ग्राम विकास विभागमहाराष्ट्र ग्रामपंचायतवृत्त विशेषसरकारी कामे

ग्रामपंचायत विकास आराखडा २०२४-२५ : गावाचा विकास आराखडा तयार करण्याची प्रक्रिया !

आपल्या ग्रामपंचायत अंतर्गत गावाचा विकास साधायचा असेल तर त्यासाठी आधी ग्रामपंचायत ग्रामविकास आराखडा तयार करणं गरेजचं असतं. गावातील ग्रामस्थांंनी आणि लोकप्रतिनिधीनी मिळून ग्रामविकास आराखडा तयार केल्यास तो अधिक सर्वसमावेशक होतो. ग्रामविकास आराखडा तयार करण्यासाठी महाराष्ट्र शासनानं काही निर्देशही घालून दिले आहेत. हे निर्देश कोणते आहेत आणि गावाचा विकास आराखडा कसा तयार करतात, या प्रक्रियेत कोणकोणते टप्पे असतात, हे जाणून घेऊयात.

ग्रामपंचायत विकास आराखडा म्हणजे काय?

गावांच्या भौतिक विकासाच्या सार्वजनिक योजना आणि मानव विकासाच्या शाश्‍वत ग्राम विकासास सहाय्यभूत ठरणाऱ्या योजना व उपक्रम, प्रकल्प यांचा समावेश असणारा आराखडा म्हणजे ग्रामविकासाचा संपूर्ण आराखडा. ग्रामपंचायत किंवा गावाचा विकास आराखडा तयार करताना तो शाश्वत विकास आराखडा असायला हवा. आपल्या भावी पिढ्यांच्या गरजा भागवता याव्यात यासाठी आताच्या आपल्या गरजा सीमित ठेवून विकास करणं, पर्यावरण लक्षात ठेवून विकास करणं याला शाश्वत विकास आराखडा असं म्हणतात.

ग्रामपंचायत विकास आराखडा : गावाचा विकास आराखडा तयार करण्याची प्रक्रिया !

गावाचा विकास आराखडा तयार करण्याच्या प्रक्रियेमध्ये ग्रामविकास आराखड्यासाठी निधीचे स्रोत कोणते असतात? वित्त आयोगाच्या निधीचा वापर कसा केला जातो? ग्रामविकास आराखडा तयार करण्यात ग्रामसभेचं महत्त्व काय आहे? ग्रामविकास आराखडा पारदर्शक कसा करता येईल? ग्रामविकास आराखडा वार्षिक की पंचवार्षिक तयार करायचा? हे सविस्तर पाहूया.

१) ग्रामपंचायत विकास आराखड्यासाठी निधीचे स्रोत:

ग्रामपंचायत विकास आराखडा तयार करण्यासाठी एकूण 7 प्रकारचे निधी ग्रामपंचायतीकडे उपलब्ध असतात, या 7 प्रकारच्या निधींचा उपयोग करून विकास आराखडा तयार करावा लागतो.

  • ग्रामपंचायतीचा स्वनिधी विकास आराखड्यासाठी वापरता येतो. यामध्ये मालमत्ता कर, पाणी कर यांचा समावेश होतो.
  • राज्य शासनाकडून प्राप्त होणारा महसुली हिस्सा. यामध्ये जमीन महसूल उपकर, मुद्रांक शुल्क अनुदान, या राज्य शासनाच्या रकमांचा समावेश होतो.
  • मनरेगा योजनेअंतर्गत जी विकासकामं गावात घेतली जातात, त्याच्यासाठी मिळणारा जो निधी.
  • वित्त आयोगाचा निधी ग्रामविकास आराखडा तयार करण्यासाठीचा महत्त्वाचा निधी आहे. चालू स्थितीत पंधराव्या वित्त आयोगाचा विचार करता येईल.
  • स्वच्छ भारत अभियान आणि त्याअंतर्गत ग्रामपंचायत स्तरावर होणारी कामं, त्याला प्राप्त होणारा निधीही.
  • ग्रामपंचायतीला मिळणारी बक्षीसं आणि त्यातून येणारा निधी.
  • लोकसहभागातून मिळणाऱ्या वर्गणी.

