अन्‍न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागमहाराष्ट्र शासन निर्णय - GRवृत्त विशेषसरकारी योजना

Anandacha Shidha : गौरी-गणपती उत्सवानिमित्त आनंदाचा शिधा !

सणासुदीच्या काळात राज्यातील सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटुंब शिधापत्रिकाधारक तसेच छत्रपती संभाजीनगर व अमरावती विभागातील सर्व जिल्हे व नागपूर विभागातील वर्धा या १४ शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांतील दारिद्र्य रेषेवरील (एपीएल) केशरी शेतकरी शिधापत्रिकाधारकांना सवलतीच्या दरात खाद्यवस्तू उपलब्ध करून देण्याकरीता राज्यात सन २०२२ च्या दिवाळी, सन २०२३ च्या गुढीपाडवा-डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती, गौरी- गणपती उत्सव व दिवाळी, सन २०२४ च्या श्री राम प्राणप्रतिष्ठा सोहळा-छ. शिवाजी महाराज जयंतीनिमित्त प्रतिशिधापत्रिका १ शिधाजिन्नस संच “आनंदाचा शिधा – Anandacha Shidha” वितरीत करण्यात आला आहे.

सदर उपक्रमास राज्यात उत्तम प्रतिसाद लाभला आहे. त्याच धर्तीवर सन २०२४ च्या गौरी-गणपती उत्सवानिमित्त प्रत्येकी १ किलो या परिमाणात रवा, चनाडाळ, साखर व १ लिटर या परिमाणात सोयाबीन तेल या शिधाजिन्नसांचा समावेश असलेला “आनंदाचा शिधा – Anandacha Shidha” प्रतिशिधापत्रिका १ शिधाजिन्नस संच वितरीत करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. त्यानुषंगाने पुढीलप्रमाणे निर्णय घेण्यात येत आहे:-

गौरी-गणपती उत्सवानिमित्त आनंदाचा शिधा ! Anandacha Shidha :

राज्यातील सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटुंब शिधापत्रिकाधारक तसेच छत्रपती संभाजीनगर व अमरावती विभागातील सर्व जिल्हे व नागपूर विभागातील वर्धा या १४ शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांतील दारिद्र्य रेषेवरील (एपीएल) केशरी शेतकरी अशा एकूण १,७०,८२,०८६ शिधापत्रिकाधारकांना “आनंदाचा शिधा – Anandacha Shidha” गौरी-गणपती उत्सवानिमित्त वितरीत करण्यास याद्वारे मान्यता देण्यात येत आहे.

गौरी-गणपती उत्सवानिमित्त प्रत्येकी १ किलो या परिमाणात रवा, चनाडाळ, साखर व १ लिटर या परिमाणात सोयाबीन तेल हे शिधाजिन्नस समाविष्ट असलेला “आनंदाचा शिधा – Anandacha Shidha” प्रतिशिधापत्रिका १ शिधाजिन्नस संच दि. १५ ऑगस्ट, २०२४ ते दि. १५ सप्टेंबर, २०२४ या १ महिन्याच्या कालावधीत ई- पॉस प्रणालीद्वारे ₹ १००/- प्रतिसंच या सवलतीच्या दराने वितरीत करण्यास मान्यता देण्यात येत आहे.

उपरोक्त “आनंदाचा शिधा – Anandacha Shidha” वितरीत करण्याकरीता आवश्यक शिधाजिन्नस खरेदी करण्यासाठी Mahatenders या ऑनलाईन पोर्टलवर निविदा नोटीस प्रसिद्ध झाल्यापासून २१ दिवसांऐवजी ०८ दिवसांच्या कालावधीत निविदा प्रक्रिया राबविण्यास मान्यता देण्यात येत आहे.

गौरी-गणपती उत्सवानिमित्त प्रतिशिधापत्रिका १ शिधाजिन्नस संचांची खरेदी करण्याकरीता परिगणित केलेल्या अंदाजित किंमतीनुसार ₹५४३.२१ कोटी व इतर अनुषंगिक खर्च ₹१९.३ कोटी यासह एकूण १५६२.५१ कोटी इतक्या अंदाजित खर्चास मान्यता देण्यात येत आहे. उपरोक्त प्रयोजनासाठी येणाऱ्या खर्चास वित्त विभागाने निधी उपलब्ध करून देण्यास मान्यता देण्यात येत आहे.

सदर खरेदीसाठी येणारा खर्च ४४०८, अन्न साठवण व वखार यावरील भांडवली खर्च ०१ अन्न, १०१ प्रापण व पुरवठा, ०२ प्रापण, वितरण व किंमत नियंत्रण, (०२) (०१) मुंबई शहर खरेदीची किंमत (अनिवार्य), २१, पुरवठा व सामग्री (४४०८००७७) या लेखाशीर्षाखाली व अनुषंगिक खर्च ४४०८, अन्न साठवण व वखार यावरील भांडवली खर्च ०१ अन्न, १०१ प्रापण व पुरवठा, ०२ प्रापण, वितरण व किंमत नियंत्रण, (०२) (०५) मुंबई शहर अन्नधान्य खरेदीवरील अनुषंगिक खर्च (अनिवार्य) ४४०८०२६४ या लेखाशीर्षखाली मंजूर अर्थसंकल्पिय तरतुदीतून भागविण्याकरीता मान्यता देण्यात येत आहे.

तसेच विक्रीतून जमा होणारी रक्कम लेखाशीर्ष ४४०८०१६६ (मुंबई) व लेखाशीर्ष ४४०८०१७५ (मुफसल) यामध्ये जमा करण्यास मान्यता देण्यात येत आहे. याचप्रमाणे एकूण होणाऱ्या खर्चामधून जमा होणारी रक्कम वजा जाता येणारी तूट (०३) (०७) अन्न धान्य व्यवहारातील तूटीच्या प्रतिपूर्ती अर्थसहाय्यासाठी अनिवार्य (२४०८०४११) ३३, अर्थसहाय्य लेखाशीर्षाखाली उपलब्ध करून देण्यास मान्यता देण्यात येत आहे.

अन्‍न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग शासन निर्णय – Anandacha Shidha GR :

राज्यातील सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत पात्र शिधापत्रिकाधारकांना गौरी-गणपती उत्सवानिमित्त प्रतिशिधापत्रिका 1 शिधाजिन्नस संच आनंदाचा शिधा वितरीत करण्याबाबत शासन निर्णय पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

हेही वाचा – मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा सुधारित शासन निर्णय जारी !

वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.

आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी येथे क्लिक करा !!
शेअर करा:
WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Channel Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.