Ativrushti Nuksan Bharpai Madat : अतिवृष्टी व पूर या नैसर्गिक आपत्तीमधील बाधित नागरिकांना विशेष दराने मदत !
राज्यात उद्भवणाऱ्या विविध नैसर्गिक आपत्तीमध्ये बाधित होणाऱ्या नागरिकांना (Ativrushti Nuksan Bharpai Madat) मदत देण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन अधिनियम, २००५ मधील कलम ४८ (२) अन्वये राज्य आपत्ती प्रतिसाद निधी (SDRF) ची स्थापना करण्यात आली आहे. या निधीमध्ये केंद्र शासनाकडून ७५ टक्के व राज्य शासनाकडून २५ टक्के या प्रमाणे अंशदान दिले जाते. राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून केवळ चक्रीवादळ, दुष्काळ, भूकंप, आग, पूर, त्सुनामी, गारपीट, दरड कोसळणे, बर्फखंड कोसळणे (हिमवर्षाव), ढगफुटी टोळधाड, थंडीची लाट व कडाक्याची थंडी या १२ नैसर्गिक आपत्तीमध्ये बाधित होणाऱ्या नागरिकांना (Ativrushti Nuksan Bharpai Madat) मदत अनुज्ञेय आहे.
अतिवृष्टी व पूर या नैसर्गिक आपत्तीमधील बाधित नागरिकांना विशेष दराने मदत – Ativrushti Nuksan Bharpai Madat:
केंद्र शासनाने विहित केलेल्या १२ नैसर्गिक आपत्ती व्यतिरिक्त राज्य शासनाने शासन निर्णय, महसूल व वन विभाग दि. ३० जानेवारी, २०१४ अन्वये घोषित अवेळी पाऊस, अतिवृष्टी, वीज कोसळणे, समुद्राचे उधाण व आकस्मिक आग तसेच शासन निर्णय, महसूल व वन विभाग दि.२२ जून, २०२३ अन्वये घोषित, सततचा पाऊस या आपत्तीमध्ये बाधित होणाऱ्या नागरिकांना देखील राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या दरानुसार मदत देण्याचे धोरण निश्चित केले आहे. शासन निर्णय, महसूल व वन विभाग दि. २७ मार्च, २०२३ अन्वये राज्य आपत्ती प्रतिसाद निधीचे मदतीचे सुधारित निकष व दर दि.१ नोव्हेंबर, २०२२ पासून लागू करण्यात आले आहेत.
दि. १९ ते २३ जुलै, २०२३ मध्ये राज्यातील काही भागात झालेल्या अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या नागरिकांना पुरेशी मदत (Ativrushti Nuksan Bharpai Madat) व्हावी याकरीता दि. २८ जुलै, २०२३ च्या शासन निर्णयान्वये अट शिथिल करुन विशेष दराने मदत (Ativrushti Nuksan Bharpai Madat) मंजूर करण्यात आली होती. सन २०२४ च्या पावसाळी हंगामामध्ये म्हणजेच जून ते ऑक्टोबर, २०२४ या कालावधीत सुध्दा अतिवृष्टी व पूर यासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित होणाऱ्या नागरीकांना पुरेशी मदत (Ativrushti Nuksan Bharpai Madat) तातडीने मिळावी याबाबत मा. मंत्रिमंडळाच्या दि. ३० जुलै, २०२४ च्या बैठकीत, दि. २८ जुलै २०२३ च्या शासन निर्णयान्वये मंजूर केलेल्या विशेष दरास १ वर्षाने मुदतवाढ देण्याबाबत निदेश देण्यात आले आहेत. त्याअनुषंगाने खालीलप्रमाणे शासनाने निर्णय घेतला आहे.
जून ते ऑक्टोबर, २०२४ या कालावधीतील अतिवृष्टी व पूर या नैसर्गिक आपत्तीमध्ये बाधित होणाऱ्या नागरिकांना विशेष दराने मदत जाहीर शासन निर्णय :-
जून ते ऑक्टोबर, २०२४ या चालू पावसाळी हंगामामध्ये कालावधीत राज्यातील विविध जिल्हयात अतिवृष्टी व पूर यासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या नुकसानीकरिता खालील बाबींकरिता विशेष दराने (Ativrushti Nuksan Bharpai Madat) मदत देण्याचा शासनाने निर्णय घेतला आहे.
