वृत्त विशेषशालेय शिक्षण व क्रीडा विभागशिक्षण मंत्रालयसरकारी कामे

अपार आयडी ‘एक राष्ट्र, एक ओळखपत्र’ प्रत्येक विद्यार्थ्याला बनवावे लागणार !

देशभरातील विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. आता आधार कार्डप्रमाणेच प्रत्येक विद्यार्थ्यासाठी 12 अंकी अपार (APAAR ID) कार्ड (Automated Permanent Academic Account Registry) बनवले जाईल. यामध्ये त्यांच्या शैक्षणिक तपशील आणि इतर नोंदी केल्या जातील. हे ‘वन नेशन, वन स्टुडंट आयडी’ म्हणून वापरले जाऊ शकते. APAAR ID कार्डमुळे देशातील प्रत्येक विद्यार्थ्याला त्याचा स्वतंत्र ओळख क्रमांक आणि सोबतच डिजिलॉकरची सोय उपलब्ध करून दिली जात आहे. ‘एक देश, एक विद्यार्थी ओळख’ या संकल्पनेच्या अंतर्गत हा उपक्रम आहे.

‘अपार आयडी’ (APAAR ID) म्हणजे काय ?

‘ऑटोमेटेड पर्मनंट अॅकॅडमिक अकाउंट रजिस्ट्री’ याचे लघुरूप म्हणजे ‘अपार (APAAR ID)’. अपार हा देशातील पूर्व प्राथमिक ते उच्चशिक्षण घेणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यांचा बारा अंकी कायमस्वरूपी ओळखक्रमांक आहे. ‘युनिफाइड डिस्ट्रिक्ट अँड इन्फर्मेशन सिस्टीम फॉर एज्युकेशन प्लस’ म्हणजेच ‘यू-डायस पोर्टलमध्ये सध्या प्रत्येक विद्यार्थ्यांची नोंदणी आहे. येथे त्याचा व्यक्तिगत शैक्षणिक क्रमांक (पीईएन) नोंदवलेला आहे. ‘अपार आयडी’ (APAAR ID) या ‘पीईएन’ची जागा घेणार आहे.

APAAR ID कार्डचा फायदा काय?

1. विद्यार्थ्यांना एका शाळेतून दुसर्‍या शाळेत दाखला घेण्यासाठी, देशातील कोणत्याही महाविद्यालयात, पुढील शिक्षणासाठी प्रवेश घेण्यासाठी APAAR ID कार्डचा डेटा वापरता येईल. APAAR ID अपार 12 अंकांच्या आधारे त्याचा प्रवेश निश्चित होईल.

2. अपार (APAAR ID) कार्डच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना विविध परीक्षा शुल्क भरणा, उत्तीर्ण परीक्षा आणि त्याचा रेकॉर्ड ट्रॅक होईल. तसेच त्यांच्या 12 अंकी क्रमांका आधारे शैक्षणिक सत्रातील निकाल ऑनलाईन पाहता येईल.

3. अपार (APAAR ID) कार्ड विद्यार्थ्यांना सार्वजनिक बस सेवेत सवलत मिळेल. सध्या राज्यात एसटी महामंडळ विद्यार्थ्यांना सवलतीत प्रवास योजना राबवते. त्यासाठी हे कार्ड ग्राह्य असेल.

4. APAAR ID कार्डमुळे विद्यार्थ्यांना विविध सरकारी संग्रहालयात मोफत प्रवेश असेल.

5. सरकारकडे एकदा डाटा आल्यानंतर गरजू विद्यार्थ्यांची ओळख पट‍वून त्यांना मोफत पुस्तकं आणि वह्यांचा पुरवठा होईल. त्यांना स्टेशनरी पुरवण्यात येईल.

6. विद्यार्थी, पालक यांचे आधार कार्ड आणि त्याला पॅन कार्ड जोडणी झाल्यानंतर गरजू आणि आर्थिकदृष्ट्या कमकुवत विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचा फायदा देणे सोपे होईल

7. यापुढे विद्यार्थ्यांचे बँकेतील खाते उघडताना आधार कार्ड आणि अपार (APAAR ID) आयडी महत्त्वाचा असेल. त्यामुळे गरजू आणि पात्र विद्यार्थ्यालाच शिष्यवृत्तीची रक्कम मिळाली हे निश्चित होईल.

8. विद्यार्थ्यांच्या बँक खात्याशी आधार कार्ड आणि अपार (APAAR ID) कार्ड संलग्न असेल. विद्यार्थ्यांसाठीच्या सर्व सरकारी योजनांचा थेट लाभ या खात्यात जमा होईल. त्यांच्या पुरस्काराची रक्कम, विविध परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतरची रक्कम या खात्यात जमा होणार आहे.

9. सरकारी विद्यार्थी वसतिगृहात आणि विविध खासगी वसतिगृहात प्रवेशासाठी आधार आणि अपार (APAAR ID) कार्ड महत्त्वाचे असेल. त्याआधारे सवलत मिळेल.

