लागवडीखालील पोटखराब जमिनीची नोंद ॲग्रिस्टॅक योजनेत होणार !
शासनाच्या विविध योजनांचा लाभ पात्र शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्याच्या दृष्टीकोनातून ॲग्रिस्टॅक योजनेअंतर्गत शेतकरी माहिती संच व त्यांचे शेतकरी ओळख क्रमांक (फार्मर आयडी) तयार करण्यात येत आहेत. या योजनेत शेतकऱ्यांना लागवडीखालील पोटखराब (Agristack PotKharab Jamin Nond) क्षेत्र समाविष्ठ करता येणार आहे. यासाठी शेतकऱ्यांनी तात्काळ संबंधित तलाठी व मंडळ अधिकारी यांना संपर्क साधून सातबारा वरील पोटखराब वर्ग अ क्षेत्र हे लागवडीखालील क्षेत्रात रूपांतरित करण्यासाठी विहित प्रक्रिया पार पाडून लागवडी खालील क्षेत्र वाढवण्यात येईल तरी आपण मोठ्या संख्येने फार्मर आयडी तयार करून घेण्यात यावे.
लागवडीखालील पोटखराब जमिनीची नोंद ॲग्रिस्टॅक योजनेत होणार ! Agristack PotKharab Jamin Nond:
ॲग्रिस्टॅकमधील फार्मर आयडी हा लागवडी योग्य क्षेत्राकरिता बनविण्यात येत असल्याने ज्या शेतकऱ्यांनी पोटखराब (Agristack PotKharab Jamin Nond) क्षेत्र लागवडीखाली आणले परंतू साताबारावर नोंद नाही अशा प्रकरणी तलाठी व मंडळ अधिकारी यांच्यामार्फत विहित प्रक्रिया पार पाडून ई-फेरफार प्रणालीव्दारे पोटखराब वर्ग अ क्षेत्र सातबारावर लागवडीखालील क्षेत्रात रूपांतर केले जाईल. या रूपातंरित क्षेत्रामुळे ॲग्रिस्टॅकमधील फार्मर आयडीमध्ये दर्शविलेल्या लागवडीखालील क्षेत्रामध्ये आपोआप वाढ होईल. तसेच भविष्यात होणारे जमीन हस्तांतरणाचे व्यवहार देखील फार्मर आयडीशी आपोआप लिंक होणार आहेत. सर्व शेतकरी बांधवांनी फार्मर आयडी बनवत असतांना आपले कोणत्याही प्रकारे सातबारावरील क्षेत्र कमी दाखविले जाणार नाही याची दक्षता घेवून शेतकऱ्यांनी लवकरात लवकर आपला फार्मर आयडी जवळच्या जन सेवा केंद्र (सीएससी) येथे जावून तयार करून घ्यावा.
अद्ययावतीकरण चालू राहणार
ॲग्रिस्टॅक योजनेअंतर्गत फार्मर आयडीमध्ये पोटखराब (Agristack PotKharab Jamin Nond) खालील लागवडीची जमीन अथवा 7/12 मधील अन्य बदल दर्शविण्याची प्रक्रिया व अद्ययावतीकरण निरंतरपणे चालू राहणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी सद्यस्थितीत जवळच्या जन सेवा केंद्र (सीएससी) येथे जावून फार्मर आयडी तयार करून घ्यावा.
योजनांच्या लाभ वितरणात येणार सुलभता
सदर ॲग्रिस्टॅक योजनेंतर्गत शेतकऱ्यांना विविध सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी कृषि व संलग्न विभागांना शेतकऱ्यांचा व त्यांच्या शेताचा आधार संलग्न माहिती संच (फार्मर रजिस्ट्री) तयार करण्यात येत असून उपलब्ध आकडेवारीच्या आधारे शेतकरी बांधवांना विविध योजनांचा लाभ वितरित करण्यामध्ये सुलभता येणार आहे. तसेच लाभार्थ्यांना वारंवार प्रमाणिकरण अर्थात ई-केवायसीची आवश्यकता राहणार नाही.
