बांधकाम कामगार कल्याणकारी योजनाघरकुल योजनावृत्त विशेषसरकारी योजना

अटल बांधकाम कामगार आवास योजना – ग्रामीण

महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या ग्रामीण भागातील नोंदीत (सक्रिय ) बांधकाम कामगारांना ग्रामीण भागात स्वत:च्या जागेवर नवीन घर बांधण्यासाठी किंवा अस्तित्वात असलेल्या कच्च्या घराचे पक्क्या घरात रूपांतर करण्यासाठी मंडळामार्फत योजना राबविण्याबाबत आणि सदर योजनेत घरकुल बांधण्यासाठी बांधकाम कामगाराला अर्थसहाय्य देण्याचा ठराव पारित करण्यात आला. त्यास अनुलक्षून ग्रामीण भागातील नोंदीत (सक्रिय) बांधकाम कामगारांना अटल बांधकाम कामगार (ग्रामीण) आवास (Atal Bandkam Kamgar Awas Yojana Rural) योजना राबविण्यात येते.

अटल बांधकाम कामगार आवास योजना – ग्रामीण – Atal Bandkam Kamgar Awas Yojana Rural:

महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडे नोंदीत (सक्रिय) बांधकाम कामगारांपैकी ग्रामीण भागातील नोंदीत (सक्रिय) बांधकाम कामगारांच्या घराच्या अटल बांधकाम कामगार आवास योजनेस ( ग्रामीण ) मंजुरी आणि अर्थसहाय्य देण्यास शासन मान्यता देण्यात येणार आहे. तसेच ग्राम विकास विभागाच्या अधिपत्याखालील संचालक, राज्य व्यवस्थापन कक्ष, ग्रामीण गृह निर्माण कार्यालय, बेलापूर, नवी मुंबई या यंत्रणेमार्फत राबविण्यास शासनाने मांजरी दिली आहे.

योजनेचे स्वरूप :-

महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडे नोंदीत (सक्रिय) बांधकाम कामगारापैकी ग्रामीण भागातील नोंदीत (सक्रिय ) बांधकाम कामगारांसाठी मंजूर अटल बांधकाम कामगार आवास योजनेचे (ग्रामीण) स्वरुप खालील प्रमाणे आहे.

अ) मंडळाकडील नोंदीत (सक्रिय ) बांधकाम कामगारांना ग्रामीण भागात स्वत:च्या /पती /पत्नीच्या नावावरील जागेवर नवीन घर बांधण्यासाठी अथवा अस्तित्वात असलेल्या कच्च्या घराचे पक्क्या घरात रूपांतर करण्यासाठी रू. 1.50 लक्ष अनुदान महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडून उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.

आ) महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या धर्तीवर ( MGNREGA) अनुज्ञेय असणारे रु. 18,000/- तसेच स्वच्छ भारत अभियानद्वारे शौचालय बांधण्यासाठी अनुज्ञेय असलेले रू.12,000/- असे एकूण रु. 30000/- अनुदान रु. 1.50 लक्ष मध्ये समाविष्ट असल्याने संबंधित योजनांचा दुबार लाभ देय राहणार नाही.

घराचे क्षेत्रफळ :-

अटल बांधकाम कामगार आवास योजना ( ग्रामीण ) अंतर्गत पात्र ठरलेल्या बांधकाम कामगारांनी किमान 269 चौ. फुट इतके चटई क्षेत्र असलेले घर बांधकाम करणे आवश्यक आहे. त्याकरिता रु. 1.50 लक्ष एवढे अनुदान देय राहणार आहे. मात्र, लाभार्थ्यास त्यापेक्षा जास्त क्षेत्राचे बांधकाम स्वखर्चाने करण्यास मुभा राहणार आहे.

लाभार्थी पात्रता :-

महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडे नोंदीत (सक्रिय) बांधकाम कामगारांपैकी ग्रामीण भागातील नोंदीत (सक्रिय) बांधकाम कामगारांसाठी अटल बांधकाम कामगार आवास योजनेचा (ग्रामीण ) लाभ प्राप्त कुटुंबासाठी असून त्याचा लाभ घेण्यासाठीची पात्रता खालील प्रमाणे आहे:-

अ) या योजनेचा लाभ घेण्यासाठी बांधकाम कामगार हा नोंदणीकृत (सक्रिय ) असावा तथापि अर्ज करताना तो महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडे सलग एक वर्षापेक्षा अधिक, बांधकाम कामगार म्हणून नोंदणीकृत असावा.

