वृत्त विशेषकृषी योजनाजिल्हा परिषदमहाराष्ट्र ग्रामपंचायतमहाराष्ट्र पंचायत समितीसरकारी योजना

शेतकऱ्यांसाठी “अर्ज एक योजना अनेक”, महाडीबीटी पोर्टल योजना – MahaDBT Portal Scheme

कृषि विभागाच्या सर्व योजनांचा लाभ एकाच अर्जाद्वारे मिळण्यासाठी शेतकरी बांधवांनी महा-डीबीटी पोर्टलवर अर्ज सुरू झाले आहेत. सर्व शेतकऱ्यांनी लवकरात लवकर अर्ज भरून घ्या. शेतकऱ्यांच्या सोयीकरिता महा-डीबीटी पोर्टलवर “शेतकरी योजना” या सदराखाली सर्व योजनांचा लाभ “एकाच अर्जाद्वारे” देण्याच्या दृष्टीने अर्ज करण्यापासून ते प्रत्यक्ष लाभ मिळेपर्यंत एकात्मिक संगणकीय प्रणाली विकसित केली आहे. त्याद्वारे शेतकऱ्यांना त्यांच्या पसंतीच्या बाबींच्या निवडीचे स्वातंत्र्य देण्यात आले असून त्यांनी शेती निगडीत विविध बाबींकरिता अर्ज या पोर्टलवर करायचा आहे.

शेतकऱ्यांसाठी “अर्ज एक योजना अनेक”, महाडीबीटी पोर्टल योजना – MahaDBT Portal Scheme:

योजनांचा लाभ घेण्यासाठी शेतकरी बांधवांनी आपला मोबाईल क्रमांक आधार कार्डशी संलग्न करणे आवश्यक आहे. https://mahadbt.maharashtra.gov.in/ या संकेतस्थळाला भेट दिल्यानंतर “शेतकरी योजना” हा पर्याय निवडावा.

शेतकरी मोबाईल, संगणक/लॅपटॅाप/टॅबलेट, सामुदायिक सेवा केंद्र (CSC), ग्रामपंचायतीतील आपले सरकार केंद्र इ. माध्यमातून या संकेतस्थळावर अर्ज करू शकतात.

वैयक्तिक लाभार्थी” म्हणून नोंदणी करू इच्छिणाऱ्यांनी त्यांचा आधार क्रमांक या संकेतस्थळावर प्रमाणित करून घ्यावा.

ज्या वापरकर्त्याकडे आधार क्रमांक नसेल त्यांनी प्रथम आधार नोंदणी केंद्राकडे जाऊन त्यांची नोंदणी करावी व हा नोंदणी क्रमांक महा-डीबीटी पोर्टलमध्ये नमूद करून त्यांना योजनांसाठी अर्ज करता येईल.

अशा अर्जदारांना अनुदान वितरीत करण्यापूर्वी महा-डीबीटी पोर्टलमध्ये त्यांना देण्यात येणारा आधार क्रमांक नोंदणीकृत करून प्रमाणित करून घ्यावा लागेल, त्याशिवाय त्यांना अनुदानाचे वितरण करण्यात येणार नाही.

सूचना:-

  • कृपया आपला वर्तमान मोबाइल नंबर आपल्या आधार क्रमांकाशी जोडलेला आहे याची खात्री करा
  • आपले नोंदणीकृत वापरकर्तानाव प्रविष्ट करा
  • आपला संकेतशब्द प्रविष्ट करा
  • प्रतिमेत दाखविलेले सुरक्षा मजकूर प्रविष्ट करा
  • लॉगिन पासवर्ड आणि सुरक्षा मजकूर पुष्टी झाल्यानंतर लॉगिनसाठी लॉग इन करा बटणावर क्लिक करा
  • जर रजिस्ट्रेशन करताना आपण आपला पासवर्ड विसरला असल्यास, “पासवर्ड विसरला” बटणावर क्लिक करा
  • जर रजिस्ट्रेशन करताना आपण आपला वापरकर्ता नाव विसरला असल्यास, “वापरकर्ता नाव विसरला” बटणावर क्लिक करा.

