डिजिटल मतदान कार्ड ऑनलाईन डाउनलोड कसे करायचे? जाणून घ्या सविस्तर !
मतदार ओळखपत्र डिजिटल झाले आहे, कारण निवडणूक आयोग EPIC (इलेक्ट्रॉनिक मतदार फोटो ओळखपत्र – EPIC Digital Voting Card) हा उपक्रम राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त सुरू केला आहे.
ज्या मतदारांनी मतदार-ओळखपत्रासाठी अर्ज केला असेल आणि फॉर्म-6 मध्ये त्यांचा मोबाईल क्रमांक नोंदविला असेल त्यांचा मोबाइल नंबर अधिकृत करुन EPIC डाउनलोड करण्यास सक्षम असेल. मोबाइल नंबर अद्वितीय असावेत आणि पूर्वी ECI च्या मतदार याद्यांमध्ये नोंदणीकृत नसावेत.
सामान्य मतदार EPIC Digital Voting Card साठी अर्ज करू शकतात. “ज्यांनी आपला मोबाईल क्रमांक दिलेला आहे (लिंक केलेला आहे) ते आपले ई-ईपीआयसी डाउनलोड करू शकतात.
EPIC म्हणजे काय?
ईपीआयसी (EPIC – Election Photo Identity Card) EPIC Digital Voting Card एक संपादन न करता येण्यासारखा सुरक्षित पोर्टेबल दस्तऐवज स्वरूप डिजिटल मतदान कार्ड (पीडीएफ) आवृत्ती आहे आणि सिक्युरिटी क्यूआर कोड असेल ज्यात प्रतिमा आणि लोकसंख्याशास्त्र सारखे अनुक्रमांक, भाग क्रमांक इ. मोबाइलवर ईपीआयसी डिजिटल मतदान कार्ड डाउनलोड केला जाऊ शकतो. संगणक आणि डिजिटल संग्रहित केला जाऊ शकतो.
डिजिटल मतदान कार्ड ऑनलाईन डाउनलोड करण्याची प्रोसेस – EPIC Digital Voting Card:
ईपीआयसी डिजिटल मतदान कार्ड (EPIC Digital Voting Card) खालील ऑनलाईन लिंकवर डाऊनलोड करता येईल, तथापि, मतदार-ओळखपत्र त्यांना पाठविले जाईल:
वरील ECI Voters Service Portal पोर्टल वर युजर प्रोफाइल रजिस्टर करा. त्यानंतर लॉगिन करून करा.
- Login and Sign-Up यावरती क्लिक करायचे आहे.
- नंतर तुमचा User Name व Password टाकायचा आहे. व Captcha Code भरायचा आहे. जर तुम्ही रजिस्ट्रेशन केले नसेल तर आपला मोबाईल नंबर टाकून रजिस्टर करून घ्यायचे आहे.
- Login वरती क्लिक करायचे आहे.
ECI Voters Service Portal पोर्टल लॉगिन केल्यावर “Download e-EPIC” या ऑप्शन वर क्लिक करा.
यानंतर EPIC नंबर किंवा Reference नंबर टाकून तुमचे राज्य सिलेक्ट करून सर्च वर क्लिक करा.
नंतर मतदान कार्ड धारकाचे EPIC नंबर, नाव, नातेवाईक नाव, राज्य, मोबाईल क्रमांक, ईमेल आयडी, इत्यादी तपशील पाहायला मिळेल. EPIC डिजिटल मतदान कार्ड (EPIC Digital Voting Card) डाउनलोड सुविधा फक्त नोंदणीकृत मोबाईल नंबर किंवा नोंदणीकृत ईमेल आयडीसह उपलब्ध आहे.
ओटीपी नोंदणीकृत मोबाईल नंबर वर पाठवला जाईल तो OTP प्रमाणीकरण करा. पुढे तुम्ही तुमचे EPIC डिजिटल मतदान कार्ड “Download e-EPIC” वर क्लिक करून PDF फाईल स्वरूपात (EPIC Digital Voting Card) डाउनलोड करू शकता.
खालील लेख वाचा !
- घरबसल्या मतदान कार्ड ऑनलाईन कसे काढायचे? सविस्तर प्रोसेस पाहण्यासाठी येथे क्लिक करा!
- अंतिम मतदार यादी वार्डनुसार PDF फाईल मध्ये ऑनलाईन कशी डाउनलोड करायची? सविस्तर प्रोसेस पाहण्यासाठी येथे क्लिक करा!
- निवडणूक आयोगामार्फत मतदारांसाठी विविध उपयोगी प्रणाली पाहण्यासाठी येथे क्लिक करा!
- मतदार यादीत नाव नसेल तर पात्र व्यक्तींनी नाव नोंदणी करण्याचे आवाहन !
- मतदार यादीतील आपल्या नावासोबत मोबाईल क्रमांक जोडून घेण्याचे आवाहन !
- दिव्यांग मतदारांना सक्षम ॲपच्या माध्यमातून विविध सुविधा उपलब्ध ! Saksham-ECI App
- निवडणूक उमेदवारांच्या गुन्हेगारी रेकॉर्ड पूर्ववृत्तांसाठी Know Your Candidate ॲप सुरू !
- मतदारकार्ड आधारकार्डला लिंक करण्याची ऑनलाईन प्रोसेस !
वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.
आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी इथे क्लिक करा !!
Mithun devidas moharkar