सरकारी कामेआपले सरकार - महा-ऑनलाईनवृत्त विशेष

आधारमध्ये ‘कुटुंबप्रमुख’ आधारित ऑनलाइन पत्ता अपडेट कसा करायचा? जाणून घ्या सविस्तर माहिती !

कुटुंब (HoF – Head Of Family) प्रमुखाच्या संमतीने आधारमध्ये ऑनलाइन पत्ता (HoF Aadhaar Address Update) अपडेट करण्यासाठी, भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाने (युआयडीएआय ) रहिवासी स्नेही सुविधा सुरू केली आहे. ज्यांच्याकडे आधारमध्ये पत्ता अपडेट करण्यासाठी आपल्या रहिवासाच्या स्थानाची ओळख पटवणारी स्वतःच्या नावावरील कागदपत्रे नाहीत, रहिवाशांच्या अशा नातेवाईकांना-म्हणजेच मुले, जोडीदार, पालक इत्यादींना आधार मध्ये कुटुंब प्रमुखाच्या आधारे ऑनलाइन पत्ता अपडेट (HoF Aadhaar Address Update) करण्यासाठीची सेवा खूप मदत करेल.

शिधापत्रिका , गुणपत्रिका , विवाह प्रमाणपत्र, पारपत्र इत्यादी कागदपत्रांच्या माध्यमातून नातेसंबंधाचा पुरावा सादर करून ,अर्जदार आणि कुटुंबप्रमुख या दोघांच्या नावाचा उल्लेख करून आणि त्यांच्यातील संबंध दाखवून आणि कुटुंबप्रमुखाद्वारे ओटीपी आधारित प्रमाणीकरण करून ऑनलाइन पत्ता अपडेट करता येईल. नातेसंबंधाचा पुरावा दर्शवणारी कागदपत्रे देखील उपलब्ध नसल्यास, युआयडीएआय रहिवाशांना युआयडीएआय ,विहित नमुन्यात कुटुंबप्रमुखाद्वारे स्वयं-घोषणा पत्र सादर करण्याची सुविधा प्रदान करते.

विविध कारणांमुळे देशात लोक शहरे आणि नगरांमधून स्थलांतरित होत असल्याने लाखो लोकांसाठी अशा प्रकारची सुविधा फायदेशीर ठरेल. पत्त्याचा कोणताही वैध पुरावा कागदपत्र वापरून युआयडीएआयने विहित केलेल्या विद्यमान पत्ता अपडेट सुविधेवर या पर्यायाची निवड अतिरिक्त असेल. 18 वर्षांपेक्षा जास्त वयाचा कोणताही रहिवासी या उद्देशासाठी कुटुंबप्रमुख असू शकतो आणि या प्रक्रियेद्वारे त्याचा/तिचा पत्ता त्याच्या नातेवाईकांसह सामायिक करू शकतो.

आधारमध्ये ‘कुटुंबप्रमुख’ आधारित ऑनलाइन पत्ता अपडेट करण्याची प्रोसेस – HoF Aadhaar Address Update:

माय आधार’ पोर्टलमध्ये ऑनलाइन पत्ता अपडेट (HoF Aadhaar Address Update) करण्यासाठी हा पर्याय रहिवासी निवडू शकतो. त्यानंतर, रहिवाशांना एचओएफचा आधार क्रमांक प्रविष्ट करण्याची परवानगी दिली जाईल, ती केवळ प्रमाणित केली जाईल. एचओएफची पुरेशी गोपनीयता राखण्यासाठी एचओएफच्या आधारची इतर कोणतीही माहिती स्क्रीनवर प्रदर्शित केली जाणार नाही. एचओएफच्या आधार क्रमांकाचे यशस्वी प्रमाणीकरण झाल्यानंतर, रहिवाशांनी नातेसंबंधाच्या पुराव्याचे दस्तऐवज अपलोड करणे आवश्यक असेल.

आपल्या आधार कार्ड मध्ये ‘कुटुंबप्रमुख’ आधारित ऑनलाइन पत्ता अपडेट (HoF Aadhaar Address Update) करायचे असल्यास खालील लिंक वर क्लिक करून UIDAI ची myaadhaar वेबसाईट ओपन करा.

https://myaadhaar.uidai.gov.in

Login वर क्लिक केल्यानंतर तुमचा १२ अंकी आधार नंबरकॅप्चा कोड टाका व Send OTP या ऑप्शन वर क्लिक करा नंतर रजिस्टर मोबाइल नंबर वर जो OTP नंबर येईल तो टाकून Login ऑप्शन वर क्लिक करायचे आहे.

लॉगिन केल्यानंतर Address Update या वरती क्लिक करायचे आहे. पुढे ‘Head Of Family (HOF) based Address Update’ या पर्यायावर क्लिक करा.

Head Of Family (HoF Aadhaar Address Update)
HoF Aadhaar Address Update

आता एक सूचना पेज ओपन होईल येथे, Next बटणावर क्लिक करा.

कुटुंबाचे प्रमुख तपशील प्रविष्ट करा.

