वीज बिल जास्त आले असेल तर काय करायचे? खराब मीटर बदलून नवीन मीटर कसा घ्यायचा? जाणून घ्या सविस्तर माहिती !
आपण या लेखात विज बिल दुरुस्ती करून खराब मीटर बदलून (Electricity Meter Change) नवीन मीटर देणेबाबत सविस्तर माहिती पाहणार आहोत व अर्ज नमुना कसा असावा ते पाहूया.
वीज बिल जास्त आले असेल तर काय करायचे? Electricity Bill High:
आपल्या विजेचा मीटर खराब झाला असेल किंवा वीज वापरापेक्षा मीटर रीडिंग जास्त पडून वीज बिल जास्त आले असेल, अशा विविध समस्यांना सर्वसामान्य ग्राहकांना सामोरे जावे लागते. मागील महिन्याचे वीज बिल हे बरोबर येत होते व सध्याच्या महिन्याचे वीज बिल हे वीज वापरापेक्षा जास्त आले असेल तर महावितरण कंपनीला अर्ज करून ते कमी करून घ्यावे लागते.
खराब मीटर बदलून नवीन मीटर कसा घ्यायचा? Electricity Meter Change Request:
आपण जवळच्या महावितरण कार्यालयात जाऊन संबधित अधिकर्याला खालील प्रमाणे आवश्यक ते बदल करून तक्रार अर्ज दिल्यास वीज बिलात सवलत दिली जाते. जर मीटरमध्ये खराब किंवा दोष असेल तर मीटर बदलून (Electricity Meter Change) मिळावा या करिता महावितरण कार्यालयात अर्ज करावा लागतो.
विज बिल दुरुस्ती करून खराब मीटर बदलून नवीन मीटर देणेबाबत अर्ज नमुना – Electricity Meter Change Application:
——————————————————————————————————————————
प्रति, सहाय्यक अभियंता,
महाराष्ट्र राज्य वि.वि. कंपनी,
——- शाखा.
विषय: विज बिल दुरुस्ती करून खराब मीटर बदलून नवीन मीटर देणेबाबत अर्ज.
सन्माननीय महोदय,
वरील विषयान्वये विनंती अर्ज करतो की, आमच्या ……………सोसायटी………. विंगच्या विदुत मीटरचा ग्राहक क्रमांक – ……………………….. असून मीटर रीडिंग जम्प होऊन ————– महिन्याचे …………….युनिट वाढून त्याचे बिल ————/ रुपये आले, त्यामुळे ते बिल आम्ही भरू शकलो नाही, तरी आपण मागील बिलांची सरासरी रक्कम पाहून बिल कमी करून देणे.
तसेच आता विद्यत मीटर पूर्ण पणे बंद झालेला असून रिडींग पूर्णपणे बंद झालेली आहे, त्यामुळे खराब मीटर बदलून नवीन मीटर लावून देणे, ही नम्र वनंती.
आपला विश्वासू,
——————————————————————————————————————————
वरील तक्रार अर्ज दिल्यानंतर मीटर टेस्टिंग फी भरा, त्यानंतर मीटर चेक करण्यासाठी महावितरणचे अभियंता येतील व आपला मीटर काढून (Electricity Meter Change) तिथे दुसरा तात्पुरता टेस्टिंग मीटर लावतील, तसेच खराब मीटर टेस्टिंगला घेऊन जातील व आपल्याला पुढील प्रोसेस ते कॉल द्वारे कळवतील.
महाराष्ट्र महावितरणच्या अधिकारी व कर्मचार्यांची संपर्काची माहिती PDF फाईल:
महाराष्ट्र महावितरणच्या अधिकारी व कर्मचार्यांची संपर्काची माहिती PDF फाईल डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.
- राष्ट्रीय टोल-फ्री: १९१२ / १९१२०
- महावितरण टोल-फ्री: १८००-१०२-३४३५ / १८००-२३३-३४३५
- ऊर्जा मंत्री हेल्पडेस्क: 9833717777 / 9833567777
- ईमेल: customercare@mahadiscom.in / helpdesk_pg@mahadiscom.in
खालील लेख देखील वाचा!
- महावितरणच्या वीज बिलावरील पत्त्याची दुरुस्ती करण्यासाठी ऑनलाईन अर्ज कसा करायचा? – Online Address Correction Application MSEB
- थकबाकीमुळे वीज कनेक्शन तोडलेल्या ग्राहकांसाठी महावितरणची अभय योजना!
- रोहित्र दुरुस्तीसाठी आता महावितरण ॲपवर माहिती देण्याची सुविधा !
- महावितरणच्या ‘गो- ग्रीन’ योजनेंतर्गत नोंदणी करा आणि दरमहा वीजबीलामध्ये 10 रुपये वाचवा – MSEDCL Go Green Ebill Application
- महावितरणच्या वीज बिलावरील नावात बदल करण्यासाठी ऑनलाईन अर्ज कसा करायचा? जाणून घ्या सविस्तर माहिती – Online Name Change Application MSEB
- मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना; आता शेतकऱ्यांना मिळणार मोफत वीज!
- विजेचे युनिट रेट/आकार आणि वीज ग्राहकांचे अधिकार
- शेतातून वीजेची लाईन गेल्यास किंवा टॉवर उभारल्यास आता इतका मोबदला मिळणार !
वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.
आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी येथे क्लिक करा !!