आपले सरकार - महा-ऑनलाईनमाहिती तंत्रज्ञान विभागवृत्त विशेषसामान्य प्रशासन विभाग

आपले सरकार सेवा केंद्रांची संख्या वाढणार व नागरिकांना आता घरपोच सेवा मिळणार!

राज्यात झपाट्याने डिजिटलायझेशन व्हावे आणि राज्यातील ग्रामीण व शहरी भागातील नागरिकांना शासकीय सेवा अधिक सुलभ रीतीने उपलब्ध करून देण्यासाठी ‘आपले सरकार सेवा केंद्रे – (Aapale Sarkar Seva Kendra)’ यांचे जाळे विस्तारीत करण्यात येणार असून सेवा केंद्राची संख्या वाढविण्यात येणार असल्याची माहिती तंत्रज्ञान मंत्री ॲड.आशिष शेलार यांनी विधानपरिषदेत निवेदनाद्वारे दिली.

आपले सरकार सेवा केंद्रांची संख्या वाढणार व नागरिकांना आता घरपोच सेवा मिळणार! Aapale Sarkar Seva Kendra:

माहिती तंत्रज्ञान विभागाच्या सुधारित निर्णयानुसार, लोकसंख्या आणि प्रशासनाच्या गरजेनुसार सेवा केंद्रांची (Aapale Sarkar Seva Kendra) संख्या वाढविण्यात येणार असल्याचे सांगत याबाबतचे सुधारित निकष मंत्री ॲड.शेलार यांनी जाहीर केले.

सुधारित निकषानुसार ग्रामपंचायत स्तरावर ५००० पेक्षा कमी लोकसंख्या असलेल्या ग्रामपंचायतींसाठी १ ऐवजी २ सेवा केंद्रे तर ५००० पेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या ग्रामपंचायतींसाठी २ ऐवजी ४ सेवा (Aapale Sarkar Seva Kendra) केंद्रे देण्यात देणार आहेत. बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रात २५००० लोकसंख्येसाठी १ ऐवजी २ केंद्रे तर इतर महानगरपालिका व नगरपरिषद क्षेत्रांमध्ये १०००० लोकसंख्येसाठी १ ऐवजी २ सेवा केंद्रे देण्यात येणार असल्याचे मंत्री ॲड.शेलार यांनी जाहीर केले.

ग्रामीण भागातील सेवा (Aapale Sarkar Seva Kendra) केंद्राबाबत प्रत्येक नगर पंचायतीसाठी १ ऐवजी २ सेवा केंद्रे तर ५००० पेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या नगर पंचायतींसाठी २ ऐवजी ४ सेवा केंद्रे असा विस्तार केला जाणार आहे.

सध्या आपले सरकार (Aapale Sarkar Seva Kendra) सेवा केंद्रांवरील सेवा शुल्क रु. २०/- इतके असून, २००८ पासून या दरात कोणतीही वाढ करण्यात आलेली नव्हती. वाढती महागाई आणि सेवा केंद्र चालकांच्या मागणीच्या अनुषंगाने सेवा शुल्क रु. ५०/- करण्यात येणार आहे.

सुधारित निकष:
  • ५ हजार पेक्षा कमी लोकसंख्या प्रत्येक ग्रामपंचायत क्षेत्रात -सेवा केंद्रांची संख्या – २, ज्या ग्रामपंचायतीची लोकसंख्या ५हजार  पेक्षा अधिक लोकसंख्या (२०११ च्या जनगणनेनुसार) – ४, बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्र – १२हजार ५०० लोकसंख्येसाठी – २,
  • इतर महानगरपालिका व नगरपरिषद – १० हजार लोकसंख्येसाठी – २, प्रत्येक नगरपंचायत क्षेत्रात – २
  • ५ हजार पेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या नगर पंचायतीत – ४ असे असणार आहेत.
सेवा शुल्काचे नवीन विभाजन पुढीलप्रमाणे –
  • राज्य सेतू केंद्राचा वाटा: 5% (₹2.5)
  • महाआयटी वाटा: 20% (₹10)
  • जिल्हा सेतू सोसायटीचा वाटा: 10% (₹5)
  • आपले सरकार (Aapale Sarkar Seva Kendra) सेवा केंद्र चालक (VLE) वाटा: 65% (₹32.50)

