आधार सेंटर सुरु करण्यासाठी ऑपरेटर/पर्यवेक्षक सर्टिफिकेट ऑनलाईन काढण्याची प्रोसेस!
आपण जर आधार सेंटर सुरू करण्याचा विचार करत असाल तर आपल्याकडे ऑपरेटर/पर्यवेक्षक सर्टिफिकेट (Aadhar Operator Certificate) असणे गरजेचं आहे; जे आधार NSEIT परीक्षेद्वारे मिळवले जाते. आपण या लेखात आधार सेंटर सुरु करण्यासाठी ऑपरेटर/पर्यवेक्षक सर्टिफिकेट (Aadhar Operator Certificate) ऑनलाईन काढण्याची सविस्तर प्रोसेस पाहणार आहोत.
आधार सेंटर सुरु करण्यासाठी ऑपरेटर/पर्यवेक्षक सर्टिफिकेट ऑनलाईन काढण्याची प्रोसेस! Aadhar Operator Certificate:
आधार NSEIT ऑपरेटर / पर्यवेक्षक परीक्षा (Aadhar Operator Certificate) देण्यासाठी सर्वप्रथम अँप्लिकेशन फॉर्म भरावा लागेल. त्यासाठी खालील आधार NSEIT ऑपरेटर / पर्यवेक्षक परीक्षा (Aadhar Operator Certificate Portal)पोर्टल लिंकवर क्लिक करा.
https://uidai.nseitexams.com/UIDAI/LoginAction_input.action
इथे जर तुमचं अकाउंट असेल तर तुम्ही User ID व पासवर्ड टाकून लॉगिन करू शकतात व ज्यांचं अकाउंट नाहीये ते Create New User वरती क्लिक करून आपले अकाउंट ओपन करायचे आहे. त्यासाठी Upload XML File वर क्लिक करून तुम्हाला XML File Upload करायची आहे.
XML File मिळवण्यासाठी आपल्याला खालील आधार वेबसाईट वरती क्लिक करायचे आहे.
https://myaadhaar.uidai.gov.in/portal
वेबसाईट वरती आल्यानंतर login वरती क्लिक करून आपला आधार नंबर, कॅप्चा व ओटीपी टाकून लॉगिन करायचे आहे.
त्यानंतर Offline eKYC या पर्यायावरती क्लिक करायचे आहे; नंतर Create a Share Code वरती क्लिक करून चार अंकी एक पिन टाकायचा आहे व तो लक्षात ठेवायचा आहे; तसेच पुढे डाउनलोड पर्यायावरती क्लिक करायचे आहे. त्यानंतर ती XML File Save करून ठेवायची आहे.
पुन्हा अगोदरच्या आधार NSEIT ऑपरेटर / पर्यवेक्षक परीक्षा (Aadhar Operator Certificate) पोर्टल लिंक वेबसाईट वर यायचे आहे व Upload XML File वरती क्लिक करून तुम्हाला XML File Upload करायची आहे व चार अंकी पिन टाकून Extract पर्यायावरती क्लिक करायचे आहे.
Extract झाल्यानंतर मोबाईल नंबर टाकून Validate वरती क्लिक करून Send Mobile OTP वरती क्लिक करायचे आहे; त्यानंतर OTP टाकून Verify OTP वरती क्लिक करायचे आहे.
पुढे Declaration वरती क्लिक करून Email ID टाकून Show XML Content या पर्यायावरती क्लिक करायचे आहे.
येथे तुम्हाला आधार वरची सर्व माहिती दाखविली जाईल ती चेक करून Confirm वरती क्लिक करायचे आहे.
Confirm केल्यानंतर तुमचं अकाउंट येथे उघडलेले आहे, तेथे आपल्याला User ID व पासवर्ड आलेला दिसेल तो नोट करून घ्या व Please click here to Login वरती क्लिक करायचे आहे.
Login वरती आल्यानंतर आपल्याला मिळालेला User ID व पासवर्ड टाकून sign in वरती क्लिक करून तुम्ही पासवर्ड change करून घ्यायचा आहे, त्यासाठी Change Password वरती क्लिक करायचे आहे. त्यानंतर Declaration वाचुन क्लिक करून Continue पर्यायावरती क्लिक करायचे आहे.
