ॲग्रिस्टॅक फार्मर आयडी अपडेट करण्याची ऑनलाईन प्रोसेस !
“ॲग्रिस्टॅक फार्मर आयडी” (Agristack Farmer ID) संदर्भात माहिती अपडेट (Agristack Farmer ID Update) करण्यासाठी खालील प्रक्रिया वापरता येते. सध्या कृषी विभागाकडून राज्य पातळीवर डिजिटल कृषी डाटाबेस तयार केला जात आहे, आणि ‘AgriStack’ ही त्यातील एक महत्वाची योजना आहे. यातून शेतकऱ्यांची माहिती डिजिटल स्वरूपात संकलित केली जाते. जर एखाद्याचे AgriStack Farmer ID तयार झाले असेल आणि त्यातील माहिती (Agristack Farmer ID Update) अपडेट करायची असेल, तर खालीलप्रमाणे करा.
शेतकरी बांधवांनो, आपल्या शेतीच्या विकासासाठी आणि सरकारी योजनांचा सहज लाभ घेण्यासाठी शासनाने ‘अॅग्रीस्टॅक’ (Agristack Farmer ID) म्हणजेच शेतकरी ओळखपत्र क्रमांक देण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. या क्रमांकामुळे आपल्या जमिनीची माहिती आधार क्रमांकाशी जोडली जाईल आणि शेतकऱ्यांसाठी असलेल्या विविध सरकारी योजनांचा लाभ सहज मिळणार आहे.
ॲग्रिस्टॅक (Agristack Farmer ID) हे कृषि क्षेत्रात डेटा आणि डिजिटल सेवा वापरुन शासनाच्या विविध योजनांचा लाभ पात्र शेतकऱ्यांपर्यंत जलद गतीने व परिणामकारकरित्या पोहचण्यासाठी स्थापित केले जाणारे डिजिटल फाउंडेशन आहे. कृषि क्षेत्रासाठी सर्वसमावेशक डिजिटल पायाभूत सुविधा निर्माण करणे हा ॲग्रिस्टॅक (Agristack Farmer ID) उपक्रमाचा उद्देश आहे. या प्रकल्पामुळे माहिती आधारित योग्य निर्णय घेणे, गरजू शेतकऱ्यांना योग्य वेळी सेवा प्रदान करणे, कृषि उपक्रमांची कार्यक्षमता सुधारणे शक्य होईल. विविध शेतकरी आणि कृषि-केंद्रित योजनांची आखणी करणे व अंमलबजावणी करणे सुलभ होईल.
ॲग्रिस्टॅक फार्मर आयडी अपडेट करण्याची ऑनलाईन प्रोसेस ! – Agristack Farmer ID Update:
ॲग्रिस्टॅक योजनेअंतर्गत फार्मर आयडी ऑनलाईन (Agristack Farmer ID Update) दुरुस्ती करण्यासाठी खालील वेबसाईवर क्लिक करा.
https://mhfr.agristack.gov.in/farmer-registry-mh/#/
वेबसाईट ओपन केल्यानंतर उजव्या बाजूला Log in as मध्ये दोन पर्याय दिसतील, त्यापैकी Farmar या पर्यायावरती क्लिक करून ओटीपी व कॅप्चा टाकून Log in वरती क्लिक करायचे आहे.
यानंतर नवीन पेजवर Farmer Registry मध्ये Update My Information या पर्यायावर क्लिक करा.

Update My Information या पर्यायावर क्लिक केल्यावर मोबाईल नंबर बदल (Agristack Farmer ID Update) करण्यासाठी विचारेल यासाठी जुना मोबाईल नंबर टाकून Verify करून ओटीपी टाकायचा आहे व नवीन मोबाईल नंबर टाकून Verify करून ओटीपी टाकायचा आहे.
