आपले सरकार - महा-ऑनलाईनग्राम विकास विभागघरकुल योजनावृत्त विशेषसरकारी योजना

घरकुल योजनेसाठी आवासप्लस अ‍ॅपवर सर्वे-नोंदणी कशी करावी? जाणून घ्या सविस्तर माहिती!

AwaasPlus अ‍ॅपचा उद्देश गृहनिर्माण मदतीसाठी अतिरिक्त वंचित कुटुंबांची ओळख पटवणे आणि त्यांचा समावेश करणे सोपे करणे आहे. घरगुती (AwaasPlus app Survey) सर्वेक्षणासाठी व्यापक एआय-सक्षम फेस ऑथेंटिकेशन तंत्रज्ञान-आधारित अ‍ॅपद्वारे पात्र लाभार्थ्यांची ओळख पटवणे हा एक अत्याधुनिक उपक्रम आहे. हे अ‍ॅप संभाव्य पात्र कुटुंबांची माहिती कॅप्चर करते, ज्यामध्ये सध्याच्या निवासस्थानाचा जिओटॅग केलेला फोटो आणि पीएमएवाय-जी घर बांधण्यासाठी प्रस्तावित जागेचा समावेश आहे.

आवासप्लस अ‍ॅपवर घरकुल योजनेसाठी सर्वे-नोंदणी करण्याची प्रोसेस – Gharkul Yojana AwaasPlus App Survey:

घरकुल योजनेअंतर्गत (PMAY-G) लाभ मिळवण्यासाठी AwaasPlus अ‍ॅपवर नोंदणी करणं अगदी सोपं आहे. घरकुल सर्वे (AwaasPlus app Survey) नोंदणी स्वतः करू शकता (Self-Survey) किंवा सहाय्यक सर्व्हेअरच्या मदतीने (Assisted Survey) सर्वे करू शकता. खाली “Self Survey व Assisted Survey” साठीची प्रक्रिया दिली आहे मोबाईलवरून आपण सहज करू शकता.

१) स्व-सर्व्हे (Self Survey) द्वारे नोंदणी:

घरकुल (Pradhan Mantri Awaas Yojana – Gramin) योजनेअंतर्गत AwaasPlus अ‍ॅपवर स्व-सर्वे (AwaasPlus app Survey) नोंदणी करण्यासाठी AwaasPlus मोबाइल ॲप आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा किंवा Google Play Store वरून AwaasPlus सर्च करून हे अ‍ॅप डाउनलोड करा आणि अ‍ॅप ओपन केल्यावर आपली भाषा निवडा, तसेच लोकेशन व कॅमेरा साठीची परवानगी द्या.

AwaasPlus अ‍ॅप डाउनलोड झाल्यानंतर ओपन केल्यावर कोणता एर्रोर प्रॉब्लेम येत असेल तर आपल्या मोबाईल मध्ये अजून एक ॲप असणे गरजेचे आहे ते म्हणजे “आधार फेस आरडी सेवा ॲप” AadhaarFaceRD हे ॲप डाउनलोड करून ठेवायचे आहे.

लाभार्थी कुटुंबातील सदस्य किंवा अधिकृत प्रतिनिधीद्वारे (AwaasPlus app Survey) स्व-सर्वेक्षण केले जाऊ शकते. अर्जावर प्रवेश करण्यासाठी आधार आधारित ई-केवायसी पडताळणी आवश्यक असेल.

AwaasPlus app Survey Aadhar e-KYC (1)
AwaasPlus app Survey Aadhar e-KYC

पुढे आधार क्रमांक भरून e-KYC करा. समोरच्या कॅमेऱ्याने चेहरा स्कॅन करून प्रमाणीकरण पूर्ण करा आणि चार अंकी पिन सेट करायचा.

आपले राज्य, जिल्हा, तालुका व ग्रामपंचायत निवडा. AwaasPlus अ‍ॅपमध्ये पुढे, नवीन सर्वेक्षण जोडण्याचे (Add Edit Survey), विद्यमान सर्वेक्षण संपादित करण्याचे किंवा पूर्ण झालेले सर्वेक्षण अपलोड करण्याचे पर्याय प्रदर्शित केले जातील.

Add Edit Survey
Add Edit Survey

तुमच्या घराची स्थिती, उत्पन्न, शौचालय उपलब्धता, जातीचा तपशील व इतर माहिती भरा. सर्व माहिती भरून सबमिट करा. यानंतर सर्व्हे (AwaasPlus app Survey) डेटा सरकारकडे पाठवला जाईल.