10. देशभरात शैक्षणिक सहली आयोजन करताना विद्यार्थ्यांच्या या माहितीचा उपयोग होईल. विद्यार्थ्यांना इतर ठिकाणी सवलतीत प्रवास आणि राहण्याची व्यवस्था करण्यासाठी त्याचा वापर होईल.

13. सर्वात महत्त्वाचा फायदा म्हणजे, विद्यार्थ्यांची शैक्षणिक गळतीचे प्रमाण, त्यामागील कारण, शिक्षकांची संख्या आणि जिथे विद्यार्थ्यांची पटसंख्या वाढवून बोगस गिरी सुरू आहे, ते सर्व प्रकार या नवीन अपार (APAAR ID) कार्डमुळे समोर येतील. पट संख्या नसताना शिक्षकांची नियुक्ती, अतिरिक्त शिक्षक, शिक्षकांची गरज या सर्वांची गोळाबेरीज समोर येईल.

अपार आयडी ‘एक राष्ट्र, एक ओळखपत्र’ – APAAR ID Card:

राज्यातील सर्व विद्यार्थ्यांना अपार (APAAR ID) आयडी उपलब्ध करून देण्याचा राष्ट्रीय उपक्रम सुरु केला आहे. दि. २५ नोव्हेंबर, २०२४ पर्यंत राज्यातील ६५ (३१%) लाख विद्यार्थ्यांना शाळेच्या मुख्याध्यापकांकडून APAAR आयडी उपलब्ध करून देण्यात आला आहे. केंद्र शासनाकडून दि. ३० नोव्हेंबर, २०२४ पर्यंत सर्व विद्यार्थ्यांना अपार (APAAR ID) आयडी उपलब्ध करून देण्याकरिता केंद्र शासनाकडून सातत्याने पाठपुरावा करण्यात येत आहे.

केंद्र शासनाचे निर्देश विचारात घेवून राज्यातील सर्व विद्यार्थ्यांना APAAR आयडी उपलब्ध करून देण्याच्या अनुषंगाने दि. २९ व ३० नोव्हेंबर, २०२४ रोजी राज्यातील सर्व व्यवस्थापन / सर्व माध्यमांच्या शाळेमध्ये ‘APAAR दिवस’ साजरा करण्यात येणार आहे.

सदर दिवशी APAAR आयडी बनविण्यासाठी सर्व शाळांमध्ये विशेष मोहिम राबविण्यात येणार आहे.

जिल्हा स्तरावरून APAAR आयडीवावत शाळेच्या मुख्याध्यापक यांची ऑनलाईन आढावा बैठक आयोजित करून सर्व शाळांचा आढावा घेवून संबंधितांना सूचना देण्यात येणार आहेत.

अधिकृत वेबसाईट: अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

पुढील लेख देखील वाचा!

  1. आधारकार्ड PDF फाईल मध्ये डाउनलोड करण्याची प्रोसेस ! Download Aadhaar Card in PDF File
  2. पॅनकार्ड हरवल्यास काय करावे? तुमचा पॅन कार्ड नंबर आठवत नसेल तर कसा शोधावा ?
  3. 5 मिनिटात मोफत पॅन कार्ड काढा – Instant e-PAN
  4. पासपोर्टसाठी असा करा ऑनलाईन अर्ज; जाणून घ्या सविस्तर माहिती!
  5. पोलीस क्लिअरन्स प्रमाणपत्र (चारित्र्य दाखला) ऑनलाईन काढण्याची प्रोसेस पहा !
  6. शासकीय दाखल्यांसाठी लागणारे कागदपत्रे !
  7. नाव, जन्मतारीख व धर्मामध्ये बदल करण्यासाठी (गॅझेट) राजपत्र नोंदणी अर्ज करा ऑनलाईन – Apply for Gazette Registration Online
  8. आधार PVC कार्ड ATM सारखं दिसणार आधार कार्ड ऑनलाईन ५० रुपयात बनवा, जाणून घ्या सविस्तर प्रोसेस (Aadhaar PVC card)
  9. आधार कार्ड वरील पत्ता अपडेट करण्याची ऑनलाईन प्रोसेस !
  10. आता पोस्टमन काढणार लहान मुलांचे आधारकार्ड; जाणून घ्या सविस्तर माहिती !
  11. मुलींच्या लग्नानंतर आधार कार्डवरील नाव बदलण्याची प्रोसेस !
  12. आधार कार्डचा गैरवापर टाळण्यासाठी आधार बायोमेट्रिक लॉक/अनलॉक कसे करायचे?
  13. तुमच्या आधारकार्डवर किती मोबाईल नंबर सक्रिय आहेत ते पहा !
  14. तुमचे आधार कार्ड कुठे वापरले जातेय ? असे तपासा !
  15. घरबसल्या आधारकार्डला नवीन मोबाईल नंबर अपडेट होणार
  16. घरबसल्या घ्या विविध सरकारी सेवांचा ऑनलाईन लाभ!

वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.

आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी इथे क्लिक करा !!

शेअर करा:
WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Channel Join Now

One thought on “अपार आयडी ‘एक राष्ट्र, एक ओळखपत्र’ प्रत्येक विद्यार्थ्याला बनवावे लागणार !

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.