Kisan Credit Card : ‘किसान क्रेडीट कार्ड’ योजनेचा लाभ घेण्याचे शेतकऱ्यांना आवाहन !
मच्छीमार, मत्स्यसंवर्धक, मत्स्यकास्तकार यांना किसान क्रेडिट कार्ड (Kisan Credit Card) योजनेच्या माध्यमातून सन २०२४-२५ या वर्षांकरिता राज्यस्तरीय समितीने कर्जदर निश्चित केले आहेत. तरी जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या (KCC Card) योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयुक्त मत्स्यव्यवसाय डॉ. अतुल पाटणे यांनी केले आहे.
‘किसान क्रेडीट कार्ड’ योजनेचा लाभ घेण्याचे शेतकऱ्यांना आवाहन ! Kisan Credit Card (KCC Card) :
शेततळे प्रति हेक्टर सर्वजाती मत्स्यपालन पाच लाख रूपये कर्ज दर निश्चित करण्यात आला आहे. नदी, तलावामध्ये छोट्या नावेच्या सहाय्याने मासेमारी ८० हजार रूपये, निमखारे पाण्यातील सर्वजाती मत्स्यपालन प्रति हेक्टर तीन लाख रूपये, निमखारे पाण्यातील कोळंबी संवर्धन प्रतिहेक्टर तीन लाख रूपये, टॉलर मच्छीमार नौका तीन लाख रूपये, पर्सिसीन मच्छीमार नौका तीन लाख रूपये, गील नेटर मच्छीमार नौका तीन लाख रूपये, बिगर यांत्रिक मच्छीमार नौका ८० हजार रूपये, यांत्रिक मच्छीमार नौका एक लाख ५० हजार रूपये, शोभीवंत मत्स्यपालन एक लाख रूपये, गोड्या पाण्यातील मत्स्यव्यवसाय दोन लाख रूपये, पिंजरा पद्धतीने मत्स्यपालन ५० हजार रूपये अशा एकूण १४ घटकांना कर्जदर निश्चित करण्यात आलेला आहे.
राज्यातील जास्तीत जास्त मच्छिमार, मत्स्यसंवर्धक, मत्स्यकास्तकार यांनी किसान क्रेडीट कार्ड (Kisan Credit Card) योजनेचा लाभ घेण्यासाठी जिल्ह्याचे सहायक आयुक्त मत्स्यव्यवसाय यांच्या कार्यालयाशी संपर्क साधावा.
ऑनलाईन अर्ज (Apply Online for Kisan Credit Card): किसान क्रेडीट कार्डसाठी ऑनलाईन अर्ज (KCC Card Registration) करण्यासाठी इथे क्लिक करा.
- Pashu Kisan Credit Card : पशु किसान क्रेडिट कार्डसाठी असा करा अर्ज !
- Digital Agriculture Loan : शेतकऱ्यांना मिळणार ५ मिनिटांत पीक कर्ज, आरबीआय-नाबार्ड सोबत करार!
- महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना : 50 हजार प्रोत्साहनपर लाभासाठी कर्जखात्याचे आधार प्रमाणीकरण करा !
हेही वाचा – कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या अर्थसहाय्याचे स्टेट्स ऑनलाईन चेक करा !
वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.
आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी इथे क्लिक करा !!