  • ‘कुटुंब प्रमुख (HOF) तपशील’ विभागात खाली स्क्रोल करा.
  • येथे, तुम्हाला तुमच्या कुटुंब प्रमुखाचा आधार क्रमांक टाकावा लागेल. आधार क्रमांकाची सत्यता सुनिश्चित करण्यासाठी प्रणाली त्याची पडताळणी करेल.
  • पुढे, ड्रॉपडाउन मेनूमधून तुम्हाला कुटुंब प्रमुख (उदा. मुलगा, मुलगी, पत्नी) सोबतचे तुमचे नाते निवडणे आवश्यक आहे.

नातेसंबंध कागदपत्राचा पुरावा अपलोड करा.

  • कुटुंब प्रमुखासह तुमचे नाते प्रमाणित करण्यासाठी, तुम्हाला पुरावा म्हणून एक आधार देणारा दस्तऐवज अपलोड करणे आवश्यक आहे.
  • स्वीकृत दस्तऐवजांमध्ये शिधापत्रिका, मार्कशीट, विवाह प्रमाणपत्रे, पासपोर्ट किंवा तुमच्या नातेसंबंधासह तुमची आणि कुटुंब प्रमुख दोघांच्या नावांचा उल्लेख असलेले कोणतेही दस्तऐवज समाविष्ट आहेत.

दस्तऐवजांचे पुनरावलोकन आणि अपलोड करा.

कुटुंबप्रमुख तपशील प्रविष्ट केल्यानंतर आणि नातेसंबंधाचा पुरावा दस्तऐवज निवडल्यानंतर, “ओके” आणि नंतर ‘तपशील पहा आणि दस्तऐवज अपलोड करा’ वर क्लिक करा.

तुम्ही प्रदान केलेल्या माहितीचे पुनरावलोकन करा आणि सर्वकाही बरोबर असल्यास, ‘दस्तऐवज अपलोड करण्यासाठी सुरू ठेवा’ वर क्लिक करा.

रिलेशनशिप डॉक्युमेंटचा स्कॅन केलेला पुरावा अपलोड करा आणि नंतर ‘पुढील’ क्लिक करा.

पेमेंट करा:

पुढे “I hereby confirm that I have read and understood the Payments / Cancellation / Refunds Process.” या ऑप्शन वर क्लिक करून Make Payment या ऑप्शन वरती क्लिक करा.

रहिवाशांनी सेवेसाठीचे रु.50/- शुल्क यशस्वीरित्या भरल्यानंतर, रहिवाशासोबत सेवा विनंती क्रमांक (एसआरएन) सामायिक केला जाईल. पत्त्याच्या विनंतीबद्दल एचओएफला एसएमएस पाठवला जाईल. अधिसूचना प्राप्त झाल्यापासून 30 दिवसांच्या आत माय आधार पोर्टलवर लॉग इन करून एचओएफ विनंती मंजूर करेल आणि त्याची/तिची संमती देईल आणि विनंतीवर प्रक्रिया केली जाईल.

कुटुंब प्रमुख मान्यता:

कुटुंब प्रमुखांना तुमच्या पत्ता अपडेट विनंतीबद्दल माहिती देणारी एसएमएस सूचना पाठवली जाईल. कुटुंब प्रमुखाने अधिसूचना मिळाल्यापासून ३० दिवसांच्या आत myAadhaar पोर्टलवर लॉग इन करून विनंती मंजूर किंवा नाकारण्यासाठी त्यांची संमती देणे आवश्यक आहे.

माय आधार पोर्टलवर लॉगिन केल्यानंतर डॅशबोर्डवर, खाली स्क्रोल करा आणि ‘My Head of Family Requests’ हा पर्याय निवडा.

तुमच्या नावासह आणि तुमच्या आधार क्रमांकाच्या शेवटच्या चार अंकांसह तुम्हाला दिलेला SRN नंबर एंटर करा.
येथे, कुटुंब प्रमुख विनंती स्वीकारणे किंवा नाकारणे निवडू शकतात.

एकदा कुटुंब प्रमुखाने विनंती मंजूर केल्यानंतर आणि त्यांचा पत्ता शेअर केल्याची पुष्टी केल्यानंतर, प्रक्रिया यशस्वीरित्या पूर्ण होते.

एचओएफने त्याचा/तिचा पत्ता सामायिक करण्यास नकार दिल्यास, किंवा एसआरएन तयार केल्याच्या 30 दिवसांच्या आत स्वीकारला किंवा नाकारला नाही, तर विनंती प्रक्रिया बंद केली जाईल. या पर्यायाद्वारे पत्ता अपडेट करण्याची मागणी करणाऱ्या रहिवाशांना एसएमएसद्वारे विनंती प्रक्रिया बंद केल्याची माहिती दिली जाईल. एचओएफने स्वीकार न केल्यामुळे विनंती प्रक्रिया बंद झाल्यास किंवा नाकारली गेल्यास किंवा प्रक्रियेदरम्यान नाकारली गेल्यास, अर्जदाराला रक्कम परत केली जाणार नाही.

हेही वाचा – आधार PVC कार्ड ATM सारखं दिसणार आधार कार्ड ऑनलाईन ५० रुपयात बनवा, जाणून घ्या सविस्तर प्रोसेस (Aadhaar PVC card)

वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.

आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी येथे क्लिक करा !!

शेअर करा:
WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Channel Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.