Anonymous Complaint Rules : निनावी तक्रारीसाठी काय नियम आहे?
आपण या लेखात निनावी व खोटया तक्रारी, खोटया सहीने केलेल्या तक्रारी (Anonymous Complaint Rules) याबाबत करावयाची कार्यवाही आणि वैयक्तिक गाऱ्हाण्यासंबंधीच्या अर्जावरील कार्यवाहीबाबत स्पष्टीकरण बाबत सामान्य प्रशासन विभागाच्या दोन परिपत्रकाची सविस्तर माहिती घेऊया.
निनावी तक्रारीसाठी नियम – Anonymous Complaint Rules:
निनावी व खोट्या तक्रारी, खोटया सहीने केलेल्या तक्रारी संदर्भात करावयाच्या कार्यवाहीबाबतची माहिती संदर्भाधीन शासन परिपत्रकान्वये दिलेल्या आहेत. केंद्र शासनाने दिनांक १८.१०.२०१३ च्या शासन ज्ञापनान्वये निनावी व खोटया तक्रारी, खोटया सहीने केलेल्या तक्रारी आणि सार्वजनिक हित, प्रसिध्दी व माहिती देणा-यास संरक्षणाबाबतचे आदेश २००४ (PIDPI) यामधील सूचना विचारात घेऊन कशा प्रकारे कार्यवाही करावी याबाबत सूचना निर्गमित केल्या आहेत.
निनावी व खोटया तक्रारी, खोटया सहीने केलेल्या तक्रारी याबाबत करावयाची कार्यवाही:
सदर सूचनांच्या अनुषंगाने राज्य शासनामार्फत मार्गदर्शक सूचना देण्याची बाब विचाराधीन होती. त्यानुसार संदर्भाधीन शासन परिपत्रके अधिक्रमित करून पुढील प्रमाणे कार्यवाही करण्याबाबत सूचना देण्यात येत आहेत.
(१) ज्या तक्रारीमध्ये तक्रारदाराचे नाव व पत्ता नमुद केलेला नाही अशा निनावी तक्रारीमध्ये (Anonymous Complaint Rules) कोणत्याही स्वरूपाची तक्रार/माहिती अंतर्भूत असली तरी त्यावर कार्यवाही करण्यात येऊ नये. अशा तक्रारी दफ्तरी दाखल करण्यात याव्यात.
(२) ज्या तक्रारीमध्ये असंबध्द (vague) आरोप आहे अशा तक्रारीदेखील तक्रारदाराची तपासणी न करता दफ्तरी दाखल करण्यात याव्यात.
(३) ज्या तक्रारीमध्ये पडताळणी करता येवू शकेल असे आरोप केलेले आहेत अशा तक्रारीचे संबंधात प्रशासकीय विभाग/मंत्रालयाने त्याची दखल घ्यावी. अशा प्रकरणी सक्षम प्राधिका-याच्या मान्यतेने सदरहू तक्रार तक्रारदाराकडे पाठवून ती त्यांने स्वत: केली आहे काय याबाबत खात्री करून घेण्यात यावी.
तक्रारदाराकडून १५ दिवसामध्ये प्रतिसाद मिळाला नाही तर स्मरणपत्र पाठविण्यात यावे व तद्नंतर १५ दिवसांची प्रतिक्षा केल्यानंतर देखील माहिती प्राप्त न झाल्यास सदरहू तक्रार खोटया नावाची (Pseudonymous) तक्रार असल्याचे नमुद करून दफ्तरी दाखल करण्यात यावी.
(४) तक्रारदाराने आपण स्वत: तक्रार केल्याचे मान्य केल्यास अशा तक्रारीवर कार्यवाही करताना तक्रार अर्जातील अर्जदाराचे नाव व पत्ता झाकुन तक्रारीची छायांकित प्रत काढुन ती चौकशीसाठी संबंधित यंत्रणेकडे पाठवावी व पुढील कार्यवाही करावी.
निनावी व खोटया तक्रारी, खोटया सहीने केलेल्या तक्रारी (Anonymous Complaint Rules) याबाबत सामान्य प्रशासन विभागाचे परिपत्रक:
निनावी व खोटया तक्रारी, खोटया सहीने केलेल्या तक्रारी (Anonymous Complaint Rules) याबाबत करावयाची कार्यवाही बाबत सामान्य प्रशासन विभागाचे परिपत्रक पाहण्यासाठी इथे क्लिक करा.
वैयक्तिक गाऱ्हाण्यासंबंधीच्या अर्जावरील कार्यवाहीबाबत:
असे निदर्शनास आले आहे की, काही त्रयस्थ व्यक्ती/संस्था अन्य व्यक्तींच्या वैयक्तिक गाऱ्हाणासंबंधी पत्रव्यवहार तसेच पाठपुरावा करतात. अशा पत्रांची दखल घ्यावी किंवा कसे, या बाबत अनेक विभागांकडून या विभागास विचारणा होत असते. सबब यासंदर्भात करावयाच्या कार्यवाहीबाबत स्पष्टता आणण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.
शासनास करावयाचे अर्ज तयार करणे, सादर करणे व त्याची विल्हेवाट लावणे याविषयीच्या दिनांक ३ डिसेंबर, १९५८ च्या अधिसूचनेन्वये, याबाबतचे नियम विहित करण्यात आले असून त्यातील अनुक्रमांक १ येथील नियमान्वये, वैयक्तिक गाहाण्यासंबंधीचे अर्ज, ज्या व्यक्तीवर अन्याय झालेला असेल त्याच्याकडून स्वीकारण्यात यावेत. एजंटांकडून किंवा त्यांच्यामार्फत शासनास करण्यात आलेल्या अर्जांची सामान्यत: दखल घेण्यात येऊ नये, अशी तरतूद करण्यात आलेली आहे.
सबब सर्व मंत्रालयीन विभाग तसेच क्षेत्रिय कार्यालयांना सूचित करण्यात येते की, त्रयस्थ व्यक्ती/संस्था यांचेकडून अन्य व्यक्तींच्या वैयक्तिक गाऱ्हाणासंबंधी पत्रव्यवहार किंवा पाठपुरावा करण्यात आल्यास उक्त नियमानुसार कार्यवाही करण्यात यावी.
वैयक्तिक गाऱ्हाण्यासंबंधीच्या अर्जांवरील कार्यवाहीबाबत सामान्य प्रशासन विभागाचे परिपत्रक:
वैयक्तिक गाऱ्हाण्यासंबंधीच्या अर्जांवरील कार्यवाहीबाबत सामान्य प्रशासन विभागाचे परिपत्रक पाहण्यासाठी इथे क्लिक करा.
वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.
आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी इथे क्लिक करा !!