आ) नोंदीत (सक्रिय ) बांधकाम कामगारांचे स्वत:च्या /पती / पत्नीच्या नावावर महाराष्ट्र राज्यात पक्के (व समेंट, वाळूने बांधलेले ) घर नसावे. तशा आशयाचे स्वयंघोषणापत्र / शपथपत्र सादर करणे आवश्यक राहणार आहे.

इ) नोंदीत बांधकाम कामगारास पक्के घर बांधण्यासाठी स्वत:च्या / पती /पत्नीच्या नावे मालकीची जागा असावी अथवा मालकीचे कच्चे घर असलेल्या त्या ठिकाणी घर बांधता येणार आहे.

ई) बांधकाम कामगारानी शासनाच्या इतर कोणत्याही गृहनिर्माण योजनांचा लाभ घेतलेला नसावा. मंडळाकडील देय गृहकर्जावरील व्याज परतावा करीता अनुज्ञेय अर्थसहाय्याचा/ अनुदानाचा लाभ घेतलेला नसावा. याबाबत त्यांनी स्वयंघोषणापत्र / शपथपत्र सादर करणे आवश्यक राहील.

उ) अटल बांधकाम कामगार आवास योजनेचा (ग्रामीण ) लाभ प्रति कुटुंबासाठी आहे.

ऊ) एकदा लाभ घेतल्यानंतर बांधकाम कामगार पुन: या योजनेच्या लाभास पात्र राहणार नाही.

ए) नोंदणीकृत (सक्रिय ) बांधकाम कामगार हा प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीणच्या कायमस्वरुपी प्रतीक्षा यादीमध्ये (PWL) समाविष्ट नसावा.

आवश्यक कागदपत्रे :-

महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडे नोंदीत (सक्रिय ) बांधकाम कामगारांपैकी ग्रामीण भागातील नोंदीत (सक्रिय) बांधकाम कामगारांसाठी अटल बांधकाम कामगार आवास योजनेचा (ग्रामीण ) लाभ घेण्यासाठी विहित अर्जासह खालील कागदपत्र देणे आवश्यक आहे:-

अ) सक्षम प्राधिकाऱ्याने नोंदीत बांधकाम कामगार म्हणून दिलेल्या ओळखपत्राची प्रत

आ) आधारकार्ड – स्वेच्छेने दिलेल्या आधारकार्डाची प्रत.

इ) 7/12 चा उतारा/ मालमत्ता नोंदणी प्रमाणपत्र/ ग्रामपंचायतीमधील मालमत्ता नोंदवहीतील उतारा

ई) लाभधारकाचे स्वत:च्या नावे कार्यरत असलेल्या बचत खात्याच्या पासबुकाची छायांकित प्रत

घराची रचना :-

महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडे नोंदीत (सक्रिय ) बांधकाम कामगारापैकी ग्रामीण भागातील नोंदीत (सक्रिय) बांधकाम कामगारांसाठी अटल बांधकाम कामगार आवास योजनेतील (ग्रामीण ) घराची रचना खालील प्रमाणे आहे.

अ) संपूर्ण बांधकाम विटा, वाळू व सिमेंटचे असणे आवश्यक आहे. घरकुलामध्ये एक स्वयंपाकघर व बैठक हॉल यांचा समावेश असावा. शौचालय व स्नानघर बांधणे अनिवार्य राहील.

आ) जोत्यापासून घराची उंची कमीत कमी 10 फूट असावी.

इ) छतासाठी स्थानिक गरजेनुसार मजबूत लोखंडी किंवा सिमेंट पत्रे अथवा कौलाचा वापर करण्यास मुभा राहील.

ई) घराच्या दर्शनी भागावर मंडळाचे बोधचिन्ह ( लोगो ) लावणे आवश्यक आहे.

जिल्हास्तरीय लाभार्थी निवड समिती:

महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडे नोंदीत (सक्रिय ) बांधकाम कामगारापैकी ग्रामीण भागातील नोंदीत (सक्रिय ) बांधकाम कामगारांसाठीच्या अटल बांधकाम कामगार आवास योजना (ग्रामीण ) अंतर्गत केलेल्या अर्जाची छाननी करण्यासाठी अपर कामगार आयुक्त /कामगार उपायुक्त यांचे अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय लाभार्थी निवड समिती गठीत करण्यात येत असून समितीची रचना व कार्ये खालील प्रमाणे आहे:-

अर्ज करण्याची, त्याची छाननी करण्याची आणि अर्थसहाय्य देण्याची कार्यपद्धती :-

अ) नोंदणीकृत (सक्रिय ) बांधकाम कामगारानी प्रथम जिल्हा कार्यकारी अधिकारी / उप जिल्हा कार्यकारी अधिकारी, महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ यांचेकडे मंडळांनी विहित केलेल्या नमुन्यात अर्ज करावा.