फार्मर आयडी नाही तर लाभ मिळणार नाही
ॲग्रिस्टॅक योजनेअंतर्गत शेतकऱ्यांनी आपला सातबारा आधारला लिंक करुन फार्मर आयडी तयार करुन घ्यायचा आहे. फार्मर आयडी बनवला नाही तर पीक विमा, पीक कर्ज. पीएम किसान व विविध पीक अनुदान यांचा लाभ मिळणार नाही. त्यामुळे तात्काळ न चुकता कोणाचीही वाट न पाहता विनाविलंब शेतकऱ्यांनी आधार आयडी क्रमांक ॲग्रिस्टॅक प्रणालीवर नोंद करावी.
नोंदणी करा
ॲग्रिस्टॅक योजनेअंतर्गत फार्मर आयडी नोंदणीकरिता शेतकऱ्यांनी जवळच्या जन सेवा केंद्र (सीएससी) अथवा तलाठी, मंडळ अधिकारी अथवा तहसिलदार यांना संपर्क करावा.
या लेखात, आम्ही लागवडीखालील पोटखराब (Agristack PotKharab Jamin Nond) जमिनीची नोंद ॲग्रिस्टॅक योजनेत होणार ! या विषयीची संपूर्ण माहिती दिली आहे. मला आशा आहे की तुम्हाला हा लेख आवडला असेल. तुम्हाला हा लेख आवडला तर नक्की शेअर करा. तुम्हाला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया टिप्पणी द्या.
पुढील लेख देखील वाचा!
- ॲग्रिस्टॅक योजनेअंतर्गत फार्मर आयडीसाठी ऑनलाईन नोंदणी कशी करायची? जाणून घ्या सविस्तर माहिती !
- ॲग्रिस्टॅक योजना (Agristack Farmer ID) : डिजिटल सेवांचा वापर करुन शासनाच्या विविध योजनांचा लाभ शेतकऱ्यांना जलद गतीने मिळणार !
- प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेसाठी ऑनलाईन नोंदणी कशी करायची? जाणून घ्या सविस्तर माहिती !
- किसान क्रेडिट कार्डसाठी असा करा ऑनलाईन अर्ज !
- आंबिया बहार फळ पीक विमा योजना : फळ पीक विमा योजनेसाठी असा करा ऑनलाईन अर्ज !
- E-Peek Pahani DCS App : ‘डिजिटल क्रॉप सर्व्हे’ हे सुधारित ई-पीक पाहणी व्हर्जन -३ ॲप शेतकऱ्यांसाठी उपलब्ध!
- नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पांतर्गत विविध पोकरा अनुदान योजना – PoCRA Scheme.
- PM किसान व नमो शेतकरी योजनांच्या लाभा पासून वंचित असणाऱ्या शेतकऱ्यांना आनंदाची बातमी!
- PMKISAN नोंदणीकृत शेतकऱ्यांची OTP आधारित eKYC प्रोसेस घरबसल्या कशी करायची? जाणून घ्या सविस्तर माहिती (PMKisan OTP Based eKYC)
- योजनांच्या लाभासाठी बँक खाते आधार नंबरला ऑनलाईन/ऑफलाईन लिंक करण्याची सविस्तर प्रोसेस !
- नमो शेतकरी महासन्मान निधी योजना खात्याचे किंवा २००० हप्त्याचे स्टेट्स ऑनलाईन चेक करा !
- पीएम किसान योजनेच्या खात्याचा मोबाईल नंबर अपडेट करण्याची प्रोसेस !
- प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेसाठी ऑनलाईन नोंदणी कशी करायची? जाणून घ्या सविस्तर माहिती !
- प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना खात्याचे किंवा २००० हप्त्याचे स्टेट्स ऑनलाईन चेक करा !
- प्रधानमंत्री किसान योजने संदर्भात तक्रार कशी आणि कुठे करावी? जाणून घ्या सविस्तर माहिती
- PM-Kisan अंतर्गत लाभार्थ्यांच्या नवीन यादीमध्ये आपले नाव ऑनलाईन तपासा!
- आता शेतकऱ्यांना मिळणार विनाहमी २ लाख रुपयांचे पीक कर्ज!
- गाव नमुना सातबारा (७/१२) उतारा म्हणजे काय? सातबारा उताऱ्या विषयीची संपूर्ण माहिती !
आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी येथे क्लिक करा !!