वृत्त विशेषसरकारी कामे

या जिल्ह्यात आधार सेंटर सेवा केंद्रासाठी अर्ज सुरु!

माहिती व तंत्रज्ञान विभाग मंत्रालय, मुंबई यांचे कडून जळगाव जिल्ह्यास आधार (Aadhar Center Seva Kendra) संच प्राप्त झाले आहेत. ज्या महसुल मंडळात सद्यस्थिती मध्ये आधार केंद्र नाही अशा ठिकाणी आधार केंद्र सुरु करण्याचे निर्देश शासनाकडून प्राप्त आहेत. त्यानुसार जिल्ह्यातील रिक्त महसूल मंडळांमध्ये आधार संच वितरण करण्यात येणार आहे. या संदर्भात पात्र आपले सरकार केंद्र चालकांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या अधिकृत वेबसाइट वर जाऊन अर्जाचा नमुना, पात्रतेचे निकष. रिक्त महसुल मंडळाचे नावे व आवश्यक माहिती डाउनलोड करून घ्यावी. इच्छुक आपले सरकार केंद्र चालकांनी अर्ज व माहिती व तंत्रज्ञान विभाग मंत्रालय, मुंबई यांचे कडून जळगाव जिल्ह्यास आधार संच प्राप्त झाले आहेत.

ज्या महसुल मंडळात सद्यस्थिती मध्ये आधार केंद्र नाही अशा ठिकाणी आधार केंद्र (Aadhar Center Seva Kendra) सुरु करण्याचे निर्देश शासनाकडून प्राप्त आहेत. त्यानुसार जिल्ह्यातील रिक्त महसूल मंडळांमध्ये आधार संच वितरण करण्यात येणार आहे. या संदर्भात पात्र आपले सरकार केंद्र चालकांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या अधिकृत वेबसाइट वर जाऊन अर्जाचा नमुना, पात्रतेचे निकष, रिक्त महसुल मंडळाचे नावे व आवश्यक माहिती डाउनलोड करून घ्यावी. इच्छुक आपले सरकार केंद्र चालकांनी अर्ज व आवश्यक कागदपत्रे दिनांक 02-04-2025 वेळ संध्याकाळी 5.00 पर्यंत https://forms.gle/Bn1s4filH1SDDQB97 या गूगल लिंक वर पाठवावे. सदर अर्ज भरण्याकरीता कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही याची नोंद घ्यावी.

आधार सेंटर सेवा केंद्रासाठी अर्ज सुरु! Aadhar Center Seva Kendra jalgaon:

1) कोणत्याही परिस्थितीत आधार केंद्र (Aadhar Center Seva Kendra) मिळणेबाबतचे अर्ज कार्यालयात प्रत्यक्षरित्या (HardCopy) स्विकारले जाणार नाही याची नोंद घ्यावी.

2) यापूर्वी आधार केंद्र (Aadhar Center Seva Kendra) मिळणेबाबत या कार्यालयात प्राप्त अर्ज या जाहिरातीप्रमाणे निकषात बसत नसल्यास, अपात्र करण्यांत येतील. तसेच यापूर्वी प्राप्त अर्ज या जाहिराती प्रमाणे रिक्त असणा-या महसुल मंडळाकरीता नसल्यास अर्ज अपात्र करण्यांत येईल. मात्र असे अपात्र झालेले अर्जदार वरील नमूद लिंक वर नव्याने अर्ज करु शकतील.

जळगाव जिल्ह्यातील रिक्त महसूल मंडळांमध्ये आधार केंद्रासाठी मान्यता देण्यासाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. या संदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत देण्यात आलेल्या आपले सरकार सेवा केंद्र चालकांकडून विहित नमुन्यात अर्ज स्वीकारले जातील.

आधार संच वाटप करावयाचे वेळापत्रक

अ.क्रवेळापत्रकदिनांक
जाहिरात अर्ज, अटी व शर्ती संकेतस्थळावर प्रसिद्ध करणे24.03.2025
अर्ज स्वीकारण्याची तारीख व वेळ24.03.2025 सकाळी 11.00 वा
अर्ज नमुना स्विकारण्याची अंतिम दिनांक व वेळ02.04.2025 संध्या 5.00 वा
प्राप्त अर्जाची माहिती जिल्हा संकेतस्थळावर प्रसिद्ध करणे04.04.2025
पात्र अर्जाचे नाव जाहीर करणे09-04-2025

आधार केंद्र मागणीसाठी अर्जासोबत सादर करावयाची कागदपत्रे

1. विहित नमुन्यातील अर्ज

2. अर्जदाराचे आधार कार्ड

3. अर्जदाराचे पॅन कार्ड

4. आधार NSEIT सुपरवायझर प्रमाणपत्र

5. शैक्षणिक पात्रते संबंधित प्रमाणपत्र (किमान बारावी – HSC)

अटी व शर्ती

1. आपले सरकार सेवा केंद्र चालक यांनी दिनांक 24-03-2025 ते 02-04-2025 या कालावधीत या कार्यालयाच्या संकेतस्थळ https://jalgaon.gov.in/ वरून विहित अर्ज डाउनलोड करून दिनांक 02-04-2025 संध्याकाळी 5.00 पर्यंत https://forms.gle/Bn1s4fi1H1SDDQB97 या लिंक वर भरावा.

2. तदनंतर प्राप्त होणाऱ्या अर्जाचा विचार केला जाणार नाही, याची नोंद घ्यावी.

3. अर्जामध्ये सर्व माहिती परिपूर्ण भरावी आणि आवश्यक सर्व कागदपत्रे अपलोड करावी.

