वैयक्तिक शौचालय अनुदान अर्जाचे स्टेटस ऑनलाईन चेक करा !
स्वच्छ भारत अभियान (ग्रा.) अंतर्गत दुसऱ्या टप्प्यात राज्यातील ग्रामीण भागातील वैयक्तिक शौचालय नसलेल्या पात्र कुटुंबांना वैयक्तिक शौचालयासाठी ऑनलाईन प्रणालीद्वारे अर्ज करण्याची सुविधा पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाने सुरु केली आहे. या प्रणालीद्वारे ग्रामीण भागातील पात्र कुटुंबांना वैयक्तिक शौचालय बांधण्याकरिता व त्यानंतर प्रोत्साहन अनुदान मान्यतेसाठी अर्ज केले होते, त्या वैयक्तिक शौचालय अनुदान अर्जाचे स्टेटस ऑनलाईन कसे चेक करायचे ते पाहूया.
ग्रामीण भागामध्ये स्वच्छते संदर्भात जनजागृती निर्माण करणे, स्वच्छतेची व्याप्ती वाढविणे व उघड्यावर मलविसर्जन करण्यास प्रतिबंध करण्यासाठी लाभार्थी कुटुंबाने वैयक्तिक शौचालयाचे बांधकाम पूर्ण केल्यानंतर अनुषंगिक प्रोत्साहन अनुदान देण्यात येते.
या योजनेअंतर्गत, दारिद्र्य रेषेखालील सर्व कुटुंबे व दारिद्र्यरेषेवरील अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, लहान व अल्पभूधारक शेतकरी, भूमिहीन शेतमजूर, शारीरिकदृष्ट्या अपंग आणि महिला कुटुंब प्रमुख हे घटक प्रोत्साहन अनुदानास पात्र करण्यात आले आहेत.
वैयक्तिक शौचालय अनुदान अर्जाचे स्टेटस ऑनलाईन चेक करा:
शौचालय अनुदान अर्जाचे स्टेटस ऑनलाईन चेक करण्यासाठी खालील स्वच्छ भारत मिशनच्या पोर्टलला भेट द्या.
https://sbm.gov.in/sbm_dbt/secure/login.aspx
स्वच्छ भारत मिशन पोर्टल मध्ये आता लॉगिन करण्यासाठी अर्ज करताना जो मोबाईल नंबर नोंदणी केला होता तो लॉगिन आयडी मध्ये टाका आणि पासवर्ड मध्ये मोबाईल नंबरचे शेवटचे ४ अंक टाका, जर तुम्ही पासवर्ड बदलला असेल तर तो टाका आणि Security Code टाकून Sign-In वर क्लिक करा.
पुढे तुमच्या अर्जाची स्थिती पाहण्यासाठी View Application वर क्लिक करून track status वर क्लिक करा.
हेही वाचा – तुमच्या गावातील शौचालय लाभार्थी यादी पहा ऑनलाईन – Swachh Bharat Mission – Toilet Beneficiary List
वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.
आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी येथे क्लिक करा !!