एका ग्रामपंचायतीला दरवर्षी किती निधी मिळतो? सरपंच गावाच्या विकासासाठी किती निधी गावात आणू शकतो? याची सविस्तर माहिती आपण मागील लेखामध्ये पाहिली आहे.

२) ग्रामपंचायत विकास आराखडा तयार करण्यात ग्रामसभेचं महत्त्व:

ग्रामपंचायत विकास आराखडा तयार करण्यासाठी संसाधन गट म्हणजेच गावातील शिक्षक, वकील, आरोग्याचे जाणकार, ज्येष्ठ नागरिक, अर्थशास्त्राचे प्राध्यापक, एनजीओचे प्रतिनिधी म्हणजे गावातील वेगवेगळ्या क्षेत्रातील जाणकारांना आणि शासकीय कर्मचारी यांनी विचारमंथन करून विकास आराखडा तयार केला पाहिजे.

गावाच्या विकासाचे हे आराखडे लोकसहभागातून तयार झालेल्या प्रारुप ग्रामपंचायत विकास आराखड्यास ग्रामसभेमध्ये अंतिम ग्रामविकास आराखडा मंजूर केला जातो त्याच्याआधी वेगवेगळ्या ग्रामसभा घ्याव्यात.

महिलांची ग्रामसभा ज्यात महिलांच्या समस्या घेतल्या जातील. बाल ग्रामसभा घ्यावी. यात प्राथमिक, माध्यमिक असे 18 वर्षांच्या खालील विद्यार्थ्यांचे प्रश्न, समस्या समजतील. वंचित घटकांची ग्रामसभा घ्यावी. त्यांचे प्रश्न, समस्या, निधी कसा उपलब्ध करून द्यायचा, हे समजतं. वॉर्डनिहाय ग्रामसभा घ्यावी म्हणजे यातून वॉर्डनिहाय प्रश्न समजून घेता येतात. गावात वर्षभरात किमान ४ ग्रामसभा घेतल्या जातात. ग्रामसभेला नियमितपणे उपस्थित राहून तुम्ही गावाच्या विकासासंदर्भातील तुमच्या संकल्पना, मतं मांडू शकता. ग्रामपंचायत ग्रामसभा नियम व अटी (महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम कलम ७ व ८ नुसार) याची सविस्तर माहिती आपण मागील लेखामध्ये पाहिली आहे.

३) ग्रामपंचायत विकास आराखड्या मध्ये वित्त आयोगाच्या निधीचा वापर:

वित्त आयोगाच्या निधीचं वितरण ग्रामपंचायतीला 80% उपलब्ध होतो. ग्रामपंचायती मध्ये वित्त आयोगाच्या या 80% निधीचे 60% बंधित आणि 40% अबंधित निधी अशाप्रकारे पहिलं विभाजन होतं.

वित्त आयोगाचा हा निधी वेगवेगळ्या घटकांसाठी म्हणजेच गावातील शिक्षण, आरोग्य आणि उपजीविका यासाठी 25%, महिलांच्या विकासासाठी 10 % निधी, तर वंचित घटकासाठी त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात निधी द्यायचा असतो.

४) वार्षिक आणि पंचवार्षिक ग्रामपंचायत विकास आराखडा:

14 व्या वित्त आयोगाच्या कालावधीमध्ये प्रत्येक ग्रामपंचायतीचा पाच वर्षांचा विकास आराखडा तयार करत आहे. वार्षिक विकास आराखडा किंवा पंचवार्षिक विकास आराखडा तयार करताना त्यांनी त्यामध्ये काय प्रयोजन केलेलं आहे, हे पाहणं प्रत्येक ग्रामपंचातीचं काम आहे, यामध्ये मिळणारा निधी किती आहे, कामाची निकड किती आहे, ते पडताळून बघायचं आहे. त्यानुसार त्या वर्षीच्या विकास आराखड्यात बदल करायचे आहेत.