नागरिकांना अधिक सुलभ सेवा मिळण्यासाठी घरपोच वितरण सेवा सुरू करण्यात येणार असल्याचे देखील मंत्री ॲड.शेलार यांनी सांगितले. घरपोच भेटीसाठी सेवा शुल्क 100रु प्रति नोंदणी (कर वगळून). तसेच महाआयटी सेवा दर 20%, सेवा केंद्र चालक सेवा दर 80% याशिवाय प्रति अर्ज अतिरिक्त शुल्क ₹50/- असेल, असे देखील मंत्री ॲड.शेलार यांनी सांगितले.

हा बदल लोकांना अधिक चांगल्या सुविधा आणि केंद्र चालवणाऱ्यांना आर्थिक स्थैर्य देण्यासाठी असून, याद्वारे शासनाच्या निधीतही  वाढ होणार असल्याचे मंत्री ॲड शेलार यांनी यावेळी सांगितले.

अधिकृत वेबसाईट: अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

सामान्य प्रशासन विभाग शासन निर्णय:

आपले सरकार सेवा केंद्रांची संख्या दुप्पट करणे, सेवा केंद्रांवरुन देण्यात येणाऱ्या सेवांच्या दरात सुधारणा करणे व घरपोच सेवेबाबत शासन निर्णय पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

या लेखात, आम्ही आपले सरकार सेवा केंद्र (Aapale Sarkar Seva Kendra) व घरपोच सेवा विषयीची संपूर्ण माहिती दिली आहे. मला आशा आहे की तुम्हाला हा लेख आवडला असेल. तुम्हाला हा लेख आवडला तर नक्की शेअर करा. तुम्हाला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया टिप्पणी द्या.

पुढील लेख देखील वाचा!

  1. कॉमन सर्विस सेंटर (सीएससी) मध्ये दिल्या जाणाऱ्या विविध सेवा आणि त्यांच्या वेबसाईट लिंक !
  2. आधार सेंटर सुरु करण्यासाठी ऑपरेटर/पर्यवेक्षक सर्टिफिकेट ऑनलाईन काढण्याची प्रोसेस!
  3. CSC सेंटर साठी असा करा ऑनलाईन नोंदणी अर्ज!
  4. CSC सेंटर साठी असा करा ऑनलाईन TEC कोर्स !
  5. आधार अपडेट सेंटरसाठी असा करा ऑनलाईन नोंदणी अर्ज (CSC Aadhaar UCL Center)
  6. ग्रामपंचायत मध्ये आपले सरकार सेवा केंद्रचालक (ऑपरेटर)साठी ऑनलाईन अर्ज कसा करायचा ? जाणून घ्या सविस्तर प्रोसेस!
  7. CSC ट्रान्सपोर्ट पोर्टल नवीन पोर्टल सुरु; आता CSC सेंटर मध्ये होणार RTO ची सर्व कामे ! – CSC Transport Services
  8. CSC सेंटर मध्ये दिल्या जाणाऱ्या विविध सेवा आणि त्यांच्या वेबसाईट लिंक!
  9. CSC VLE साठी सुवर्ण संधी; रिटेल मेडिकल स्टोअर उघडू इच्छिता? मग अशी करा ऑनलाईन नोंदणी!
  10. राज्यातील महाविद्यालयांत आपले सरकार सेवा केंद्र होणार सुरु!
  11. आपले सरकार पोर्टलवर नवीन युजर नोंदणी कशी करायची? जाणून घ्या सविस्तर माहीती!
  12. घरबसल्या घ्या विविध सरकारी सेवांचा ऑनलाईन लाभ!

वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.

आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी इथे क्लिक करा !!

शेअर करा:
WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Channel Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.