तसेच यामध्ये जमिनीबाबत काही दुरुस्ती करायची असेल ती पण करू शकतो किंवा अजून नवीन जमीन ऍड करायची असेल ती पण येथे करू शकतो, त्यासाठी Add New Land (Owned) या पर्यायावर क्लिक करून त्यामध्ये राज्य, जिल्हा, तालुका, गाव टाकून जमिनीची माहिती टाकून Update करायच आहे.
तसेच KYC मध्ये काही बदल (KYC Agristack Farmer ID Update) करायचे असतील तर तेही इथे करू शकता.
या लेखात, आम्ही ॲग्रिस्टॅक फार्मर आयडी (Agristack Farmer ID Update) अपडेट करण्याची ऑनलाईन प्रोसेस ! या विषयीची संपूर्ण माहिती दिली आहे. मला आशा आहे की तुम्हाला हा लेख आवडला असेल. तुम्हाला हा लेख आवडला तर नक्की शेअर करा. तुम्हाला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया टिप्पणी द्या.
पुढील लेख देखील वाचा!
- ॲग्रिस्टॅक फार्मर आयडीचे स्टेटस ऑनलाईन कसे चेक करायचे? जाणून घ्या सविस्तर माहिती!
- ॲग्रिस्टॅक योजनेअंतर्गत फार्मर आयडीसाठी ऑनलाईन नोंदणी कशी करायची? जाणून घ्या सविस्तर माहिती !
- ॲग्रिस्टॅक योजना (Agristack Farmer ID) : डिजिटल सेवांचा वापर करुन शासनाच्या विविध योजनांचा लाभ शेतकऱ्यांना जलद गतीने मिळणार !
- ॲग्रिस्टॅक फार्मर आयडी यादी अशी करा डाउनलोड !
- लागवडीखालील पोटखराब जमिनीची नोंद ॲग्रिस्टॅक योजनेत होणार !
- ‘नमो किसान सन्मान निधी योजनें’तर्गत ३ हजार रुपये वाढविणार!
- प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेसाठी ऑनलाईन नोंदणी कशी करायची? जाणून घ्या सविस्तर माहिती !
- PM किसान व नमो शेतकरी योजनांच्या लाभा पासून वंचित असणाऱ्या शेतकऱ्यांना आनंदाची बातमी!
- किसान क्रेडिट कार्डसाठी असा करा ऑनलाईन अर्ज !
- आंबिया बहार फळ पीक विमा योजना : फळ पीक विमा योजनेसाठी असा करा ऑनलाईन अर्ज !
- E-Peek Pahani DCS App : ‘डिजिटल क्रॉप सर्व्हे’ हे सुधारित ई-पीक पाहणी व्हर्जन -३ ॲप शेतकऱ्यांसाठी उपलब्ध!
- नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पांतर्गत विविध पोकरा अनुदान योजना – PoCRA Scheme.
- PMKISAN नोंदणीकृत शेतकऱ्यांची OTP आधारित eKYC प्रोसेस घरबसल्या कशी करायची? जाणून घ्या सविस्तर माहिती (PMKisan OTP Based eKYC)
- प्रधानमंत्री किसान योजने संदर्भात तक्रार कशी आणि कुठे करावी? जाणून घ्या सविस्तर माहिती
- प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेसाठी ऑनलाईन नोंदणी कशी करायची? जाणून घ्या सविस्तर माहिती !
- पीएम किसान योजनेच्या खात्याचा मोबाईल नंबर अपडेट करण्याची प्रोसेस !
- ‘एआय’द्वारे शेतकऱ्यांसाठी उपयुक्त असे एकच मोबाईल अॅप व पोर्टल!
- नैसर्गिक संकटात शेतीचं नुकसान झालंय? मग पीक विम्याचा दावा करताना या गोष्टी लक्षात ठेवल्यास नुकसान भरपाई मिळू शकते !
- गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना : शेतकऱ्याचा अपघाती मृत्यू झाल्यास 2 लाख रुपये मदत मिळवण्यासाठी या गोष्टी करा !
आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी येथे क्लिक करा !!