महाराष्ट्र ऑटो-रिक्षा आणि मिटर्ड टॅक्सी चालक कल्याणकारी मंडळाची स्थापना
राज्यात अनेक वर्षांपासून ऑटो-रिक्षा आणि मिटर्ड टॅक्सी चालकांसाठी स्वतंत्र कल्याणकारी मंडळ परिवहन विभागांतर्गत स्थापन करण्याबाबत मागणी करण्यात येत होती. महाराष्ट्रातील ऑटो-रिक्षा आणि मिटर्ड टॅक्सी यांची नोंदणी, बॅज वितरण, निरीक्षण, तपासणी व कर भरणा परिवहन खात्यामार्फत करण्यात येतो. त्यामुळे ऑटो-रिक्षा आणि मीटर्ड टॅक्सी चालकांची अद्ययावत संपूर्ण माहिती (डेटा) परिवहन विभागाकडे उपलब्ध असते. त्यामुळे, परिवहन विभागातंर्गत ऑटो-रिक्षा आणि मिटर्ड टॅक्सी चालक कल्याणकारी मंडळ स्थापन करण्याच्या अनुषंगाने शासन निर्णय निर्गमित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.
महाराष्ट्र ऑटो-रिक्षा आणि मिटर्ड टॅक्सी चालक कल्याणकारी मंडळाची स्थापना शासन निर्णय :-
महाराष्ट्र ऑटो-रिक्षा आणि मिटर्ड टॅक्सी चालक कल्याणकारी मंडळाची स्थापना करण्यास सदर शासन निर्णयान्वये मान्यता देण्यात येत आहे. सदर मंडळाचे मुख्यालय मुंबई येथे असेल.
महाराष्ट्र ऑटो-रिक्षा आणि मिटर्ड टॅक्सी चालक कल्याणकारी मंडळाची रचना पुढीप्रमाणे असेल:-
राज्यस्तरीय कल्याणकारी मंडळ :-
मा. मंत्री (परिवहन) : अध्यक्ष
परिवहन, महाराष्ट्र राज्य, मुंबई : सदस्य
नोंदणीकृत ऑटो-रिक्षा आणि मिटर्ड टॅक्सी चालक यांच्या संघटनेचे प्रतिनिधी (२ सदस्य) : अशासकीय सदस्य
सह/अपर परिवहन, आयुक्त महाराष्ट्र राज्य, मुंबई : सदस्य सचिव
जिल्हास्तरीय कल्याणकारी मंडळ:
प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाच्या कार्यक्षेत्रानुसार व आवश्यकतेनुसार एक किंवा एकापेक्षा जास्त जिल्हास्तरीय कल्याणकारी मंडळ स्थापन करण्यात येतील. या जिल्हास्तरीय मंडळामध्ये पुढीलप्रमाणे सदस्य असतील-
संबंधित जिल्हाधिकारी : अध्यक्ष
पोलीस उपायुक्त (वाहतूक)/अपर पोलीस अधीक्षक : सदस्य
प्रादेशिक परिवहन अधिकारी/उपप्रादेशिक परिवहन अधिकारी : सदस्य
नोंदणीकृत ऑटो-रिक्षा आणि मिटर्ड टॅक्सी चालक यांच्या संघटनेचे प्रतिनिधी : अशासकीय सदस्य
सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी : सदस्य सचिव
विविध कल्याणकारी योजना:
महाराष्ट्र ऑटो-रिक्षा आणि मिटर्ड टॅक्सी चालक कल्याणकारी मंडळाकडून केंद्र शासनामार्फत व राज्य शासनामार्फत राबविण्यात येणा-या पुढील विविध कल्याणकारी योजनांचा लाभ ऑटो-रिक्षा आणि मिटर्ड टॅक्सी चालकांना देण्यात येतील-
१. जीवन विमा व अपंगत्व विमा योजना
२. आरोग्य विषयक लाभ
३. कर्तव्यावर असताना दुखापत झाल्यास अर्थसहाय्य योजना (रु.५०,०००/- पर्यंत)
४. पाल्यांच्या शिक्षणासाठी शिष्यवृत्ती योजना
५. कामगार कौशल्य वृध्दी योजना – इ.
]महाराष्ट्र ऑटो-रिक्षा आणि मिटर्ड टॅक्सी चालक कल्याणकारी मंडळ स्वायत्त व स्वयंपूर्ण व्हावे यासाठी शासनाकडून एकवेळचे अनुदान रुपये ५०.०० कोटी (अक्षरी रक्कम रुपये पन्नास कोटी) उपलब्ध करून देण्यास याद्वारे मान्यता देण्यात येत आहे.
सदर मंडळाच्या कार्यपध्दती/कामकाजाबाबतची नियमावली स्वतंत्रपणे निर्गमित करण्यात येईल.
सदर शासन निर्णय मा. मंत्रिमंडळाच्या दिनांक १६.०३.२०२४ रोजी संपन्न बैठकीमध्ये दिलेल्या मान्यतेच्या अनुषंगाने निर्गमित करण्यात येत आहे.
गृह विभाग शासन निर्णय:
महाराष्ट्र ऑटो-रिक्षा आणि मिटर्ड टॅक्सी चालक कल्याणकारी मंडळाची स्थापना शासन निर्णय पाहण्यासाठी इथे क्लिक करा.
हेही वाचा – आरोग्य विभागातील कंत्राटी कर्मचाऱ्यांना मिळणार सरकारी नोकरी !
वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.
आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी येथे क्लिक करा !!