ग्रामपंचायतीचे दाखले पहा “महा ई ग्राम सिटिझन कनेक्ट ॲप” वर !
सध्या महाराष्ट्र शासन ऑनलाइन पद्धतीचा वापर करून जनतेचा त्रास कमी कसा करता येईल याकडे जास्तीत जास्त लक्ष देत आहे. आता शासनाने एक नवीन ॲप नुकतेच महा ई ग्राम सिटीजन कनेक्ट (Maha E Gram Citizen Connect App) लॉन्च केलेले आहे. या ॲपद्वारे आपण घरबसल्या ग्रामपंचायतीचे सर्व दाखले मोबाईलद्वारे पाहू शकतोच याचबरोबर आपल्या ग्रामपंचायतीमध्ये असलेली कार्यकारिणी किंवा अधिकारी वर्ग यांची संपूर्ण माहितीसुद्धा या ॲपवर सहजरित्या बघता व त्यात माहिती भरता येणार आहेत.
ग्रामपंचायतीचे दाखले पहा “महा ई ग्राम सिटिझन कनेक्ट ॲप” वर ! Maha E Gram Citizen Connect App:
महा ई ग्राम सिटिझन कनेक्ट मोबाइल (Maha E Gram Citizen Connect App) ॲप हे नागरिक सेवा मिळविण्यासाठी एक खास उपाय आहे. ग्रामीण भागातील नागरिकांना जन्म, मृत्यू, विवाह, नमुना 8 (मूल्यांकन), बीपीएल असे प्रमाणपत्र मिळू शकते. नेट बँकिंग, क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, UPI आणि QR स्कॅनिंगचा वापर करून नागरिक आपला मालमत्ता कर ऑनलाइन भरू शकतात, त्याद्वारे पावती देखील मिळवू शकतात.
महा ई ग्राम सिटिझन कनेक्ट ॲप मोबाइल मध्ये कसे घ्यायचे?
महा ई ग्राम सिटिझन कनेक्ट मोबाइल (Maha E Gram Citizen Connect App) ॲप आपल्या मोबाईलमध्ये डाऊनलोड करण्यासाठी मोबाईलमधील प्ले स्टोअरमध्ये जाऊन तिथे “Maha E Gram Citizen Connect” सर्च करायचे आहे. हे सर्व केल्यानंतर तुम्हाला सहजरित्या हे ॲप मिळून जाईल किंवा खालील लिंक वरून डाउनलोड करा.
https://play.google.com/store/apps/mahaegramCitizenConnect
प्लेस्टोअर मधून महा ई ग्राम सिटिझन कनेक्ट मोबाइल (Maha E Gram Citizen Connect App) ॲप डाऊनलोड केल्यानंतर सर्वात अगोदर तुम्हाला रजिस्ट्रेशन करणे गरजेचे आहे.
महा ई ग्राम सिटिझन कनेक्ट (Maha E Gram Citizen Connect App) ॲप मध्ये रजिस्ट्रेशन करण्यासाठी पुढील स्टेप करा.
- सर्वात खाली Don’t have account? Register असे लिहिलेले दिसेल त्यावर क्लिक करा.
- क्लिक केल्यानंतर एक नवीन पेज ओपन होईल. त्यात तुमचे नांव, वडिलांचे नांव, आडनांव, लिंग, जन्म तारीख, मोबाईल नंबर, ईमेल आयडी टाका.
- त्यानंतर ओटीपी टाका.
- रजिस्टर मोबाईल नंबर व युझर आयडी पासवर्ड दिलेला असेल तो हे महा ई ग्राम सिटिझन (Maha E Gram Citizen Connect App) कनेक्ट मोबाइल ॲपवर वापरता येणार आहे.
महा ई ग्राम सिटिझन कनेक्ट (Maha E Gram Citizen Connect App) ॲपच्या होम पेजवर दाखले / प्रमाणपत्र, कर भरणा, व्यवहार इतिहास, ग्रामपंचायत पदाधिकारी, आपले सरकार सुविधा, सूचना पेटी इत्यादी मेनू पाहायला मिळतील.
या ॲपमध्ये काय दिसणार?
१ दाखले / प्रमाणपत्र दाखले, प्रमाणपत्र या टॅबमध्ये गेल्यानंतर आपल्याला जन्म दाखला, मृत्यू दाखला, विवाह नोंदीचा दाखला, दारिद्र्य रेषेखालील दाखला, असेसमेंट उतारा.
२. कर भरणा या टॅबमध्ये आपल्याला आपल्या मिळकतींना लागणारा कर घरबसल्या बघता येईल. त्यासाठी ग्रामपंचायतीपर्यंत जाण्याची अजिबात आवश्यकता नाही.
३. व्यवहार इतिहास : महा ई ग्राम सिटिझन कनेक्ट (Maha E Gram Citizen Connect App) हे ॲप इन्स्टॉल केल्यापासून तुम्ही यामध्ये कोणकोणते काम केले आहे याची संपूर्ण माहिती यामध्ये पहायला मिळेल. तसेच जर आपण या ॲपद्वारे कर भरणा केलेला असेल तर त्याची माहितीदेखील येथून बघावयास मिळणार आहे.
४. ग्रामपंचायत पदाधिकारी: या टॅबमध्ये आपण आपल्या गावच्या ग्रामपंचायतीमध्ये काम करत असलेले पदाधिकारी याची माहिती मिळवू शकतो. यामध्ये सरपंच, उपसरपंच, सदस्य, ग्रामसेवक, कर्मचारी यांची माहिती मिळणार आहे.
दाखले उतारे कर भरणा सारख्या गोष्टी घरबसल्या करता येणार असल्याने सर्व नागरिकांनी आपल्या मोबाईलमध्ये महा ई ग्राम सिटिझन कनेक्ट (Maha E Gram Citizen Connect App) या नावाचे ॲप आपल्या मोबाईलच्या प्लेस्टोअरमधून डाऊनलोड करून आपआपल्या ग्रामपंचायत रजिस्टर करून घ्यावे. नागरिकांना घरबसल्या सुविधा देण्यासाठी प्रशासनाचा महत्त्वपूर्ण निर्णय आहे.
पुढील लेख देखील वाचा!
- घरबसल्या घ्या विविध सरकारी सेवांचा ऑनलाईन लाभ – Government Services Online
- ग्रामपंचायत स्तरावर देण्यात येणारे सर्व प्रकारचे मराठी PDF नमुना दाखले मोफत फाईल डाउनलोड करा!
- आपले सरकार पोर्टलवर नवीन युजर नोंदणी कशी करायची? जाणून घ्या सविस्तर माहीती!
- शासकीय दाखल्यांसाठी लागणारे कागदपत्रे !
- आता व्हॉट्सॲप वर डाउनलोड करता येणार तुमची सरकारी कागदपत्रे !
वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.
आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी येथे क्लिक करा !!