आशा स्वयंसेविकांची संपूर्ण माहिती – नियुक्ती प्रक्रिया, प्रशिक्षण, मानधन आणि जबाबदाऱ्या/कामे
राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानाअंतर्गत ग्रामस्तरावर आरोग्य सुविधा पुरविण्यासाठी आशा (Asha Swayamsevika) चा उपयोग होतो. ग्रामीण जनता व आरोग्य केंद्र यांच्यामध्ये आशा या मध्यस्थीचे काम करतात. बिगर-आदिवासी भागात 1500 लोकसंख्येमागे एक आशा तर आदिवासी भागामध्ये 1000 लोकसंख्येमागे एक आशा नियुक्त करण्यात आली आहे.
ग्रामीण भागातील लोकांना स्वच्छता, लसीकरण यांचे महत्व पटवून देण्यासाठी त्याचप्रमाणे ताप, हगवण, लहान-मोठया जखमा यावरील प्राथमिक स्वरुपाचे उपचार करण्यासाठी त्यांना प्रशिक्षण देण्यात येते. तसेच DOTS, Folic Acid आणि Chloroquin सारख्या इतरही गोळयांचे वाटप करण्याची कामे आशा (Asha Swayamsevika) मार्फत केली जातात. त्याचप्रमाणे आरोग्यविषयक गंभीर परिस्थिती निर्माण झाल्यास त्याची माहिती संबंधित यंत्रणेला देण्याची जबाबदारीही आशा वर असते. ग्रामीण भागातील आशा या स्वयंसेवक पध्दतीने जरी काम करीत असल्या तरी त्यांच्या कामगिरीबद्दल त्यांना प्रोत्साहनपर वेतन/भत्ते देण्याची तरतूद करण्यात आली आहे. याद्वारे आशाना (Asha Swayamsevika) एक प्रकारचा रोजगारच उपलब्ध करुन दिला जातो.
आशा स्वयंसेविकांची संपूर्ण माहिती – Asha Swayamsevika:
ग्रामीण महिलांना सुखरुप प्रसुती, स्तनपान, लसीकरण, गर्भप्रतिबंधक उपाययोजना, जननेद्रीयांशी संबंधित जंतुसंसर्ग, लैगिंक संबंधातुन होणारे जंतुसंसर्ग, नवजात अर्भकाची काळजी इ. आरोग्यविषय बाबींसंबंधी मदत व मार्गदर्शन करण्यास आशा (Asha Swayamsevika) सदैव तत्पर असतात.
आशा ची ठळक वैशिष्टये:-
१. आरोग्यविषयक सामाजिक कार्यकर्ता म्हणुन आशा ओळखल्या जातात.
२ . समाजात आरोग्य विषयक कोणतेही प्रश्न उदभवल्यास प्रथम आशा ला कळवले जाते.
३. समाजात आरोग्य विषयक जागरुकता निर्माण करण्याचे काम आशा मार्फत केले जाते.
४. आरोग्य विषयक सेवा चालना देण्याचे काम ही आशा मार्फत केले जाते.
५. राज्यातील १५ आदिवासी व ३१ बिगर -आदिवासी जिल्हयांमध्ये आशा कार्यरत आहेत.
६. आशा ला मिळणारे प्रोत्साहनपर वेतन/भत्ते हे तिच्या कार्य (दर्जा) करण्यावर अवलंबून आहे.
७. ग्राम आरोग्य पोषण पाणीपुरवठा व स्वच्छता समितीची सदस्य सचिव अंगणवाडी सेविकेऐवजी आशा स्वयंसेविका (Asha Swayamsevika) असतात.
ASHA ची नियुक्ती:-
आदिवासी क्षेत्र:-
१. आदिवासी क्षेत्रात प्रत्येक १००० लोकसंख्येमागे १ आशा .
२. आदिवासी क्षेत्रात कार्य करणा-या आशा चे किमान ८ वी पर्यंत शिक्षण झालेले असावे.
३. आदिवासी क्षेत्रात काम करणा-या आशा २०-४५ वयोगटातील असाव्यात.
४. आदिवासी क्षेत्रात काम करणारी आशा ही स्थानिक विवाहीत असावी.