अ. क्र. | मदतीची बाब व निकष | राज्य आपत्ती प्रतिसाद निधीचे मदतीचे प्रचलित दर | राज्य आपत्ती प्रतिसाद निधीचे मदतीचे निकष व विशेष दर | मदत निधी देण्यासाठी कार्यपध्दती |
१ | दोन दिवसापेक्षा अधिक कालावधीकरिता क्षेत्र घर पाण्यात बुडालेले असल्यास घरे पूर्णतः वाहून गेली असल्यास / पूर्णतः क्षतीग्रस्त झाली असल्यास | अ) प्रतिकुटुंब रु.२५०० कपड्यांचे नुकसानीकरिता ब) प्रतिकुटुंब रू.२५०० घरगुती भांडी/वस्तु यांच्या नुकसानीकरिता | अ ) प्रतिकुटुंब रु.५००० कपड्यांचे नुकसानीकरिता ब ) प्रतिकुटुंब रु.५००० घरगुती भांडी / वस्तू यांच्या नुकसानीकरिता टिप दोन दिवसापेक्षा दोन अधिक कालावधीकरिता क्षेत्र / घर पाण्यात / घर बुडले असल्याची असल्याची अट शिथिल शिथिल करण्यात येत आहे. | वाढीव दराने होणारा रु.५००० खर्च राज्य शासनाच्या निधीतून म्हणजेच लेखाशिर्ष २२४५ २१९४ मध्ये खर्ची घालण्यात यावा. दोन दिवसापेक्षा अधिक कालावधीकरिता क्षेत्र / घर पाण्यात / बुडले असल्याची अट शिथिल केल्यामुळे द्यावयाच्या मदतीच्या प्रकरणात संपूर्ण निधी (रु.१०,०००) राज्य शासनाच्या निधीतून म्हणजेच लेखाशिर्ष २२४५ २१९४ मध्ये खर्ची घालण्यात यावा. |
२ | दुकानदार | नैसर्गिक आपत्तीमुळे दुकानदारांना द्यावयाच्या मदतीची बाब राज्य आपत्ती निधीमध्ये समाविष्ट नाही. | जे स्थानिक रहिवाशी आहेत, ज्यांचे नाव स्थानिक मतदार यादीत आहे व जे रेशनकार्ड धारक आहेत अशा दुकानदारांपैकी अधिकृत (नोंदणीकृत व महाराष्ट्र दुकाने व आस्थापना अधिनियम १९४८ खालील परवानाधारक) दुकानदार यांना पंचनाम्याच्या आधारे प्रत्यक्ष झालेल्या नुकसानीच्या ७५ टक्के रक्कम किंवा जास्तीत जास्त रु.५०,०००/- पर्यंत आर्थिक मदत देण्यात यावी. | याबाबीसाठी होणारा खर्च राज्य शासनाच्या निधीतून करण्यात यावा. (लेखाशिर्ष २२४५ २३८१ ) |
३ | टपरीधारक | नैसर्गिक आपत्तीमुळे टपरीधारकांना द्यावयाच्या मदतीची बाब राज्य आपत्ती निधीमध्ये समाविष्ट नाही. | जे स्थानिक रहिवाशी आहेत, ज्यांचे नाव स्थानिक मतदार यादीत आहे व जे रेशनकार्ड धारक आहेत अशा टपरीधारकापैकी अधिकृत (नोंदणीकृत व परवानाधारक) टपरीधारक यांना पंचनाम्याच्या आधारे प्रत्यक्ष झालेल्या नुकसानीच्या ७५ टक्के रक्कम किंवा जास्तीत जास्त रु.१०,०००/- पर्यंत आर्थिक मदत देण्यात यावी. | याबाबीसाठी होणारा खर्च राज्य शासनाच्या निधीतून करण्यात यावा. (लेखाशिर्ष २२४५ २३८१) |
मदतीची (Ativrushti Nuksan Bharpai Madat) रक्कम प्रदान करताना संदर्भाधीन शासन निर्णयामध्ये विहित केलेल्या इतर अटी व शर्ती लागू राहतील.
पंचनामे करण्यात आल्यानंतर लाभार्थी निश्चित करण्यात यावेत. त्यानंतरच यासाठी निधी वितरित केल्यानंतर रक्कम आहरित करून लाभार्थ्याच्या बँक खात्यामध्ये हस्तातंरित करावी.
सदर निधी अनावश्यकरित्या आहरित करून बँक खात्यामध्ये काढून ठेवण्यात येवू नये. लाभार्थ्यांना मदत वाटपाची कार्यवाही पुर्ण झाल्यानंतर लाभार्थ्यांची यादी व मदतीचा (Ativrushti Nuksan Bharpai Madat) तपशील जिल्हयांच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात यावा.
वाटप करावयाच्या निधीची अचूक परिगणना करुन बाधितांनाच मदत (Ativrushti Nuksan Bharpai Madat) वाटप होईल व वाटप करावयाच्या निधीची द्विरुक्ती होणार नाही, या अटीच्या अधिन राहून निधी आहरित व वाटप करण्याची संबंधित नियंत्रक अधिकाऱ्यांनी दक्षता घ्यावी.
- अतिवृष्टीची मदत मिळण्यासाठी शेतकऱ्यांनी eKYC करणे अनिवार्य; अन्यथा नुकसान भरपाई मिळणार नाही !
- नैसर्गिक आपत्ती – शेती पिके नुकसान भरपाई अनुदानाची स्थिती ऑनलाईन चेक करा !
महसूल व वन विभाग शासन निर्णय – Ativrushti Nuksan Bharpai Madat GR:
जून ते ऑक्टोबर, २०२४ या कालावधीतील अतिवृष्टी व पूर या नैसर्गिक आपत्तीमध्ये बाधित होणाऱ्या नागरिकांना विशेष दराने मदत जाहीर करण्याबाबत शासन निर्णय पाहण्यासाठी इथे क्लिक करा.
हेही वाचा – नैसर्गिक आपत्ती – शेती पिके नुकसान भरपाईसाठी आधार प्रमाणीकरण ऑनलाईन प्रोसेस – E -Panchnama KYC MahaOnline
वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.
आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी इथे क्लिक करा !!