शेतकऱ्यांसाठी “अर्ज एक योजना अनेक”- महाडीबीटी पोर्टल वर विविध योजना:

सर्व शेतकरी बांधवांना सूचना करण्यात येते की, कृषि यांत्रिकीकरण व प्रधानमंत्री कृषि सिंचन योजनेंतर्गत ट्रॅक्टर, ट्रॉली, पॉवर टिलर, पॉवर विडर, रोटाव्हेटर, कल्टीव्हेटर, पेरणी यंत्र, सर्व पिकांचे लागवड यंत्र, चाफकटर, नांगर, फवारणी यंत्र, रिपर, जमीन सपाटीकरण यंत्र, खोडवा कटर, पाचट कट्टी यंत्र, मल्चर, मळणी यंत्र, डाळ मिल, सोलार ड्रायर, इतर विविध शेती औजारे, ठिबक सिंचन संच, तुषार सिंचन संच, कांदाचाळ, शेडनेट, पॉलीहाऊस, रायपनिंग चेंबर, कोल्ड स्टोरेज, शेततळे अस्तरीकरण इ. बाबींचा अनुदानावर लाभ घेण्यासाठी आपले नजीकचे महा ई सेवा केंद्र, कॉमन सर्व्हिस सेंटर, येथे किंवा ऑनलाईन “महाडीबीटी” या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज भरावेत. महाडीबीटी पोर्टल वरील योजना प्रभावीपणे राबविणेसाठी राज्यशासनाने परिपत्रक जारी केले आहे.

फलोत्पादन योजने अंतर्गत:

  • कांदा चाळ
  • पॅक हाऊस
  • जुन्या फळबागांचे पुनरुज्जीवन
  • फळबागांना आकार देणे
  • फळबाग लागवड
  • मधुमक्षिकापालन
  • हरितगृह
  • शेडनेट हाऊस
  • प्लास्टिक मल्चिंग

भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजने अंतर्गत:

  • आंबा लागवड
  • डाळिंब लागवड
  • मोसंबी लागवड
  • पेरू लागवड
  • सिताफळ लागवड
  • इतर फळबाग लागवड योजना
  • शेततळ्यातील पन्नी
  • सामायिक शेततळे

कृषी यांत्रिकीकरण योजने अंतर्गत

  • ट्रॅक्टर
  • ट्रॅक्टर व पावर ट्रेलर चलित अवजारे
  • प्रक्रिया संच
  • पावर टिलर
  • बैलचलित अवजारे
  • मनुष्य अवजारे
  • स्वयंचलित अवजारे
  • कल्टीवेटर
  • कापणी यंत्र
  • नांगर
  • पेरणी यंत्र
  • मल्चिंग यंत्र
  • मळणी यंत्र
  • रोटावेटर
  • वखर

आवश्यक कागदपत्रे

  • ७/१२ उतारा
  • ८ अ उतारा
  • बॅक पासबुक
  • आधारकार्ड

पोर्टलवरील प्राप्त अर्जांची ऑनलाईन लॉटरी, पूर्व संमती देणे, मोका तपासणी तसेच निवड झालेल्या लाभार्थ्याच्या खात्यावर थेट अनुदान वितरण करणे इ. सर्व प्रक्रिया ऑनलाईन होणार आहे. महाडीबीटी पोर्टलवर माहिती भरण्याची कार्यवाही सुरु झाली असून यापूर्वी अर्जदारांनी माहिती भरली असल्यास त्यांना नव्याने भरण्याची आवश्यकता नाही. मात्र लाभाच्या घटकांमध्ये शेतकरी त्यांना हवा तसा बदल करू शकतात. ज्यांनी अद्याप महा डीबीटी पोर्टलवर अर्ज केला नसेल, त्यांनी लवकरात लवकर अर्ज भरून घ्या.

महाडीबीटी पोर्टल: https://mahadbt.maharashtra.gov.in/

महाडीबीटी शेतकरी मोबाईल अ‍ॅप: महाडीबीटी शेतकरी अ‍ॅप मोबाईल मध्ये डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा.

ऑनलाईन अर्ज प्रक्रियेसाठी सूचना: ऑनलाईन अर्ज प्रक्रियेसाठी सूचना PDF फाईल डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा.

हेल्पलाईन क्रमांक: 022-49150800

हेही वाचा – शेतकरी बांधवांची महाडीबीटी प्रणालीवर लॉटरी मध्ये निवड झाल्यानंतर आणि पूर्व संमती मिळाल्यानंतर अपलोड करावयाची कागदपत्रे

वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.

आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी इथे क्लिक करा !!

शेअर करा:
WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Channel Join Now

One thought on “शेतकऱ्यांसाठी “अर्ज एक योजना अनेक”, महाडीबीटी पोर्टल योजना – MahaDBT Portal Scheme

  • दादासो उत्तमराव निकम

    सोलर मोटर

    Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.