५. उच्च शिक्षित महिलांना प्राधान्य देण्यात येते.
बिगर-आदिवासी क्षेत्र:-
१. बिगर -आदिवासी क्षेत्रात प्रत्येक १५०० लोकसंख्ये मागे १ आशा असते.
२. बिगर -आदिवासी क्षेत्रात कार्य करणा-या आशा चे किमान १० वी पर्यंत शिक्षण झालेले असावे. उच्च शिक्षित महिलांना प्राधान्य देण्यात येते.
३. बिगर-आदिवासी क्षेत्रात काम करणा-या आशा २५ – ४५ वयोगटातील असव्यात.
४. बिगर -आदिवासी क्षेत्रात काम करणारी आशा ही स्थानिक विवाहीत असावी.
नियुक्ती प्रक्रिया:-
१. आशाची (Asha Swayamsevika) निवड ग्रामपंचायतीमार्फत ग्रामसभा बोलावून करण्यात येते. ग्रामसभेने निवडलेल्या आशाची नियुक्ती तालुका आरोग्य अधिकारी यांच्यामार्फत करण्यात येते.
२. आदिवासी क्षेत्रात ग्रामसभा किंवा ग्राम आरोग्य, पोषण, पाणीपुरवठा व स्वच्छता समितीकडून ५ आशांची निवड करण्यात येते. त्यापैकी तालुका आरोग्य अधिकारी यांचेकडून एका आशा स्वयंसेविकेची निवड करण्यात येते व तालुका आरोग्य अधिकारी यांच्या स्वाक्षरीने निवडलेल्या आशा स्वयंसेविकेस नियुक्ती पत्र देण्यात येते.
३. बिगर आदिवासी क्षेत्रात ग्राम आरोग्य, पोषण, पाणीपुरवठा व स्वच्छता समितीचे अध्यक्ष, ग्रामसेवक, वैद्यकिय अधिकारी यांची समिती आशा स्वयंसेविका (Asha Swayamsevika) पदाकरिता प्राप्त अर्जाची छाननी करुन ग्रामसभेत ३ अर्ज सादर करेल व ग्रामसभा ३ अर्जापैकी एका अर्जदार महिलेची निवड आशा स्वयंसेविका (Asha Swayamsevika) म्हणून करेल.
४ आशा ची नियुक्ती झाल्याचे नियुक्ती पत्र तालुका आरोग्य अधिका-यामार्फत निर्गमित केले जाते.
आशाला मदत करणारी यंत्रणा:-
१. एका जिल्हयासाठी १ जिल्हा समूह संघटक (DCM).
२. एक आदिवासी भागासाठी १ तालुका समूह संघटक (BCM) .
३. आदिवासी भागात प्रत्येक १० आशासाठी १ गटप्रवर्तक (BF) .
४. बिगर-आदिवासी भागात प्रत्येक PHC साठी १ गटप्रवर्तक .
प्रशिक्षण:-
१. ग्रामसभेद्वारा निवड झाल्यानंतर व तालुका आरोग्य अधिका-यामार्फत नियुक्ती पत्र मिळाल्यानंतर आशा (Asha Swayamsevika) प्रशिक्षणासाठी पात्र ठरते.
२. आशा स्वयंसेविकेची नियुक्ती झाल्यानंतर आशा स्वयंसेविकेच्या प्रशिक्षणाचे एकूण ५ टप्पे आहेत, आशा स्वयंसेविकेला सात दिवसांचे मूलभूत प्रशिक्षण देण्यात येते व तिला सर्वसमावेशक अशी प्रशिक्षण पुस्तिका देण्यात येते.
३. आशाच्या नियुक्तीनंतर २३ दिवसांचे प्रशिक्षण ५ टप्यात दिले जाते.
४. आशा स्वयंसेविकेस Induction मॉडयुल व H.B.N.C चे प्रशिक्षण दिले जाते.
५. आशा स्वयंसेविकेस वेळोवेळी मासिक सभा आयोजित करुन तिला प्रशिक्षण दिले जाते.
६. प्रशिक्षणाचे वेळी तिला प्रवासभत्ता व दैनिक भत्ता रु. १००/- देण्यात येतो.
