ऍडव्हान्स पीएफ रक्कम काढण्यासाठी ऑनलाइन क्लेम अर्ज कसा करायचा? जाणून घ्या सविस्तर माहिती !
आपल्यावर ओढावलेल्या काही विशिष्ट आर्थिक बिकट परिस्थितीत आपल्या पीएफ अकाउंटमधून ऍडव्हान्स (Advance PF) रक्कम काढण्याची सुविधा कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना (ईपीएफओ) ही देते. ईपीएफ रकमेचा काही विशिष्ट भाग (Advance PF) ऍडव्हान्स काढून घेता येऊ शकतो. ईपीएफओ सदस्य पीएफची रक्कम घर खरेदी करण्यासाठी किंवा बांधकामासाठी, कर्जाची रक्कम भरण्यासाठी, दोन महिन्यांचे पगार न मिळाल्यास, मुलगी / मुलगा / भाऊ / स्वत:चे लग्न, कुटुंबातील सदस्यांचे आजार आदी परिस्थितीतही रक्कम काढू शकता.
आंशिक “पैसे काढणे’ किंवा “ऍडव्हान्स ईपीएफ – Advance PF’ द्वारे कोणत्याही परिस्थितीत किती रक्कम काढली जाऊ शकते त्याबाबत अनेकजण अनभिज्ञ असतात. ऍडव्हान्स रक्कम हवी असेल तर ईपीएफओ सदस्याला काही निकष पूर्ण करावे लागतात. आगाऊ किंवा अंशतः पैसे काढण्यासाठी ईपीएफओ सदस्य पोर्टलला भेट देऊन “PF Withdrawl Form’साठी ऑनलाइन अर्ज करू शकतात.
पैसे काढण्यासाठी अर्ज करण्याची पात्रता:
ऑनलाईन क्लेमसाठी अर्ज करण्यासाठी, ईपीएफ खातेधारकाने या तीन अटी पूर्ण केल्या पाहिजेत:
अ) EPF सदस्याचा युनिव्हर्सल अकाउंट नंबर (UAN) सक्रिय केला जाणे आवश्यक आहे
ब) आधार क्रमांक सत्यापित केला पाहिजे आणि UAN शी जोडला गेला पाहिजे
क) योग्य IFSC असलेल्या EPF सदस्याचे बँक खाते UAN बरोबर सीड केले जावे.
एम्प्लॉईज प्रॉव्हिडंट फंड ऑर्गनायझेशन (EPFO) द्वारा जारी केलेल्या सामान्य प्रश्नांनुसार सदस्याने किंवा त्याच्या मालकाकडून त्याचा लाभ घेण्यासाठी कोणतेही प्रमाणपत्र किंवा कागदपत्रे सादर केली जात नाहीत. तथापि, ईपीएफ खात्यातून पैसे काढण्यासाठी ऑनलाईन अर्ज करतांना एखाद्या व्यक्तीने चेकची स्कॅन केलेली प्रत तयार ठेवली पाहिजे. स्कॅन केलेली कॉपी स्पष्ट व वाचनीय आहे याची खात्री करा.
ऍडव्हान्स पीएफ रक्कम काढण्यासाठी ऑनलाइन क्लेम अर्ज करण्याची प्रोसेस – Advance PF Online Withdrawal Process:
प्रथम खालील अधिकृत ईपीएफओ पोर्टलवर जा.
https://unifiedportal-mem.epfindia.gov.in/memberinterface/
EPF Member e-Sewa पोर्टल ओपन झाल्यावर आपला UAN, पासवर्ड आणि कॅप्चा कोड प्रविष्ट करुन आपल्या खात्यात लॉगिन करा. त्यानंतर मॅनेज टॅबमधील केवायसी पर्यायावर क्लिक करा आणि आधार, पॅनकार्ड व मागील तपशील योग्य व बरोबर आहे की नाही ते तपासून पाहा.
केवायसी तपशिलाची पडताळणी केल्यानंतर “Online Services” या टॅब वर जा व “Form -31, 19,10C and 10D” या पर्यायावर क्लिक करा.
तुमच्या पेजवर सदस्याचा तपशील, केवायसीचा तपशील आणि सेवेचा तपशील दिसून येईल त्यामध्ये बँक खाते नंबर व्हेरिफाय करा व पुढे क्लेम फॉर्म सबमिट करण्यासाठी “Proceed For Online Claim‘वर क्लिक करा.
