‘एआय’द्वारे शेतकऱ्यांसाठी उपयुक्त असे एकच मोबाईल अॅप व पोर्टल!
शेतकऱ्यांना त्यांच्या दैनंदिन कृषि व तदनुषंगिक कामे करीत असताना विविध प्रश्न, समस्यांचा सामना करावा लागतो. शेतकऱ्यांना उद्भवणाऱ्या समस्यांचे निवारण एकाच ठिकाणी करण्यासाठी त्यांना कृषि विषयक योजनांची माहिती एकाच ठिकाणी उपलब्ध करुन देणे, योजनांचा लाभ तत्परतेने उपलब्ध करुन देणे, कृषि विषयक योजनांचा लाभ प्राप्त करुन घेण्यासाठी अर्ज करणे इ. सर्व बाबींकरीता एकाच ठिकाणी सुविधा मिळणे आवश्यक आहे. त्यासाठी शेतकऱ्यांना उपयुक्त व सर्वसमावेशक असे कृत्रिम तंत्रज्ञानावर (Artificial intelligence) आधारित Single Window Interface असलेले (AI Farmer App) आणि Interface पोर्टल तयार करण्यासाठी समितीची स्थापना करण्याचे विचाराधीन आहे.
शेतकऱ्यांसाठी उपयुक्त असे एकच मोबाईल अॅप व पोर्टल – AI Farmer App & Portal:
विभागाच्या दि. ३१ जानेवारी, २०२५ रोजीच्या शासन निर्णयानुसार कृषि विभागामार्फत शेतकऱ्यांना सल्ला सेवा देण्याच्या उद्देशाने डिजिटल तंत्रज्ञानावर आधारित “कृषि माहितीसाठी एकच खिडकी” म्हणजेच Single Window Interface SWI तसेच “शेतकऱ्यांसाठी एकच मोबाईल अॅप” (AI Farmer App) तयार करण्याच्या उद्देशाने प्रकल्प संचालक, नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प, मुंबई यांचे अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात आली होती. सदर समितीने यासंदर्भातील अहवाल सादर केला आहे. सदर अहवाल स्वीकृत करण्यात आला आहे.
सदर अहवालातील शिफारशीनुसार राज्यातील मोठ्या संख्येने असलेल्या अल्प व अत्यल्प भूधारक तसेच बहुभूधारक आणि बागायती शेतकऱ्यांना शेतीमधील जोखीम कमी करण्यासाठी विविध प्रकारची अद्ययावत माहिती सहज समजेल अशा स्वरुपात निरंतरपणे उपलब्ध करून देण्याची आवश्यकता आहे.
सध्या उपलब्ध झालेल्या डिजिटल तंत्रज्ञानामुळे शेतकऱ्यांना उत्तम शेती करण्यासाठी आवश्यक असलेल्या विविध प्रकारच्या गरजा भागविण्यासाठी “शेतकऱ्यांसाठी एकच मोबाईल अॅप (AI Farmer App) शक्य तितक्या लवकर विकसित करणे आवश्यक आहे. या अॅप्लिकेशनचा पहिला टप्पा (First Version) १ एप्रिलपर्यंत सुरू करण्याचे आणि मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन करण्याचे नियोजित आहे. त्यासाठी माहितीचे संकलन, वर्गीकरण, पडताळणी, आयटी विकसन, अॅप्लिकेशन टेस्टिंग इत्यादी कामे युद्धपातळीवर करणे आवश्यक आहे.
सदर कामाची वेळेत पूर्तता करण्यासाठी कृषि आयुक्तालय आणि चारही कृषि विद्यापीठे विकसन टप्पा १ (एप्रिल २०२५ पर्यंत) आणि विकसन टप्पा २ (१ मे ते डिसेंबर २०२५) मध्ये सहभागी असतील. या संदर्भात, कृषि विभाग आणि कृषि विद्यापीठाच्या समन्वयाने जलद कृती गट तयार करण्याची आवश्यकता असल्याने, खालीलप्रमाणे निर्णय घेण्यात येत आहे.