७. आशा प्रशिक्षणापुर्वी प्रत्येक जिल्हयांने निश्चित केलेल्या संख्येनुसार प्रशिक्षकांचे प्रशिक्षण जिल्हास्तरावर दिले जाते. तद्नंतरच आशा स्वयंसेविकेच्या प्रशिक्षणास प्रारंभ केला जातो.
८. प्रशिक्षणाला हजर राहील्या नंतरच आशा प्रोत्साहनपर वेतन/भत्ता प्राप्तीसाठी पात्र ठरते.
“आशा” स्वयंसेविका आधारभूत यंत्रणाः –
आशा स्वयंसेविकेच्या (Asha Swayamsevika) कार्यप्रणालीस गती येण्याकरिता, कार्याचे मूल्यांकन, व्यवस्थापनाकरिता जिल्हा पातळीवर १ जिल्हा समूह संघटक व आदिवासी क्षेत्रात प्रत्येकी १० आशा स्वयंसेविकेस एका गटप्रवर्तकांची नेमणूक करण्यात आलेली आहे तर बिगर आदिवासी क्षेत्रात एका प्राथमिक आरोग्य केंद्रास एका गटप्रवर्तकांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. आदिवासी क्षेत्रात १५ व बिगर आदिवासी क्षेत्रात १८ जिल्हा समूह संघटक कार्यरत आहेत. आदिवासी क्षेत्रात ९२८ व बिगर आदिवासी क्षेत्रात १४२५ गट प्रवर्तक कार्यरत आहेत.
(Block Facilitator) गट प्रवर्तकाच्या भूमिका आणि जबाबदाऱ्याः
१. गट प्रर्वतकाने (Block Facilitator) आशा स्वयंसेविका (Asha Swayamsevika) व आरोग्य विभाग यांच्यामध्ये समन्वय साधणे उदा. ए.एन.एम., एल एच व्हि., अंगणवाडी सेविका, आय. सी. डी. एस. सुपरव्हायजर इ.
२. आशा स्वयंसेविकांना (Asha Swayamsevika) येणाऱ्या अडचणी समजून घेणे तसेच आशांना त्यांच्या जबाबदाऱ्यांची जाणीव करून देणे व अडचणी सोडविणे.
३.आशा स्वयंसेविकांना (Asha Swayamsevika) त्यांच्या कामाचा मोबदला वेळेवर मिळावा म्हणून पाठपुरावा करणे.
४. आशा स्वयंसेविकेला देण्यात येणाऱ्या प्रशिक्षण पुस्तिका १, २, ३, ४, ५ ला आवश्यकतेप्रमाणे उपस्थित राहुन गाव भेटी दरम्यान झालेल्या प्रशिक्षणाची उजळणी घेणे.
५. प्रत्येक आशा स्वयंसेविकेला गट प्रवर्तक महिलेने महिन्यातून दोन भेटी देणे गरजेचे आहे.
६. आशा स्वयंसेविकेच्या प्राथमिक आरोग्य केंद्र आणि तालूका सभेस उपस्थित राहणे व मार्गदर्शन करणे.
७. आशा स्वयंसेविकेचा गावपातळीवर समन्वय साधण्यासाठी सरपंच, उपसरपंच, पोलिस पाटील, तंटामुक्तीचे अध्यक्ष, सहनियंत्रण समितीचे अध्यक्ष यांना भेटून आशा स्वयंसेविकेच्या भूमिकेविषयी माहिती देणे.
आशा स्वयंसेविका – भूमिका व जबाबदाऱ्या/कामे:
१. गाव पातळीवरील आरोग्य नियोजन
२. लोकांच्या आरोग्य संदर्भात वागणुकीतील बदलांसाठी सुसंवाद
३. अंगणवाडी कार्यकर्ती, दाई, आरोग्यसेविका, आरोग्य सेवक यांच्याशी समन्वय ठेवणे.
४. समुपदेशन
५. रुग्णास रुग्णालयात पोहचविण्यास सहाय्य करणे.
६. ग्राम आरोग्य पोषण दिनामध्ये सहकार्य.
७. पो होल्डर (औषधी साठा ठेवणे)
८. कॉर्ड व नोंदी ठेवणे.
