वृत्त विशेषअन्‍न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागसरकारी कामे

रेशनकार्ड विषयक सेवांकरीता ऑनलाईन अर्ज करा ! Apply Online for Ration Card Services!

मा. सर्वोच्च न्यायालयाने रिट पिटीशन (सिव्हील) क्र.१९६/२००१ मध्ये दि.१४/९/२०११ रोजी लक्ष्य निर्धारित सार्वजनिक वितरण व्यवस्थेचे End to End Computerization बाबत विस्तृत आदेश दिले आहे. त्याअनुषंगाने केंद्र शासनाने दिलेल्या निर्देशानुसार NIC दिल्लीच्या Common Application Software (CAS) द्वारे राज्यातील सार्वजनिक वितरण व्यवस्थेच्या संगणकीकरणाचा Mission Mode प्रकल्प राबविण्यात येत आहे.

सदर प्रकल्पात लाभार्थी कुटुंबाला संगणकीकृत शिधापत्रिका देणे या बाबीचा समावेश आहे. त्यास अनुसरुन शिधापत्रिका व्यवस्थापन प्रणालीमार्फत (RCMS) राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेच्या लाभार्थ्यांकरिता QR Code आधारित ई- शिधापत्रिका ऑनलाईन तसेच डाऊनलोड करण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे.

अंत्योदय अन्न शिधापत्रिका (AAY), प्राधान्य कुटुंब योजना (PHH) व राज्य योजनेअंतर्गत APL Farmer, राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजना (NPH) अशा सर्व शिधापत्रिकाधारक लाभार्थ्यांस ई-शिधापत्रिका सुविधा विनामुल्य उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे.

राज्यातील नागरीकांना नवीन शिधापत्रिकेकरिता अर्ज करणे, शिधापत्रिकेतील पत्त्यामध्ये बदल करणे, नाव वगळणे किंवा समाविष्ट करणे अशा शिधापत्रिकाविषयक अनेक प्रकारच्या सेवा ऑनलाईन शिधापत्रिका व्यवस्थापन प्रणालीमार्फत Public Login वर उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. तथापि, सदर Public Login सुविधेचा वापर करताना लाभार्थ्यांना विविध अडचणी येत असल्याचे शासनाच्या निदर्शनास आले आहे. सदर अडचणी दूर करण्याकरिता शिधापत्रिका व्यवस्थापन प्रणाली (RCMS) च्या वापराबाबत मार्गदर्शन करण्यासाठी Module तयार करण्यात आले असून परिपत्रकासोबत जोडण्यात आले आहे.

रेशनकार्ड विषयक सेवांकरीता ऑनलाईन अर्ज करा ! Apply Online for Ration Card Services!

RCMS प्रणालीमध्ये उपलब्ध करण्यात आलेल्या विशिष्ट सेवांचा वापर करण्याची कार्यपद्धती आपण येथे सविस्तर पाहणार आहोत. नागरिकांना शिधापत्रिका व्यवस्थापन प्रणाली (RCMS) वरील Public Login सुविधेचा वापर करतांना काही समस्या असल्यास त्यांनी या मार्गदर्शक Module चा वापर करावा. सर्व जिल्हा पुरवठा अधिकारी / अन्नधान्य वितरण अधिकारी / उपनियंत्रक शिधावाटप यांनी सदर मार्गदर्शक Module कार्यालयात दर्शनी भागावर लावावे.

१. नागरीकांनी शिधापत्रिका विषयक सेवांकरीता ऑनलाईन अर्ज करण्यासाठी खालील लिंक वर जावे.

https://rcms.mahafood.gov.in

२. Sign In/Register या menu अंतर्गत Public Login हा submenu या लिंकवर जावे.

३. Public login हि विंडो उघडल्यानंतर खालीलप्रमाणे दोन पर्याय दिसतीलः

  • a. Registered User (यापुर्वीच नोंदणी केलेल्या नागरीकांनी या पर्यायाचा वापर करावा)
  • b. New User! Sign Up Here (नवीन नोंदणी करण्यासाठी या पर्यायाचा वापर करावा)