आ) बांधकाम कामगाराकडून प्राप्त झालेल्या अर्जाची छाननी करुन अर्जदाराची पात्रता तसेच अर्जासोबत सादर केलेल्या कागदपत्राची जिल्हास्तरीय लाभार्थी निवड समिती तपासणी करेल व त्यात पात्र झालेल्या बांधकाम कामगाराची अटल बांधकाम कामगार आवास योजनेमध्ये (ग्रामीण ) लाभार्थी म्हणून निवड करेल.

इ) उप जिल्हा कार्यकारी अधिकारी, महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ तथा सदस्य सचिव सनियंत्रण समिती हे सनियंत्रण समितीच्या छाननीत पात्र झालेल्या आणि मंजुरी दिलेल्या बांधकाम कामगारांची तालुका निहाय यादी तयार करतील. सदर यादी सचिव तथा मुख्य कार्यकारी अधिकारी, महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ यांना सादर करतील आणि त्याची प्रत मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद तथा अध्यक्ष, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा व प्रकल्प संचालक, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा यांना उपलब्ध करुन देतील.

ई) सचिव तथा मुख्य कार्यकारी अधिकारी, महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ हे ग्राम विकास विभाग यांच्या अधिपत्याखालील संचालक, राज्य व्यवस्थापन कक्ष, ग्रामीण गृह निर्माण विभाग, नवी मुंबई यांचेकडे पात्र बांधकाम कामगार यांचे घरकुल बांधकामा पोटी निधी वर्ग करतील.

उ) घराच्या बांधकामाच्या प्रगतीनुसार संचालक, राज्य व्यवस्थापन कक्षाकडून टप्प्या टप्प्याने ठरवुन दिलेले बांधकाम पूर्ण झाल्याची खात्री झाल्यानंतर सार्वजनिक आर्थिक व्यवस्थापन प्रणाली (PFMS) प्रणालीद्वारे बांधकाम कामगारांच्या खात्यावर अनुदान वर्ग करण्यात येणार आहे.

ऊ) योजनेअंतर्गत उपलब्ध करुन दिलेल्या अनुदानातून 4% एवढी रक्कम राज्य व्यवस्थापन कक्ष- ग्रामीण गृहनिर्माण कार्यालयास प्रशासकीय खर्चासाठी देय राहणार आहे.

अटल बांधकाम कामगार आवास योजना (ग्रामीण) आर्थिक योजनेचा लाभ मिळणेसाठी नमुना अर्ज इथे क्लिक करून डाउनलोड करा.

खालील लेख देखील वाचा !

  1. बांधकाम कामगार कल्याणकारी योजना आणि बांधकाम कामगार ऑनलाईन नोंदणी कशी करायची जाणून घ्या सविस्तर
  2. बांधकाम कामगार लाभार्थी यादी ऑनलाईन पहा आणि लाभार्थी यादी मध्ये नाव नसेल तर नोंदणीची स्थिती जाणून घेऊन अशी करा (Bandhkam Kamgar Nondani) नोंदणी अपडेट!
  3. बांधकाम कामगाराने मागील वर्षभरात ९० दिवस काम केल्याचे प्रमाणपत्र देऊन नोंदणी करणेबाबत शासन नियम
  4. अटल बांधकाम कामगार आवास योजनेंतर्गत जागा खरेदीसाठी १ लाख रूपये अर्थसहाय्य !
  5. नोंदणी केलेल्या बांधकाम कामगारांसाठी आरोग्य योजना
  6. बांधकाम कामगार कल्याणकारी योजनांचा लाभ मिळवण्यासाठी ऑनलाईन मागणी अर्ज (Online Claim) कसा करायचा जाणून घ्या सविस्तर

वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.

आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी इथे क्लिक करा !!

शेअर करा:
WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Channel Join Now

One thought on “अटल बांधकाम कामगार आवास योजना – ग्रामीण

  • Jalil Shaikh moheddin

    Mye jalil Shaikh moheddin mera registration 2018 tu 2024 mera kard aabhi active hai fhir bhi mujhe bhade aabhi Tak nahi diye

    Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.