4. दिनांक 09.04.2025 रोजी पात्र अर्जदारांमधुन लकी ड्रॉ पध्दतीने आधार संच/किट वितरीत करण्यात येईल.

अर्जदारांची पात्रता निकष

1. एक अर्जदार केवळ एका जागे साठी अर्ज करू शकतो. एका पेक्षा जास्त अर्ज प्राप्त झाल्यास त्याचे सर्व अर्ज बाद करण्यात येतील.

2. आधार संचाकरीता /किटकरीता अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडे किमान शैक्षणिक पात्रता म्हणून 12 वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

3. आधार संचाकरीता / किटकरीता अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडे DIT किंवा कोणत्याही अन्य नोंदणीकृत संस्थेकडून वितरीत करण्यात आलेले दुसरा कोणताही आधार संच नसावा. जर एखाद्या अर्जदाराकडे एकापेक्षा जास्त आधार संच /किट आढळल्यास, जिल्हा प्रशासन ते अतिरिक्त आधार संच/ किट रद्द करून ती अन्य पात्र उमेदवाराला वाटप करेन याची नोंद घ्यावी.

4. आधार संच/किटकरीता अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी ऑपरेटर/सुपरवायझर परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी आणि, सदर उमेवाराकडे UIDAI च्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार वैध सुपरवायझर प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.

5. आधार किटसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी UIDAI च्या सर्व नियमांचे पालन करणे आवश्यक आहे.

6. अर्जदार ज्या तालुक्यात आपले सरकार सेवा केंद्र चालवित आहेत, त्याच तालुक्यात आधार केंद्रासाठी (Aadhar Center Seva Kendra) अर्ज करू शकतात, तालुका बाहेरील अर्ज बाद करण्यात येतील.

7. आधार केंद्र नेमून दिलेल्या शासकीय ठिकाणीच कार्यरत असणे आवश्यक राहील.

8. आधार केंद्र चालक ज्या शासकीय कार्यालयात आधार केंद्र (Aadhar Center Seva Kendra) चालवतील, त्या कार्यालयाकडून नाहरकत प्रमाणपत्र (NOC ) घेणे बंधनकारक राहील.

9. आधार केंद्र चालकांना नेमून दिलेल्या वेळेत सकाळी 9:30 ते संध्याकाळी 6:00 पर्यंत (शासकीय सुट्ट्या वगळता) सेवा सुरू ठेवणे बंधनकारक राहील.

10. पात्र अर्जदारास एकदा वितरीत केलेले आधार केंद्र कोणत्याही परिस्थितीत इतर कोणाच्याही नावावर हस्तांतरित करता येणार नाही. तसेच केंद्राचा पत्ता देखील बदलता येणार नाही याची नोंद घ्यावी.

10. प्रत्येक आधार केंद्रावर CCTV कॅमेरा बसवणे बंधनकारक राहील.

11. सर्व आधार केंद्रांमध्ये Digital Payment चा वापर करणे बंधनकारक राहील.

12. सर्व आधार केंद्रांवर रेट चार्ट, आवश्यक कागदपत्रांची यादी तसेच 1947 हेल्प डेस्क क्रमांक दर्शनीय भागात लावणे बंधनकारक राहील.

13. आधार केंद्र चालकांनी आधार नोंदणी रजिस्टर व्यवस्थित राखणे बंधनकारक राहील.

14. आधार केंद्र वाटपाचे सर्व अधिकार जिल्हास्तरीय समितीकडे राखून ठेवण्यांत आलेले आहेत.

जाहिरात व अर्ज – Aadhar Center Seva Kendra Notification & Form:

जळगांव जिल्हयात सद्यस्थितीत ज्या महसुल मंडळात मध्ये आधार केंद्र (Aadhar Center Seva Kendra) नाही अशा ठिकाणी माहिती व तंत्रज्ञान विभाग मंत्रालय, मुंबई यांचे कडून जळगाव जिल्ह्याकरीता प्राप्त आधार संच वितरीत करणेबाबत जाहीरात व अर्ज नमुना पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

पुढील लेख देखील वाचा!

  1. आधार सेंटर सुरु करण्यासाठी ऑपरेटर/पर्यवेक्षक सर्टिफिकेट ऑनलाईन काढण्याची प्रोसेस!
  2. CSC सेंटर साठी असा करा ऑनलाईन नोंदणी अर्ज!
  3. CSC सेंटर साठी असा करा ऑनलाईन TEC कोर्स !
  4. आधार अपडेट सेंटरसाठी असा करा ऑनलाईन नोंदणी अर्ज (CSC Aadhaar UCL Center)
  5. ग्रामपंचायत मध्ये आपले सरकार सेवा केंद्रचालक (ऑपरेटर)साठी ऑनलाईन अर्ज कसा करायचा ? जाणून घ्या सविस्तर प्रोसेस!
  6. CSC ट्रान्सपोर्ट पोर्टल नवीन पोर्टल सुरु; आता CSC सेंटर मध्ये होणार RTO ची सर्व कामे ! – CSC Transport Services
  7. CSC सेंटर मध्ये दिल्या जाणाऱ्या विविध सेवा आणि त्यांच्या वेबसाईट लिंक!
  8. CSC VLE साठी सुवर्ण संधी; रिटेल मेडिकल स्टोअर उघडू इच्छिता? मग अशी करा ऑनलाईन नोंदणी!

वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.

आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी इथे क्लिक करा !!

शेअर करा:
WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Channel Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.