४. नवीन नोंदणी करण्याकरीता खालीलप्रमाणे पर्याय आहेतः

  • a. A User having Valid Ration Card & is a HoF/HoFN (१२ अंकी शिधापत्रिका क्रमांक व कुटुंब प्रमुख असलेल्या लाभार्थ्यांनी हा पर्याय वापरावा)
  • b. A User having Valid Ration Card & is not a HoF/HoFN (१२ अंकी शिधापत्रिका क्रमांक व कुटुंब प्रमुख नसलेल्या लाभार्थ्यांनी हा पर्याय वापरावा)
  • c. A New user to the system doesn’t have Ration Card (शिधापत्रिका नसलेल्या नागरीकांनी नवीन नोंदणी करीता हा पर्याय वापरावा)

a. A User having Valid Ration Card & is a HoF/HOFN १२ अंकी शिधापत्रिका क्रमांक व कुटुंब प्रमुख – असलेल्या लाभार्थ्यांनी हा पर्याय निवडल्यानंतर नागरीकांनी १२ अंकी शिधापत्रिका क्रमांक नमूद करावा. (A User having Valid Ration Card & is a HoF/HoFN should enter १२ digit Ration Card number)

b. A User having Valid Ration Card & is not a HoF/HoFN – १२ अंकी शिधापत्रिका क्रमांक व कुटुंब प्रमुख नसलेल्या लाभार्थ्यांनी हा पर्याय निवडल्यानंतर १२ अंकी शिधापत्रिका क्रमांक व आपला आधार क्रमांक नमूद करावा. (A User having Valid Ration Card & is not a HoF/HoFN should enter १२ digit Ration Card number and Aadhar number)

c. प्रणालीच्या नवीन वापरकर्त्याकडे रेशन कार्ड नाही (शिधापत्रिका नसलेल्या नागरीकांनी नवीन नोंदणी करीता हा पर्याय निवडल्यानंतर नवीन लॉगीन तयार करण्याकरीता सर्व आवश्यक माहिती भरावी.)

५. सदर नमूद फॉर्म यशस्वी भरल्यानंतर आपल्या आधार कार्डसोबत संलग्न मोबाईल क्रमांकावर OTP येईल.

OK बटणावर क्लिक केल्यानंतर नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर OTP पाठविण्यात येईल.

६. यापूर्वीच्या फॉर्म सोबतच आता OTP भरण्याकरिता नव्याने एक रकाना दिसेल. हे वापरकर्त्याची पुष्टी करेल व आधार पडताळणी प्रक्रियेद्वारे तपशिल पडताळला जाईल. यासोबतच नवीन वापरकर्ता नोंदणी पूर्ण होईल.

७. नवीन नोंदणी केल्यानंतर self service प्रणाली मध्ये आपण प्रवेश करु शकता. Homepage वर जाऊन Public Login मधून Sign In/Register निवडा. आता नोंदणी झाली असल्याने आपण Registered User हा पर्याय निवडू शकतो.

८. नोंदणीकृत वापरकर्ता पुढील तीन पद्धतीने या system मध्ये login करु शकतो.

  • (आधार OTP द्वारे लॉगीन) – या पद्धतीमध्ये आपला आधार क्रमांक व संबंधित Captcha लिहून Get OTP हा पर्याय निवडावा.
  • (युझर नेम द्वारे लॉगीन) या पद्धतीमध्ये आपले युझर नेम, पासवर्ड व संबंधित Captcha लिहून Get OTP हा पर्याय निवडावा.
  • (१२ अंकी शिधापत्रिका क्रमांकाद्वारे लॉगीन) या पद्धतीमध्ये १२ अंकी शिधापत्रिका क्रमांक व Captcha लिहून Get OTP हा पर्याय निवडावा.

९. ओटीपी प्राप्त झाल्यानंतर वापरकर्त्याने ओटीपी नोंदवून Verify OTP हा पर्याय निवडावा. ओटीपी योग्य असल्यास वापरकर्त्यास system मध्ये प्रवेश मिळतो, ओटीपी अयोग्य असल्यास Resend OTP button वर क्लिक करावे.

१०. नागरिकांकरिता डॅशबोर्ड (Dashboard of Public User)

वापरकर्ता त्याच्या / तीच्या अर्जाची सद्यस्थिती, रास्तभाव दुकानासंदर्भातील माहिती डॅशबोर्ड वरुन तपासणी करु शकता.

११. ज्या लाभार्थ्यांना नवीन शिधापत्रिकेसाठी अर्ज / शिधापत्रिकेमध्ये दुरुस्ती करावयाची आहे त्यांनी बाजूच्या यादीमधून Apply/Edit Ration Card Application हा पर्याय निवडावा.

