राज्यातील सर्व पशुंची Ear Tagging करून त्याची नोंद National Digital Livestock Mission (NDLM) अंतर्गत भारत पशुधन प्रणालीवर होणार !
राज्यातील सर्व पशुंची Ear Tagging (Animal Ear Tagging) करून त्याची नोंद National Digital Livestock Mission (NDLM) अंतर्गत भारत पशुधन प्रणालीवर होणार ! केंद्र शासनाच्या पशुसंवर्धन विभागाद्वारे नॅशनल डिजिटल लाइव्हस्टॉक मिशन (NDLM) अंतर्गत “भारत पशुधन” प्रणाली कार्यान्वित केली आहे. सदर प्रणालीमध्ये ईअर टॅगिंग (१२ अंकी बार कोडेड) केलेल्या सर्व पशुधनाच्या सर्वंकष नोंदी घेण्यात येत आहेत. यामध्ये जन्म-मृत्यु नॉदणी, प्रतिबंधात्मक लसीकरण व औषधोपचार, वंध्यत्व उपचार, मालकी हक्क हस्तांतरण यांचा समावेश आहे. थोडक्यात सदर प्रणालीवर संबंधित पशुधनाची प्रजनन, आरोग्य, मालकी हक्क, जन्म-मृत्यु, इ. सर्व माहिती उपलब्ध होते.
“भारत पशुधन” प्रणालीमध्ये पशुचनावर करण्यात येणाऱ्या उपचाराकरीता देण्यात येणाऱ्या औषधी या ई-प्रिस्क्रिप्यानव्दारे देणे अभिप्रेत आहे. जेणेकरुन संबंधित भागातील पशुधनावर करण्यात येणाऱ्या उपचारादरम्यान वापरण्यात आलेली औषधी विचारात घेवून सदर भागात संभाव्य साथीच्या रोगाच्या शक्यतेचा अंदाज अथवा अस्तित्वात असलेल्या रोगांच्या स्थितीबद्दल आगाऊ माहिती उपलब्ध झाल्यामुळे प्रतिबंधात्मक अथवा उपचारात्मक उपाययोजना आगाऊ काळात करणे शक्य होते. याशिवाय इतर भागातही प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे शक्य होते. त्यामुळे पशुधनातील रोग व मानवांना प्रभावित करणाऱ्या प्रमुख रोगांना प्रतिबंध करण्यासाठी अंदाज व त्यानुसार प्रतिसाद आणि उपचार करणे शक्य होईल. तसेच, पशुधनाची जिवितहानी व पशुधनापासून मिळणाऱ्या उत्पन्नावरील विपरीत परिणाम टाळणे शक्य होते.
राज्यातील सर्व पशुंची कान टॅगिंग – Animal Ear Tagging:
पशुधनाच्या कानात Animal Ear Tagging करून NDLM अंतर्गत भारत पशुधन प्रणालीवर पशुधनाचे लसीकरण, प्रजनन, उपचार आणि खरेदी-विक्री इ. सर्व नोंदी घेतल्यामुळे वास्तवकालीन माहिती साठा (Real Time Database) तयार होणार आहे. या माहितीकोषाच्या आधारे शेतकऱ्यांना, पशुपालकांना शासनाच्या सुविधा, योजना आणि पशुधनासाठी आवश्यक असलेल्या सेवांचा लाभ घेण्यासाठी मदत होणार आहे. माहिती एकत्रिकरणामुळे पशु प्रजनन कार्यक्रम उत्तमरित्या राबवून पशुधनाच्या उत्पादकतेत वाढ होवून पशुपालकांचा आर्थिक स्तर उंचावण्यास मदत होणार आहे.
एकंदरीत नॅशनल डिजिटल लाइव्हस्टॉक मिशन (NDLM), हा एकीकृत आयटी इकोसिस्टम (Integrated Information Technology Ecosystem) पशुधन तसेच मानवी आरोग्याच्या दृष्टिने एक महत्त्वाकांक्षी अभियान असल्याने केंद्र शासन सदर प्रणाली राज्यांनी पूर्ण क्षमतेने वापरण्याबाबत अतिशय आग्रही आहे. ही बाब विचारात घेवून राज्यातील सर्व पशुधनास ईअर टॅगिंग करणे बंधनकारक करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती, “प्राण्यांमधील संक्रामक व सांसर्गिक रोगास प्रतिबंध व नियंत्रण अधिनियम, २००९ मधील कलम ३९ च्या अनुषंगाने दि. १२.१२.२०२३ रोजीच्या विविध दोन आदेशान्वये केंद्र शासनाने जन्माला येणाऱ्या व मृत पावणाऱ्या पशुधनाच्या जन्म-मृत्यूच्या नोंदी आणि कत्तल होणान्या सर्व पशुधनाच्या नोंदी भारत पशुधन प्रणालीवर घेणे बंधनकारक केले आहे.