राज्यातील मोठ्या संख्येने असलेल्या अल्प व अत्यल्प भूधारक तसेच बहुभूधारक आणि बागायती शेतकऱ्यांना शेतीमधील जोखीम कमी करण्यासाठी विविध प्रकारची अद्ययावत माहिती सहज समजेल अशा स्वरुपात निरंतरपणे उपलब्ध करून देण्यासाठी आणि सध्या उपलब्ध झालेल्या डिजिटल तंत्रज्ञानामुळे शेतकऱ्यांना उत्तम शेती करण्यासाठी आवश्यक असलेल्या विविध प्रकारच्या गरजा भागविण्यासाठी “शेतकऱ्यांसाठी एकच मोबाईल अॅप (AI Farmer App) तयार करण्याकरीता विविध जलद कृती गटांची स्थापना करण्यात येत आहे.
कृषी, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभाग शासन निर्णय:
- सिंगल विंडो इंटरफेस अंतर्गत शेतकऱ्यांसाठी उपयुक्त असे एकच मोबाईल अॅप (AI Farmer App) तयार करण्यासाठी जलद कृती गटाची स्थापना करण्याबाबत (28-02-2025 ) शासन निर्णय पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
- शेतकऱ्यांना उपयुक्त व सर्वसमावेशक असे Single Window Interface असलेले AI Farmer App आणि Interface पोर्टल तयार करणेसाठी समितीचे गठन करणे करण्याबाबत (31-01-2025) शासन निर्णय पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
खालील लेख देखील वाचा !
- शेतकऱ्यांसाठी “अर्ज एक योजना अनेक”, महाडीबीटी पोर्टल योजना – MahaDBT Portal Scheme
- सर्व शेतकरी योजना आता “महाडीबीटी शेतकरी मोबाईल अॅप” वर
- ई-पीक पाहणी ॲपद्वारे खातेदार नोंदणी कशी करायची? सविस्तर माहितीसाठी येथे क्लिक करा!
- ॲग्रिस्टॅक योजनेअंतर्गत फार्मर आयडीसाठी ऑनलाईन नोंदणी कशी करायची? जाणून घ्या सविस्तर माहिती !
- ॲग्रिस्टॅक योजना (Agristack Farmer ID) : डिजिटल सेवांचा वापर करुन शासनाच्या विविध योजनांचा लाभ शेतकऱ्यांना जलद गतीने मिळणार !
- एमएसएएमबी अॅप वर पहा शेतमालाचे बाजारभाव व कृषि पणनविषयक माहिती !
- भारत सरकारच्या “राष्ट्रीय कृषी बाजार – eNAM” अॅप व पोर्टल वर अशी करा कृषी उत्पादनांची ऑनलाइन खरेदी – विक्री !
- भारत सरकारचे दामिनी अॅप वीज पडण्यापूर्वी नागरिकांना करणार सावधान ! – Damini Lightning Alert App
- नैसर्गिक शेतीसाठी केंद्र शासनाची नवीन योजना !
- नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पांतर्गत विविध पोकरा अनुदान योजना
- मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना; आता शेतकऱ्यांना मिळणार मोफत वीज!
- नैसर्गिक संकटात शेतीचं नुकसान झालंय? मग पीक विम्याचा दावा करताना या गोष्टी लक्षात ठेवल्यास नुकसान भरपाई मिळू शकते !
- गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना : शेतकऱ्याचा अपघाती मृत्यू झाल्यास 2 लाख रुपये मदत मिळवण्यासाठी या गोष्टी करा !
- नैसर्गिक आपत्ती – शेती पिके नुकसान भरपाई अनुदानाची स्थिती ऑनलाईन चेक करा !
- सिंचन विहीर ५ लाख रुपयांच्या अनुदानासाठी असा करा ऑनलाईन अर्ज!
वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.
आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी येथे क्लिक करा !!