  • खालील तक्त्यात बोलून जिल्हा / गाव निवडावे (कृपया जिल्हा, तालुका आणि गाव निवडा)
  • खालील तक्त्यात कुटुंबातील सदस्यांचा तपशिल भरावा. प्रथम सदस्य हा शिधापत्रिकेचा कुटुंबप्रमुख असेल.
  • खाली नमूद केल्याप्रमाणे सर्व माहिती भरावी.”*” चिन्हांकित माहिती भरणे अत्यावश्यक आहे.
  • कुटुंबाच्या उत्पन्नानुसार शिधापत्रिकेचा प्रकार निवडावा.
  • रहवाशी पत्ता व गॅस कनेक्शनचा तपशिल भरावा.
  • ओळखीचा पुरावा व रहवासी पुरावा जोडावा.
  • अर्जदाराने शिधापत्रिकेचा प्रकार निवडावा.
  • ज्या रास्तभाव दुकानामधून शिधापत्रिका हवी आहे त्याबाबतचा तपशिल भरावा.
  • शिधापत्रिका अर्ज तपासणी व मान्यतेकरिता पाठविण्यापुर्वी सदर अर्ज जतन (Save) करावा. कृपया लक्षात घ्या की, अर्ज तपासणी व मान्यतेकरिता पाठविल्यानंतर सदर अर्जात कोणताही बदल करता येणार नाही.
  • अर्ज यशस्वीरित्या स्विकृत झाला असून अर्जाची प्रत आपल्या नोंदणीकृत ई-मेल वर पाठविण्यात आली आहे.

१२. पेमेंट विंडो

  • NPH आणि APL शुभ्र करिता एक विंडो दिसेल.
  • पेमेंटसाठी पुढे जा असे निवडल्यास खालील प्रक्रिया प्रदर्शित होईल.
  • योग्य पर्याय निवडा आणि पेमेंट करा
  • अर्जदाराने पेमेंट प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर त्याबाबतची माहिती २ दिवसांनी अद्ययावत होईल. (तांत्रिक अडचण असल्यास दोन दिवसांपेक्षा अधिक कालावधी लागण्याची शक्यता आहे.
  • पेमेंट यशस्वीरित्या पूर्ण झाल्यानंतर अ.क्र.१० येथील डॅशबोर्ड मध्ये नमूद अॅप्लीकेशन रिक्वेस्ट येथे क्लिक करुन शिधापत्रिका अर्जाचे स्टेटस Save as Draft ऐवजी Send for modification and verification असे दर्शविण्यात येईल.
  • पेमेंट यशस्वीरित्या पूर्ण झाल्याचे दर्शवित असून देखील काही वेळेस शिधापत्रिका पेमेंट पेंडिंग दिसत असल्यास Ration Card Payment येथे क्लिक करुन Get GRN व Get CIN या टॅब वर क्लिक करावे.

१३. अर्ज पेमेंट रद्द करायचे असल्यास, नंतर reject बटणावर क्लिक करा आणि पुढे जा.

१४. शिधापत्रिकेची प्रत प्राप्त करुन घेण्याबाबत (To download Ration Card)

  • शिधापत्रिकेबाबतची कार्यवाही पूर्ण झाल्यानंतर शिधापत्रिकेची प्रत प्राप्त करुन घेण्यासाठी Download Your Ration Card या ऑप्शन वर क्लिक करावे.
  • Download Your Ration Card या ऑप्शन वर क्लिक केल्यानंतर तुमच्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर ओटीपी पाठविण्यात येईल. सदर ओटीपी नमूद करुन Verify OTP वर क्लिक करावे.
  • तद्नंतर, पुढीलप्रमाणे ऑनलाईन शिधापत्रिका आपणांस उपलब्ध होईल.

अन्‍न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग शासन निर्णय : शिधापत्रिका व्यवस्थापन प्रणाली (RCMS) वरील Public Login मार्फत ऑनलाईन शिधापत्रिकाविषयक अर्ज करतांना उद्भवणाऱ्या समस्यांचे निराकरण करण्याकरिता मार्गदर्शक Module शासन निर्णय पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

हेही वाचा – नवीन रेशनकार्ड किंवा रेशनकार्ड रास्तभाव दुकानासाठी ऑनलाईन अर्ज कसा करायचा? जाणून घ्या सविस्तर माहिती

वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.

आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी येथे क्लिक करा !!

शेअर करा:
WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Channel Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.