त्यानंतर नवीन पेज वर आपली सगळी माहिती दिसेल, त्याखाली ज्याला ऑपरेटर/पर्यवेक्षक (Aadhar Operator Certificate) सर्टिफिकेट पाहिजे आहे त्याची Basic Details टाकायची आहेत, त्यामध्ये शिक्षण, Level of Exam मध्ये ECMP Operator cum Supervisor टाकायचा आहे तसेच, कोणत्या भाषेतून आपण परीक्षा (Aadhar Operator Certificate Exam) देणार आहेत ती भाषा निवडा. त्याखाली आपल्याला Enrolment Agency code व Registrar code हे पर्याय दिसतील, तर आपल्याला जे Authorization Letter आले असेल त्यामध्ये हे कोड असतात ते टाकायचे आहेत.
त्यानंतर Personal Details मध्ये Test State, Test City, Test Center Name टाकून Save & Continue पर्यायावरती क्लिक करायचे आहे.
त्यानंतर Educational Document upload करायची आहेत, त्याखाली Authorization Letter upload करायचे आहे, हे Authorization Letter आपल्याला Post office, CSC, MAHAonline यांच्याकडून आपल्याला घ्यावं लागेल, हे Authorization Letter आपल्याला तीच कंपनी देईल जी आपल्याला आधार सेंटर देणार आहे. त्यानंतर Authorization Letter upload करून Continue पर्यायावरती क्लिक करायचे आहे.
क्लिक केल्यानंतर सर्व माहिती चेक करा व Proceed to submit form वरती क्लिक करायचे आहे. त्यानंतर Declaration वरती क्लिक करून Submit Application Form वरती क्लिक करायचे आहे.
त्यानंतर वरती Payment पर्यायावरती क्लिक करायचे आहे, त्यामध्ये आपल्याला फॉर्म मध्ये काही बदल करायचे असतील तर करू शकता अन्यथा Online वरती क्लिक करून Proceed to Pay वरती क्लिक करून Debit Card /Credit Card , Internet Banking व UPI च्या माध्यमातून Payment करू शकता.
Payment झाल्यानंतर आधार NSEIT ऑपरेटर / पर्यवेक्षक (Aadhar Operator Certificate Exam) परीक्षा देण्यासाठी Book Seat या पर्यायावरती क्लिक करायचे आहे, त्यामध्ये Date सिलेक्ट करून Book हा पर्याय दिसेल त्यावर क्लिक करून आपली सर्व माहिती दाखवली जाईल ते वाचून confirm पर्यायावरती क्लिक करा, नंतर Congratulations मॅसेज येईल तिथे Close वरती क्लिक करून तुमचं Admit कार्ड येईल ते प्रिंट करून ठेवायचे आहे.
आधार NSEIT ऑपरेटर / पर्यवेक्षक (Aadhar Operator Certificate Exam) परीक्षेसाठी जाताना हे Admit कार्ड, orignal letter, आधार कार्ड यांची कलर झेरॉक्स घेऊन जायची आहे.
अशा प्रकारे आपण आधार सेंटर सुरु करण्यासाठी ऑपरेटर/पर्यवेक्षक (Aadhar Operator Certificate) सर्टिफिकेट ऑनलाईन काढू शकता.
पुढील लेख देखील वाचा!
- आधार ऑपरेटर भरती – २०२४; असा करा ऑनलाईन अर्ज!
- CSC सेंटर साठी असा करा ऑनलाईन नोंदणी अर्ज!
- CSC सेंटर साठी असा करा ऑनलाईन TEC कोर्स !
- आधार अपडेट सेंटरसाठी असा करा ऑनलाईन नोंदणी अर्ज (CSC Aadhaar UCL Center)
- ग्रामपंचायत मध्ये आपले सरकार सेवा केंद्रचालक (ऑपरेटर)साठी ऑनलाईन अर्ज कसा करायचा ? जाणून घ्या सविस्तर प्रोसेस!
- CSC ट्रान्सपोर्ट पोर्टल नवीन पोर्टल सुरु; आता CSC सेंटर मध्ये होणार RTO ची सर्व कामे ! – CSC Transport Services
- CSC सेंटर मध्ये दिल्या जाणाऱ्या विविध सेवा आणि त्यांच्या वेबसाईट लिंक!
- CSC VLE साठी सुवर्ण संधी; रिटेल मेडिकल स्टोअर उघडू इच्छिता? मग अशी करा ऑनलाईन नोंदणी!
वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.
आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी इथे क्लिक करा !!