत पालकांचा स्वतंत्र फोटो)
११) मुलांचे पासपोर्ट आकाराचे तीन फोटो
बालसंगोपन योजनेच्या लाभासाठी अर्ज (Apply for Balsangopan Yojana):
अंगणवाडी सेविका, स्वयंसेवी संस्था, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय, बाल विकास प्रकल्प अधिकारी कार्यालय (नागरी, ग्रामीण आदिवासी) किंवा जिल्हा कार्यक्रम अधिकारी, जिल्हा परिषद या ठिकाणी योजनेचा लाभ मिळण्यासाठी अर्ज करणे आवश्यक आहे.
स्वयंसेवी संस्था व जिल्हा बाल संरक्षण कक्ष यांनी अर्जाची छाननी करून परीपूर्ण अर्ज जिल्हा महिला बाल विकास अधिकारी कार्यालयात सादर करतील.
जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी यांनी सूचित करून दिलेल्या स्वयंसेवी संस्था त्यांच्या कार्यक्षेत्रातील अर्ज जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी यांचेकडे सादर करतील. तसेच इतर कार्यक्षेत्रातील लाभार्थ्यांचे अर्ज अंगणवाडी सेविका मार्फत जिल्हा बाल संरक्षण कक्ष, वन स्टॉप क्रायसिस सेंटर), चाईल्ड लाईन, एकात्मिक बाल विकास प्रकल्प कार्यालय, तालुका स्तरीय संरक्षण अधिकारी (कनिष्ठ) यांचेमार्फत जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय यांच्या कार्यालयात प्रस्ताव पाठवतील.
ग्राम बाल संरक्षण समिती, तालुका बाल संरक्षण समिती व वॉर्ड बाल संरक्षण समिती या ठिकाणी त्यांच्या पातळीवर बालकांचे अर्ज घेऊन प्रत्यक्ष अथवा अंगणवाडी सेविकेमार्फत संबंधित बाल विकास प्रकल्प अधिकारी तसेच जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी यांच्या कार्यालयात सादर करता येतील.
जिल्हा महिला बाल विकास अधिकारी कार्यालय येथे बालसंगोपन (Balsangopan Yojana) लाभासाठी अर्ज प्राप्त झाल्यानंतर गृहभेट व सामजिक तपासणी अहवालाकरिता आदेश मिळण्यासाठी जिल्हा महिला बाल विकास अधिकारी यांनी ०८ दिवसाच्या आत बाल कल्याण समितीकडे प्रस्ताव पाठवतील.
महिला व बाल विकास विभाग शासन निर्णय :
क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले बालसंगोपन (Bal Sangopan Yojana) योजनेच्या सुधारीत मार्गदर्शक सुचनांबाबत शासन निर्णय पाहण्यासाठी इथे क्लिक करा.
वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.
आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी येथे क्लिक करा !!