ग्रामसभेला पडताळणीसाठी यादी पाठवण्यापूर्वी, (AwaasPlus app Survey) सर्वेक्षण केलेल्या कुटुंबाचे जॉब कार्ड तपशील बरोबर आहेत का ते पडताळणे आवश्यक आहे. मनरेगा जॉब कार्डचे प्रमाणीकरण आणि डुप्लिकेशन NREGASoft द्वारे केले जाईल आणि या प्रक्रियेचा निकाल अॅपवर उपलब्ध असेल. ग्रामसभेने पडताळणी केल्यानंतर, यादीची अपील समितीकडून पुनरावलोकन केली जाईल. अपील समितीकडून पडताळणी केल्यानंतरच यादीला अंतिम मान्यता दिली जाईल.

२) सहाय्यक सर्व्हे (Assisted Survey) द्वारे नोंदणी:

ऍपमध्ये नोंदणीकृत मोबाईल नंबर टाका. OTP टाकून लॉगिन करा. फेस ऑथेंटिकेशन करा. लाभार्थ्यांची माहिती गोळा करा व अपलोड करा.

नोंदणीसाठी लागणारी कागदपत्रे:
  1. आधार कार्ड (आवश्यक)
  2. PAN कार्ड (ऐच्छिक, काही वेळा लागतो)
  3. मोबाईल नंबर
  4. घराचा फोटो
  5. शौचालय असल्यास त्याचा फोटो

जर तुम्हाला मोबाईलवरून नोंदणी करताना अडचण येत असेल, तर ग्रामसेवक, सरपंच, किंवा ब्लॉक ऑफिसमध्ये संपर्क करा. कधी कधी सर्वेयर तुमच्या गावात येऊन नोंदणीस मदत करतात — त्यांच्याकडूनही नोंदणी करून घेता येते.

या लेखात, आम्ही घरकुल योजनेसाठी आवासप्लस अ‍ॅपवर (AwaasPlus app Survey) सर्वे-नोंदणी कशी करावी? विषयीची संपूर्ण माहिती दिली आहे. मला आशा आहे की तुम्हाला हा लेख आवडला असेल. तुम्हाला हा लेख आवडला तर नक्की शेअर करा. तुम्हाला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया टिप्पणी द्या.

पुढील लेख देखील वाचा!

  1. ग्रामीण भागातील लाभार्थ्यांची घरकुल यादी ऑनलाईन पोर्टलवर कशी पाहायची? जाणून घ्या सविस्तर !
  2. प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण); लाभार्थ्यांची घरकुल यादी, हप्त्याचा तपशील व FTO ट्रॅकिंग ई. ऑनलाईन चेक करा !
  3. प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा-2 : या लाभार्थ्यांच्या घरकुल अनुदानात 50,000/- रुपये वाढ!
  4. अटल बांधकाम कामगार आवास योजनेंतर्गत जागा खरेदीसाठी १ लाख रूपये अर्थसहाय्य !
  5. शबरी आदिवासी घरकुल योजना – लाभार्थी पात्रता, कागदपत्रे आणि अर्जाचा नमुना
  6. “मोदी आवास” घरकुल योजना
  7. प्रधानमंत्री आवास योजना – ग्रामीण (PMAY-G) ऑनलाइन नोंदणी
  8. यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना – Yashwantrao Chavan Gharkul Yojana
  9. घराचे बांधकाम करताना रस्त्यापासून अंतर हे किती असावे? याबद्दल सविस्तर माहिती!
  10. शासकीय वाळू बुकिंगसाठी ऑनलाईन अर्ज सुरु !
  11. ग्रामपंचायत नमुना ८ चा उतारा (घरठाण उतारा) काढण्यासाठी ऑफलाईन/ऑनलाईन प्रोसेस !
  12. डिजिटल स्वाक्षरीत प्रॉपर्टी कार्ड ऑनलाईन कसे डाउनलोड करायचे? जाणून घ्या सविस्तर !
  13. स्वामित्व योजना म्हणजे काय? प्रॉपर्टी कार्डचे फायदे काय? जाणून घ्या सविस्तर !
  14. जमिनीचा नकाशा ऑनलाईन कसा पाहायचा? जाणून घ्या सविस्तर माहिती
  15. प्रधानमंत्री आवास योजना – शहरी (क्रेडिट लिंक्ड सबसिडी योजना) घरकुल अनुदानाची स्थिती ऑनलाइन कशी तपासायची? जाणून घ्या सविस्तर – PMAY Credit Linked Subsidy Scheme (CLSS Tracker)
  16. प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) २.० सुरु!

वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.

आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी येथे क्लिक करा !!

शेअर करा:
WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Channel Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.