ऍडव्हान्स पीएफ (Advance PF) काढण्यासाठी क्लेम फॉर्ममध्ये “I Want To Apply For‘ टॅब मध्ये ‘PF Advance Form -31′ क्लेम फॉर्म निवडा .
ज्या उद्देशासाठी ऍडव्हान्स (Advance PF) पीएफ आवश्यक आहे ते कारण निवडा व आवश्यक रक्कम प्रविष्ट करा आणि चेकची स्कॅन केलेली प्रत अपलोड करा आणि आपला पत्ता प्रविष्ट करा.
आधारवर नोंदणीकृत आपल्या मोबाइल क्रमांकावर एक-वेळ संकेतशब्द (ओटीपी) पाठविला जाईल. एसएमएसद्वारे प्राप्त केलेला ओटीपी प्रविष्ट करा.
एकदा ओटीपी यशस्वीरित्या सबमिट झाल्यानंतर दावा विनंती देखील सादर केली जाईल. जर ईपीएफओने तपशील जुळविला आणि आपला दावा स्वीकारला तरच हे पैसे आपल्या बँक खात्यात जमा केले जातील.
EPF Claim स्थिती कशी तपासावी?
आपण दाखल केलेल्या दाव्याची (Advance PF) स्थिती तपासण्यासाठी आपण सदस्य ई-सेवा पोर्टलवर आपल्या खात्यात लॉग इन करू शकता. ‘ऑनलाईन सेवा’ टॅब अंतर्गत ‘Track Claim status‘ वर क्लिक करून आपण पीएफ (Advance PF) स्थिती तपासू शकता.
पीएफ कधी जमा होतो:
ऍडव्हान्स पीएफ (Advance PF) जमा होण्यासाठी जवळपास चार-पाच दिवसांमध्ये मध्ये आपल्या बँक खात्यावर PF जमा झाल्याचा मेसेज येईल. तसेच पासबुक देखील अपडेट केले जाईल. पीएफ जमा होण्यास विलंब लागत असेल तर आपण EPFO च्या विभागीय कार्यालयात फोन करू शकता अथवा आपल्या एम्प्लॉयरकडे संपर्क करू शकता.
पुढील लेख देखील वाचा!
- ईपीएफओ पोर्टल वरून यूएएन (UAN) नंबर कसे सक्रिय करावे? जाणून घ्या सविस्तर माहिती
- भविष्य निर्वाह निधी (पीएफ) अकाउंटचे केवायसी अपडेट करण्याची ऑनलाईन प्रोसेस जाणून घ्या सविस्तर माहिती !
- आपले ईपीएफ पासबुक (EPF Passbook) कसे डाउनलोड करावे? जाणून घ्या सविस्तर माहिती
- भविष्य निर्वाह निधी ऑनलाईन कसा काढावा? जाणून घ्या सविस्तर ऑनलाईन प्रोसेस (PF-Provident Fund)
- ईपीएफ मध्ये ई-नामांकन कसे जोडावे? जाणून घ्या सविस्तर माहिती – Add E-Nomination in EPF
- भविष्य निर्वाह निधी अकाऊंट संदर्भात तक्रार कशी आणि कुठे करावी? जाणून घ्या सविस्तर माहिती
- EPFO : जन्मतारखेच्या पुराव्यासाठी आधार कार्ड आता अग्राह्य ‘कर्मचारी भविष्य निर्वाह’ चा निर्णय !
- EPFO New Rule 2024 : आता तुमच्या पीएफ खात्यातून ५० हजारांऐवजी १ लाखांपर्यंत अँडव्हान्स पैसे काढू शकता !
- भविष्य निर्वाह निधी – पीएफ देत आहे ७ लाख रुपयांचे विमा संरक्षण, जाणून घ्या सविस्तर माहिती !
- PF Loyalty Bonus : EPFO तर्फे खातेधारकांना मिळणार ५० हजार रुपयांचा बोनस !
- भविष्य निर्वाह निधीवर 8.25% दराने व्याजदर देण्याचा विश्वस्त मंडळाचा निर्णय
- भविष्य निर्वाह निधी (PF) खात्यातून मिळणारे व्याजच्या नवीन आयकर नियमामध्ये मोठा बदल
- पीएफ सदस्याचे सदस्य प्रोफाइल अपडेट किंवा त्यात सुधारणा करण्यासाठी ऑनलाइन फाइलिंगसाठी नवीन सॉफ्टवेअर कार्यप्रणालीचा प्रारंभ !
वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.
आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी इथे क्लिक करा !!