९. आरोग्य संस्थेतील प्रसुतीमध्ये वाढ करणे.
१०. मलेरिया, क्षयरोग, साथीचे रोग उपचारासाठी मदत.
११. मोफत संदर्भ सेवेचा प्रचार.
१२. कुटूंब कल्याण प्रचार, गर्भनिरोधकाचे वाटप.
१३. साध्या (किरकोळ) आजारावर उपचार उदा. ताप, खोकला, यावर औषधी संचातील औषंधाचा वापर.
१४. माता व बालआरोग्यविषयी प्रबोधन उदा. प्रसूतीपूर्ण तपासणी, लसीकरण, स्तनपान, लोहयुक्त गोळया, आहार इ.
१५. जन्म व मृत्यू नोंदणीमध्ये मदत.
आशा स्वयंसेविका कार्यमीमांसा:
१. आरोग्य संवर्धन, उपचारात्मक उपाययोजना, विविध प्रतिबंधक, समाजात जाणीव व जागृती वृध्दिंगत करणे.
२. आरोग्य सेवांचा लाभ घेण्याकरिता जनतेला प्रोत्साहित करणे.
३. आरोग्य बाबतीत लोकांमध्ये मानसिक व सामाजिक परिवर्तन घडवून आणणे.
४. गावपातळीवर आरोग्य नियाजनात स्वतः सहभागी होऊन कार्य करणे. समुपदेशन करणे, अंगणवाडी कार्यकर्ती, दाई, आरोग्य सेविका, आरोग्य सेवक, यांच्याशी समन्वय प्रस्थापित करणे.
५. रुग्णास रुग्णालयात पोहोचविण्यासाठी सहाय्य्य करणे.
६. प्राथमिक वैद्यकीय सेवा पुरविणे औषधोपचार करणे.
७. प्रत्येक जन्माची व उपजत मृत्यूची नोंद ठेवणे, आपण केलेल्या कामाची रजिस्टरमध्ये रेकॉर्ड व नोंद ठेवणे.
कामावर आधारित मानधन:-
१. आशा ला दिले जाणारे कामावर आधारित मोबदला तिच्या कार्यकुशलतेवर अवलंबून असतो.
२. आशा च्या कार्याची नोंद एका नोंदवहीत घेतली जात असुन तिच्या कार्यकुशलतेनुसार (दर्जानुसार) तिला प्रोत्साहनपर वेतन/भत्ते दिले जातात.
३. आशा ला मिळणारे कामावर आधारित मोबदला हे महिन्यातुन एकदा होणा-या बैठकीच्यावेळी PHC स्तरावर दिले जातात.
४. आशा ला दिले जाणारे कामावर आधारित मोबदला हे धनादेशाच्या स्वरुपात दिले जातात.
आशा स्वयंसेविकेस खालीलप्रमाणे कामाचा मोबदला देण्यात येतोः
क्र. | कामाचा प्रकार | निधीची तरतूद | आशा स्वयंसेविकेस अदा करावयाचा मोबदला |
१ | जननी सुरक्षा योजनंतर्गत गरोदर मातांना संस्थात्मक (प्रसुतीसाठी प्रवृत्त केल्यास (आदिवासी व बिगर आदिवासी क्षेत्रात) | आर.सी.एच. | आदिवासी जिल्ह्यांतील आदिवासी क्षेत्रासाठी रु. ६००/- |
बिगर आदिवासी क्षेत्रासाठी रु. २००/- | |||
२ | स्त्री शस्त्रक्रियेस प्रवृत्त केल्यास | आर.सी.एच. | रु. १५०/- |
३ | पुरुष शस्त्रक्रियेस प्रवृत्त केल्यास | आर.सी.एच. | रु. २००/- |
४ | क्षयरोग्याला डॉटसचा औषधोपचार | आर.एन.टि.सी.पी. | रु. २५०/- |
५ | हिवतापाचा समुळ उपचार | राष्ट्रीय किटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रम | रु. ५/- |
रु. २०/- | |||
रु. ५०/- | |||
६ | कुष्ठरोग औषधोपचार | एन.एल.ई.पी. | रु. १००/- |
एन.एल.ई.पी. | रु. ४००/- | ||
एन.एल.ई.पी. | रु. २००/- | ||
