अपंग व्यक्तींना स्वयंरोजगारासाठी बीज भांडवल योजना !
आपण या लेखात अपंग व्यक्तींना स्वयंरोजगारासाठी बीज भांडवल योजना (Bij Bhandval Yojana) विषयीची सविस्तर माहिती पाहूया. मागील लेखामध्ये पंचायत राज्य संस्थांनी त्यांच्या स्वउत्पन्नातून ५ टक्के निधीतून घ्यावयाच्या अपंग कल्याणासाठी योजना व खर्चाबाबत मार्गदर्शक सूचना, तसेच विधवा, अपंग व निराधार अनुदानाच्या विशेष सहाय्य योजनांसाठी ऑनलाइन अर्ज कसा करायचा ते सविस्तर पाहिले आहे.
अपंग व्यक्तींना स्वयंरोजगारासाठी बीज भांडवल योजना – Bij Bhandval Yojana:
बेरोजगार अपंग युवकांना स्वयंरोजगार उपलब्ध करुन देणे आणि अपंगाना स्वतःच्या पायावर उभे राहून स्वावलंबी व्हावे व त्यांना समाजाचा कृतीशील घटक म्हणून जगता यावे यासाठी अपंग व्यक्तींना स्वयंरोजगारासाठी बीज भांडवल योजनेअंतर्गत अपंग व्यक्तींना स्वत:चा व्यवसाय, धंदा, उद्योग, शेती पूरक उद्योग, सुरु करण्यासाठी लागणारे अर्थसहाय्य राष्ट्रीयकृत बॅकेमार्फत परत फेडीच्या कर्जाच्या स्वरुपात बीज भांडवल उपलब्ध करुन देण्याची योजना आहे.
योजना ज्या प्रवर्गासाठी लागू आहे:
बीज भांडवल योजना (Bij Bhandval Yojana) अंध,अल्पदृष्टि, कर्णबधिर,अस्थिव्यंग व मतिमंद प्रवर्गासाठी लागू आहे.
योजनेच्या प्रमुख अटी:
- विहीत नमुन्यात जिल्हा समाज कल्याण अधिकारी यांचेकडे अर्ज सादर करणे आवश्यक आहे.
- अर्जदाराचे अपंग किमान 40 टक्के अथवा त्यापेक्षा जास्त असावे.
- अर्जदार महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा.अर्जदाराचे मासिक उत्पन्न रु 100000/- पेक्षा जास्त नसावे.
- अर्जदाराचे वय 18 ते 50 वर्षापर्यांत असावे.
दिल्या जाणाऱ्या लाभाचे स्वरूप:
बीज भांडवल (Bij Bhandval Yojana) योजने खाली अपंग व्यक्तींना रु 1.50 हजार प्रकल्प खर्चाच्या 20 टक्के अथवा कमाल 30000/- रुपये समाज कल्याण विभागाकडून अनुदान बीज भांडवल स्वरुपात देण्यात येते. उर्वरित 80 टक्के भाग बँकेकडून कर्जाच्या स्वरुपात उपलब्ध होते.
अर्ज करण्याची पध्दत:
विहीत नमुन्यातील अर्ज आवश्यक त्या कागदपत्रासह सादर करणे.
संपर्क कार्यालयाचे नाव:
जिल्हा समाज कल्याण अधिकारी, जिल्हा परिषद सर्व व सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, मुंबई शहर/उपनगर व संबंधीत बँक.
पुढील लेख देखील वाचा!
- पंचायत राज्य संस्थांनी त्यांच्या स्वउत्पन्नातून ५ टक्के निधीतून घ्यावयाच्या अपंग कल्याणासाठी योजना व खर्चाबाबत मार्गदर्शक सूचना
- विधवा, अपंग व निराधार अनुदानाच्या विशेष सहाय्य योजनांसाठी असा करा ऑनलाइन अर्ज !
- श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना
- इंदिरा गांधी राष्ट्रीय वृध्दापकाळ निवृत्तीवेतन योजना
- संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजनेंतर्गत सर्व लाभार्थ्यांच्या अर्थसहाय्यात वाढ !
- या ५ विशेष सहाय्य योजनांचे ऑफलाईन/ऑनलाईन अर्ज आता ग्रामपंचायत मध्ये ही भरता येणार !
- UDID Card : दिव्यांगांसाठीच्या विविध योजनांचा लाभ मिळण्यासाठी वैश्विक ओळखपत्र अनिवार्य !
- मोबाईल शॉप ऑन ई-व्हेईकल योजनेसाठी दिव्यांग व्यक्तींना अर्ज करण्याचे आवाहन !
- दिव्यांग व्यक्तींच्या मदतीसाठी आता महा-शरद पोर्टलवर नोंदणी सुरु !
वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.
आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी इथे क्लिक करा !!