भारत पशुधन प्रणालीवर पशुधनास उपचारादरम्यान देण्यात येणाऱ्या औषधांबाबतच्या e-Prescription नोंदी या अत्यंत महत्वाच्या आहेत. सदर नोंदींच्या आधारे राज्यात अथवा राज्याच्या काही भागात पशुंमध्ये अस्तित्वात असलेल्या आजाराबाबत आगाऊ माहिती मिळून इतर भागात प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे सुलभ होते. त्यामुळे पशुधनाची जिवितहानी तसेच, पशुधनापासून मिळणाऱ्या उत्पन्नावरील विपरीत परिणाम टाळणे शक्य होते. या पार्श्वभुमीवर पशुधनावर दैनंदिन प्रतिबंधात्मक उपचार तसेच, आजारादरम्यान देण्यात येणाऱ्या औषधांबाबतच्या नोंदी (e-Prescription) भारत पशुधन प्रणालीवर नियमितरित्या करण्याबाबत केंद्र शासनाने दि.०८.१२.२०२३ रोजीच्या पत्रान्वये कळविले असून, तसे निर्देश आयुक्त पशुसंवर्धन, पुणे यांना यापूर्वीच देण्यात आले आहेत.
या विभागाच्या दि. ०४.१२.२०२३ रोजीच्या शासन निर्णयान्वये दि. ०१.०४.२०२४ पासून कत्तल होणाऱ्या प्रत्येक पशुचनास ईअर टॅग असणे व त्याची नोंद भारत पशुधन प्रणालीवर करणे बंधनकारक केले आहे.
पशुधनामधील सांसर्गिक रोगांना प्रतिबंध व नियत्रंण करण्याकरिता तसेच “प्राण्यांमधील संक्रामक व सांसर्गिक रोगास प्रतिबंध व नियंत्रण अधिनियम, २००९ च्या प्रभावी अमंलबजावणीसाठी केंद्र शासनाने दिलेल्या निर्देशानुसार सर्व पशुधनास ईअर टॅगिंग करणे व त्याची नोंद भारत पशुधन प्रणालीवर करणे बंधनकारक केले असून, राज्यातील सर्व पशुंच्या बाजारात विक्रीसाठी येणाऱ्या सर्व पशुधनास ईअर टॅगिंग करणे गरजेचे आहे. केंद्र शासनाने दिलेल्या निर्देशांचे अनुपालन करण्याच्या दृष्टिने राज्यातील विविध पशु बाजारांमधून सर्व पशुंची खरेदी-विक्री करताना पशुला ईअर टॅगिंग करुन पशुंची नोंद भारत पशुधन प्रणालीवर घेणे बंधनकारक करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. त्या अनुषंगाने खालीलप्रमाणे शासन निर्णय निर्गमित करण्यात येत आहे.
राज्यातील सर्व पशुचनाची सर्वंकष माहिती एका ठिकाणी उपलब्ध व्हावी, जेणेकरुन संभाव्य साथीच्या रोगाचे अंदाज व त्या दृष्टिने करावयाच्या उपाययोजना यांचे नियोजन करणे तसेच, एखाद्या भागात उद्भवणारे आजार विचारात घेवून उपाययोजना करुन त्यायोगे पशु व पशुजन्य उत्पादनात वाढ करण्याच्या दृष्टिने राज्यातील सर्व पशुधनाचे ईअर टॅगिंग करुन त्यांची नोंदणी भारत पशुचन प्रणालीवर करणे बंधनकारक करण्यात येत आहे.
१. दि.३१.०३.२०२४ पर्यंत राज्यातील सर्व पशुधनाची ईअर टॅगिंग करणे बंधनकारक करण्यात येत आहे. त्यानुसार भारत पशुधन प्रणालीवर सदर माहिती अद्ययावत करण्यात येईल.
२. वि. ०१.०६.२०२४ नंतर ईअर टॅगिंगशिवाय पशुधनाची खरेदी-विक्री करण्यास प्रतिबंध करण्यात येत आहे. पशुपालकांना पशुधनाची ईअर टॅगिंग व त्याची नोंद भारत पशुधन प्रणालीवर असल्याशिवाय खरेदी-विक्री करता येणार नाही.
३. दि.१.०६.२०२४ नंतर ईअर टॅगिंग शिवाय पशुधनास पशुवैद्यकीय संस्था / दवाखान्यांमधून पशुवैद्यकीय सेवा देय होणार नाहीत.