५) ग्रामपंचायत विकास आराखड्यातील पारदर्शकता:

ग्रामपंचायत विकास आराखड्यातील पारदर्शकता टीकून राहण्यासाठी ग्रामस्थ म्हणून गावच्या विकास कामात सहभागी व्हायचं आणि विकासकामांवर लक्ष ठेवायचे. गावात वेगवेगळ्या ग्रामविकास समित्या असतात, जसं कि रेशन दक्षता समिती, शाळा व्यवस्थापन समिती, ग्राम आरोग्य समिती, ग्राम पाणीपुरवठा, स्वछता, पोषण आहार समिती इत्यादी असतात. तुम्ही या समित्यांमध्ये भागीदारी करू शकता आणि गावाच्या विकासकामांत लक्ष घालू शकता.

ग्रामपंचायतीने मंजूर विकास आराखडा ऑईल पेंटनं रंगवून ग्रामपंचायतीच्या दर्शनी भागात लावावा, असे निर्देश महाराष्ट्र शासनाने दिल्यामुळे गावातील लोकांना गावातील विकास कामांविषयी माहिती मिळते, तसेच संसाधन गट, सामाजिक लेखापरीक्षण समिती आणि कार्यगट स्थापन करावा.

१) संसाधन गट: ग्रामपंचायत ग्रामविकास आराखडा संसाधन गटामुळे गावातील लोकांपर्यंत पोहोचतो त्यासाठी संसाधन गट लोकांना माहिती झाला पाहिजे. सदस्यांची माहिती बोर्डावर ऑईल पेंटनं लिहायची असते. तो बोर्ड ग्रामपंचातीच्या भींतीवर दर्शनी भागावर लावावा.

२) सामाजिक लेखापरीक्षण समिती: सामाजिक लेखापरीक्षण समिती गावात स्थापन करून त्यामध्ये गावातील सीए, तज्ज्ञ अशा लोकांची समिती करावी. गावात केलेलं काम योग्यप्रकारे केलं आहे की नाही, त्याचं मूल्यमापनं या समितीनं करायचं आहे. त्यांचा रिपोर्ट दर तीन महिन्याला ग्रामपंचायतीला सादर केला पाहिजे.

३) कार्यगट: विकास आराखड्यातील कामाची गुणवत्ता आणि प्रगती हे पाहण्यासाठी गावपातळीवर कार्यगट स्थापन करावा.

जर गावातील कुठल्या कामाविषयी शंका किंवा प्रश्न आल्यास, तुम्ही माहितीचा अधिकार म्हणजेच RTI चा वापर करून त्या कामसंबंधीची माहिती मागवू शकता. आपल्या गावाचे रिपोर्ट कार्ड तुम्ही केंद्र सरकारच्या “ई-ग्राम स्वराज” या मोबाईल अप्लिकेशनद्वारे किंवा वेबसाईटद्वारे पाहू शकता. यामध्ये सरकारने वेगवेगळ्या योजनांसाठी आपल्या गावाला किती निधी दिला आणि ग्रामपंचायतीने तो कुठे खर्च केला, याची सविस्तर माहिती दिलेली असते.

ग्रामविकास आराखडा तयार करताना गावातील सुशिक्षित तरुण/तरुणी, तज्ज्ञ व्यक्ती, आणि इतर लोकसहभाग महत्वाचा आहे.

ग्राम विकास विभाग शासन निर्णय: आमचं गाव आमचा विकास उपक्रमांतर्गत ग्रामपंचायत विकास आराखडा (GPDP) अंतीम करणेबाबत शासन निर्णय पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

हेही वाचा – ग्रामपंचायत विकास आराखडा ऑनलाईन कसा पाहायचा? जाणून घ्या सविस्तर (GPDP – 2021-2022)

वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.

आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी येथे क्लिक करा !!

शेअर करा:
WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Channel Join Now

One thought on “ग्रामपंचायत विकास आराखडा २०२४-२५ : गावाचा विकास आराखडा तयार करण्याची प्रक्रिया !

  • Suresh khamkar

    Nice Information

    Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.