आयुष्मान भारत जन आरोग्य योजना हेल्थ कार्ड (PMJAY Card) ऑनलाईन आधारकार्डने कसे डाऊनलोड करायचे? जाणून घ्या सविस्तर प्रोसेस
आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना हा भारत सरकारचा राष्ट्रीय सार्वजनिक आरोग्य विमा निधी आहे ज्याचा हेतू देशातील कमी उत्पन्न असलेल्यांना, आर्थिकदृष्ट्या दुर्बल लोकांना (बीपीएल धारकांना) आरोग्य विमा संरक्षण मोफत उपलब्ध करून देणे आहे. साधारणपणे, देशातील तळाचा 50% भाग या योजनेसाठी पात्र आहे.
प्रधानमंत्री आयुष्मान भारत योजनेतील लाभार्थ्यांची निवड सामाजिक-आर्थिक जात गणना (एसईसीसी -2011) च्या आधारे या योजनेतर्गत लाभार्थ्यांची निवड केली जाते. जे व्यक्ती या योजनेत पात्र असतील अशा व्यक्तींना शासकीय खासगी रुग्णालयात ५ लाखांपर्यंत मोफत उपचार केला जाऊ शकतो. आपण या लेखात आयुष्मान भारत जन आरोग्य योजना हेल्थ कार्ड (PMJAY Card) ऑनलाईन आधारकार्डने कसे डाऊनलोड करायचे ते सविस्तर पाहणार आहोत.
आयुष्मान भारत जन आरोग्य योजना हेल्थ कार्ड (PMJAY Card) ऑनलाईन आधारकार्डने डाउनलोड करण्याची प्रोसेस:
आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना हेल्थ कार्ड ऑनलाईन आधारकार्डने डाउनलोड करण्यासाठी खालील आयुष्मान भारत (PMJAY) राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरणाच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्या.
आयुष्मान भारत (PMJAY) राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरणाची अधिकृत वेबसाईट ओपन केल्यानंतर Menu वर क्लिक करा.
पुढे Portals या पर्यायामध्ये Beneficiary Identification System (BIS) या पर्यायावर क्लिक करा.
आता लाभार्थी ओळख प्रणाली पेज ओपन होईल त्यामध्ये Download Ayushman Card या पर्यायावर क्लिक करा.
Download Ayushman Card या पर्यायावर क्लिक केल्यानंतर योजना (Scheme) मध्ये PMJAY सिलेक्ट करून आपले राज्य – महाराष्ट्र निवडा आणि पुढे आपला आधार क्रमांक / व्हर्च्युअल आयडी टाकून चेक बॉक्स मध्ये क्लिक करा, तसेच Generate OTP वर क्लिक करा.
Generate OTP वर क्लिक केल्यानंतर थोडा वेळ थांबा म्हणजे (Button will be enabled after) जे सेकंद स्क्रिन वर दाखवलेत ते संपल्यानंतर OTP टाकून Verify करा.
सूचना: मोबाईल नंबर आधारकार्डला लिंक असणे गरजेचं आहे.
OTP टाकून Verify केल्यानंतर तुम्ही Download Card पर्यायावर क्लिक करून आपले आयुष्मान भारत जन आरोग्य योजना हेल्थ कार्ड ऑनलाईन डाउनलोड करू शकता.
हेही वाचा – आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना लाभार्थी यादी ऑनलाईन कशी पाहायची? जाणून घ्या सविस्तर प्रोसेस
वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.
आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी इथे क्लिक करा !!