४. जाणीवपूर्वक नष्ट केलेल्या (Forceful Culling) पशुधनाची ईअर टॅगिंग व त्याची नोंद भारत पशुधन प्रणालीवर असल्याशिवाय त्यांना केंद्र व राज्य शासनाकडून देय असलेले आर्थिक सहाय्य देय होणार नाही.
५. नैसर्गिक आपत्ती, विजेचा धक्का तसेच वन्य पशुंच्या हल्यामुळे मृत्युमुखी पडलेल्या पशुधनास ईअर टॅगिंग केलेली नसल्यास नुकसान भरपाईची रक्कम देय होणार नाही.
६. राज्यातंर्गत विक्रीकरिता वाहतुक करण्यात येणाऱ्या राज्यातील पशुधनास ईअर टॅगिंग केल्याचे व त्याची नोंद भारत पशुधन प्रणालीवर घेतल्याची खात्री करूनच संबंधित पशुधन विकास अधिकारी यांनी आरोग्य प्रमाणपत्र, तसेच सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन यांनी वाहतुक प्रमाणपत्र द्यावे.
७. पशुधनाची वाहतूक ईअर टॅगिंग असल्याशिवाय करता येणार नाही. तसे केल्यास पशुधनाचे मालक व वाहतूकदार यांच्यावर नियमानुसार कारवाई करण्यात येईल.
८. राज्यात विक्रीकरिता येणाऱ्या राज्याबाहेरील प्रत्येक पशुधनास ईअर टॅगिंग केल्याची व त्याची नोंद भारत पशुधन प्रणालीवर घेतल्याची खातरजमा तपासणी नाक्यावरील पशुसंवर्धन विभागाच्या अधिकारी / कर्मचारी यांनी करावी. पशुधनास ईअर टॅगिंग केले नसल्यास तपासणी नाक्यावरील पशुसंवर्धन विभागाच्या अधिकारी / कर्मचारी यांनी या पशुधनास ईअर टॅगिंग करून त्याची नोंद भारत पशुधन प्रणालीवर घेण्यात यावी, दि. ०१.०४.२०२४ नंतर बाहेरच्या राज्यातून महाराष्ट्र राज्यात पशुधनाची वाहतूक ईअर टॅगिंगशिवाय करता येणार नाही.
९. दि.०१.०६.२०२४ पासून ईअर टॅग नसलेल्या पशुधनाची बाजार समित्या, आठवडी बाजार व गावा- गावातील खरेदी-विक्री करण्यास प्रतिबंध करण्यात येत आहे. त्यामुळे ईअर टॅग नसलेले पशुचन बाजारसमितीमध्ये आणले जाणार नाहीत व त्यांची खरेदी-विक्री होणार नाही याची दक्षता संबंधित बाजार समिती घेईल.
१०. पशुचनाच्या मालकी हस्तांतरणा (Owner Transfer) बाबतच्या नोंदी संबंधित पशुवैद्यकीय अधिकान्याकडून त्वरीत अद्ययावत करुन घेण्याची जबाबदारी संबंधित पशुपालकाची राहील.
११. ग्रामपंचायतीमध्ये पशुंच्या विक्री किंवा परिवर्तनाचा दाखला देतांना पशुधनाची ईअर टॅगिंग झाल्याशिवाय तो देण्यात येणार नाही. दाखल्यावर ईअर टॅगचा क्रमांक नमूद करण्यात येईल.
आयुक्त पशुसंवर्धन, पुणे, मुख्य कार्यकारी अधिकारी, महाराष्ट्र पशुधन विकास मंडळ, नागपूर, व्यवस्थापकिय संचालक, पुण्यश्लोक अहिल्यादेवी मेंढी व शेळी विकास महामंडळ, सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन, जिल्हा पशुवैदयकीय सर्वचिकित्सालये व तालुका लघुपशुवैद्यकीय सर्वचिकित्सालये, पशुधन विकास अधिकारी, पशुवैद्यकीय दवाखाना श्रेणी-१ आणि सहाय्यक पशुधन विकास अधिकारी / पशुधन पर्यवेक्षक, पशुवैद्यकीय दवाखाना श्रेणी-२ यांनी सदर शासन निर्णयाची अंमलबजावणी तात्काळ होणार आहे.
कृषी, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभाग शासन निर्णय:
राज्यातील सर्व पशुंची Ear Tagging करून त्याची नोंद National Digital Livestock Mission (NDLM) अंतर्गत भारत पशुधन प्रणालीवर घेणे बंधनकारक करणेबाबत शासन निर्णय डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.
वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.
आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी इथे क्लिक करा !!