राज्यातील खाजगी अनुदानित शाळांमधील शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना वाढीव मानधन!
राज्यातील खाजगी अनुदानित शाळांमधील नव्याने नियुक्त होणाऱ्या शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना पहील्या तीन वर्षाकरीता मानधन तत्वावर नियुक्ती देणेबाबत शासन निर्णय दिनांक २५.११.२००५ अन्वये निर्णय घेण्यात आला होता. सदर शासन निर्णयानुसार शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना खालीलप्रमाणे मानधन अनुज्ञेय करण्यात आले होते:-
अ.क्र. | पदनाम | मानधन (रुपये) |
1 | कनिष्ठ लिपीक | २०००/- |
2 | अर्धवेळ ग्रंथपाल | १५००/- |
3 | पूर्णवेळ ग्रंथपाल | २५००/- |
4 | अर्धवेळ प्रयोगशाळा सहाय्यक | २०००/- |
5 | पूर्णवेळ प्रयोगशाळा सहाय्यक | २५००/- |
6 | चतुर्थश्रेणी कर्मचारी | १७००/- |
सदर शिक्षकेत्तर कर्मचारी यांच्या मानधनात २००५ नंतर वाढ करण्यात आलेली नाही. नियमित शिक्षकेत्तर कर्मचारी यांना ७ व्या वेतन आयोगानुसार वेतनात झालेली वाढ, वाढती महागाई या सर्व बाबींचा विचार करुन शिक्षकेतर कर्मचारी यांच्या मानधनात वाढ करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. त्यानुसार पुढीलप्रमाणे शासन निर्णय निर्गमित करण्यात येत आहे.
राज्यातील खाजगी अनुदानित शाळांमधील शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना वाढीव मानधन –
राज्यातील खाजगी अनुदानित शाळांमधील शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना त्यांच्या प्रथम नियुक्तीपासून पहील्या तीन वर्षांसाठी खालीलप्रमाणे मानधन अदा करण्यास मान्यता देण्यात येत आहे:-
अ.क्र. | पदनाम | मानधन (रुपये) |
1 | ग्रंथपाल | १४,०००/- |
2 | प्रयोगशाळा सहायक | १२,०००/- |
3 | कनिष्ठ लिपिक | १०,०००/- |
4 | चतुर्थ श्रेणी कर्मचारी(केवळ अनुकंपा तत्वावर नियुक्त) | ८,०००/- |
शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, शासन निर्णय दिनांक ११.१२.२०२० नुसार चतुर्थश्रेणी कर्मचारी नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झाल्यानंतर सदर पद व्यपगत करणेबाबत निर्णय घेण्यात आला आहे. सदर शासन निर्णयानुसार शाळांना चतुर्थश्रेणी पदाऐवजी शिपाई भत्ता लागू करण्यात आला आहे. तथापि, अनुकंपा तत्वावर नियुक्त होणाऱ्या चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांना नियमित वेतनश्रेणी लागू होत असल्याने या प्रकारे चतुर्थश्रेणी पदावर नियुक्त होणाऱ्या चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांनाच वरील तक्त्यातील मानधन लागू असेल. तसेच जे चतुर्थश्रेणी कर्मचारी दि.११.१२.२०२० पूर्वी चतुर्थश्रेणी संवर्गात सेवक या पदावर नियुक्त करण्यात आले आहेत व ज्यांचा तीन वर्षांचा कालावधी संपुष्टात आलेला नाही, त्यांना देखील वरील मानधन अनुज्ञेय राहील.
सदर मानधन दि. ०१ जानेवारी २०२३ पासून लागू होईल. यासाठी येणारा खर्च मंजूर अनुदानातून भागविण्यात यावा.
सदर शासन निर्णय वित्त विभागाच्या मान्यतेने त्यांचा अनौपचारिक संदर्भ क्र.१०१६/व्यय-५. दि.०१.१२.२०२२ अन्वये निर्गमित करण्यात येत आहे.
शालेय शिक्षण व क्रीडा विभाग शासन निर्णय : राज्यातील खाजगी अनुदानित शाळांमधील शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना वाढीव मानधन लागू करणेबाबत शासन निर्णय पाहण्यासाठी इथे क्लीक करा.
हेही वाचा – शिक्षण सेवक मानधनात वाढ
वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.
आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी येथे क्लिक करा !!