७ | साथरोग उद्रेक नियंत्रण | मिशन (फलेक्सीपुल) | रु. १००/- |
८ | साथरोग नियंत्रण (जलशुष्कता) | मिशन (फलेक्सीपुल) | रु. ४०/- |
९ | गरोदर मातांची एचआयव्ही तपासणी | मिशन (फलेक्सीपुल) | रु. २०/- |
१० | एचआयव्हीबाधित मातेची प्रसुती | मिशन (फलेक्सीपुल) | रु. ७५०/- |
११ | प्रसुतीनंर एचआयव्हीबाधित मातेची ६ व्या आठवड्यात, ६ व्या महिन्यात व १८ व्या महिन्यात तपासणी | मिशन (फलेक्सीपुल) | रु. ५००/- |
१२ | ग्रामपातळीवरील दरमहा बाह्य संपर्क लसीकरण | नियमित लसीकरण | रु. ७५/- |
१३ | बाह्य संपर्क लसीकरण त्रैमासिक सभा (वर्षातून ४ वेळा) | नियमित लसीकरण | रु. ७५/- |
१४ | शौचालय बांधकाम | पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग | रु. ५०/- |
१५ | जन्माची सूचना | मिशन (फलेक्सीपुल) | रु. १०/- |
१६ | जन्माची नोंदणी | मिशन (फलेक्सीपुल) | रु. २५/- |
१७ | ० ते ५ वयोगटातील मृत्यूची सूचना / माहिती | मिशन (फलेक्सीपुल) | रु. ७५/- |
१८ | १५ ते ४९ वयोगटातील महिलेच्या मृत्यूची सूचना | मिशन (फलेक्सीपुल) | रु. १००/- |
१९ | १५ ते ४९ वयोगटातील मृत महिला माता असल्यास | मिशन (फलेक्सीपुल) | रु. ५००/- |
२० | वार्षिक लसीकरण | मिशन (फलेक्सीपुल) | रु. १०००/- |
मिशन (फलेक्सीपुल) | रु. ७५०/- | ||
२१ | गंभीर आजारी बालकास संदर्भ सेवा (आदिवासी भागात) | आर.सी.एच. २ | रु. ५०/- |
२२ | सिकलसेल नियंत्रण् कार्यक्रम (अमरावती, धुळे, नांदेड, अकोला, वाशिम, बुलढाणा, औरंगाबाद, जळगांव, रायगड) | सिकलसेल निधी | प्रती ग्रामसभा रु. ५०/- |
प्रती बैठक रु. ४०/- | |||
प्रती चाचणी रु. ५/- | |||
प्रती कार्ड रु. २०/- | |||
प्रती भेट रु. १५/- | |||
२३ | मोतिबिंदू शस्त्रक्रिया | एन.पी.सी.बी. | रु. ७५/- |
२३ | मोतिबिंदू शस्त्रक्रिया | एन.पी.सी.बी. | रु. १००/- |
आशा स्वयंसेविकांची ऑनलाईन यादी:
महाराष्ट्र राज्याच्या आशा (Asha Swayamsevika) स्वयंसेविकांची ऑनलाईन यादी पाहण्यासाठी, तसेच, गावातील ग्रामसेवक, आरोग्य सेविका आणि इतर कर्मचाऱ्यांची यादी पाहण्यासाठी इथे क्लिक करा.
पुढील लेख देखील वाचा!
- आशा स्वयंसेविका (Asha Swayamsevika), अंगणवाडी सेविका, गट प्रवर्तकांना अपघाती मृत्यूसाठी 10 लाख, अपंगत्वासाठी 5 लाख !
- अंगणवाडी सेविकांची संपूर्ण माहिती – नियुक्ती प्रक्रिया, पात्रता, अटी व शर्ती!
- ग्राम रोजगार सेवकांची कर्तव्य व जबाबदाऱ्या आणि त्यांच्या नियुक्तीच्या संदर्भात मार्गदर्शक सूचना
वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.
आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी इथे क्लिक करा !!
Very good information thank you