पेसा दाखल्यासाठी ऑनलाईन अर्ज कसा करायचा ? जाणून घ्या सविस्तर माहिती !
एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय कार्यालयाच्या कार्यक्षेत्रातील उमेदवारांना अनुसूचित क्षेत्र (पेसा) दाखला देण्यासाठी स्वतंत्र वेब पोर्टल कार्यान्वित करण्यात आले आहे, उमेदवारांनी या पोर्टलवर अर्ज सादर करावेत, असे आवाहन एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाचे प्रकल्प अधिकारी यांनी एका शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.
पेसा दाखल्यासाठी ऑनलाईन अर्ज कसा करायचा ? जाणून घ्या सविस्तर माहिती ! Apply Online For PESA Certificate:
आदिवासी विकास विभागाच्या अधिसुचनेनुसार अनुसुचित क्षेत्रातील (पेसा) 17 संर्वर्गातील सरळसेवेची पदे भरण्यासाठी संबधित उमेदवारांना अनुसूचित क्षेत्र (पेसा) रहिवासी दाखला आवश्यक आहे. हा दाखला एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, कार्यालयामार्फत देण्यात येतो. त्यासाठी उमेदवारांनी आपले अर्ज खालील वेब पोर्टलच्या लिंकवर जाऊन सादर करावेत.
पेसा दाखल्यासाठी आवश्यक कागदपत्रे :
- अधिवास प्रमाणपत्र (तहसिलदार यांचेकडील)
- शाळा सोडल्याचा दाखला,
- जातीचा दाखला,
- आधार कार्ड,
- स्वयंघोषणापत्र
- उमेदवार राहत असलेला पाडा हा पेसा क्षेत्रात येत असल्याबाबतचे महसुल ग्रामपंचायतीचे ग्रामसेवकाचे प्रमाणपत्र,
- महिलासाठी विवाह नोंदणी प्रमाणपत्र
ऑनलाईन अर्ज (Apply Online For PESA Certificate) : ऑनलाईन अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा.
शासन निर्णय : मा.राज्यपाल महोदय यांच्या दि. 29.08.2019 च्या अधिसूचनेनूसार अनुसूचित क्षेत्रातील (पेसा) 17 संवर्गातील सरळसेवेची पदे भरण्याच्या अनुषंगाने उमेदवारांना अनुसूचित क्षेत्र (पेसा) रहिवाशी दाखला देण्याबाबत शासन निर्णय पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
हेही वाचा – जातीचा दाखला ऑनलाईन कसा काढायचा? याबद्दल सविस्तर माहिती जाणून घ्या
वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.
आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी इथे क्लिक करा !!