महावितरणच्या वीज बिलावरील नावात बदल करण्यासाठी ऑनलाईन अर्ज कसा करायचा? जाणून घ्या सविस्तर माहिती !
महावितरण वीज मीटर जोडणी ज्या मालकांच्या नावे आहे, त्या नावात (Name Change Application MSEB) काही बदल करून घ्यायचा असल्यास किंवा घर बदलले आहे, वीज मीटरच्या जोडणीचे नाव बदलायचे आहे, त्यासाठी महावितरणच्या कार्यालयात हेलपाटे न मारता थेट महावितरणच्या पोर्टलवरून नाव बदल करून घेता येणार आहे, त्यामुळे वीज ग्राहकांचा श्रम, वेळ व पैशांची बचत होणार आहे.
पोर्टलवरून नवीन वीज जोडणीसाठी अर्ज करणे, वीज बिल पाहणे, ऑनलाईन भरणे, तक्रारी पाठविणे, त्यांचा पाठपुरावा करणे, रीडिंग नोंदवणे, जुन्या बिलांचा इतिहास आदी सुविधा पोर्टलमध्ये आहेत. वीज जोडणीच्या नावात (Name Change Application MSEB) बदल करणे, त्यासाठी आवश्यक कागदपत्रे अपलोड करणे अशा सुविधा नव्याने समाविष्ट आहेत.
महावितरणच्या वीज बिलावरील नावात बदल करण्यासाठी ऑनलाईन अर्ज करण्याची प्रोसेस – Name Change Application MSEB:
सर्व प्रथम खालील महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लिमिटेडच्या पोर्टलला भेट द्या, नंतर तुम्हाला इथे प्रवेश (Login) ऑप्शन दिसेल, प्रवेश (Login) वरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे जर तुमचा अकाउंट असेल तर थेट लॉगइन करू शकता जर, तुमचा अकाउंट नसेल तर तुम्हाला सर्वात पहिल्यांदा डाव्या साईडला नवीन सदस्य नोंदणी (New User Registration) या नावावरती इथे क्लिक करायचे आहे आणि नोंदणी करा.
https://wss.mahadiscom.in/wss/wss
करताना तुमचा ग्राहक क्रमांक टाकायचा आहे जो लाईट बिला वरती तुमच्या असेल. त्याच्यानंतर तुमचा मोबाईल नंबर, ईमेल, लॉगिन नाव आणि पासवर्ड टाकून सबमिट करायचा आहे.
नवीन सदस्य नोंदणी (Registration) झाल्यानंतर लॉग इन (Login) बटन वर क्लिक करायचे त्यांनतर Login Name, Password आणि Captcha टाकून Login करायचे आहे.
Login केल्यानंतर Add connection to my account मध्ये आपला ग्राहक प्रकार, ग्राहक क्रमांक, आणि बिलिंग युनिट नंबर कनेक्शन add करा.
ऍड केलेले कनेक्शनवर टिक करून Change Of Name वर क्लिक करा.
Form U – Change of Name (फॉर्म U – नावात बदल) अर्ज:
आता पुढील फॉर्म भरण्यासाठीच्या सूचना वाचा आणि Form U – Change of Name (फॉर्म U – नावात बदल) अर्ज भरा.
- कृपया संबंधित कॉलममध्ये संपूर्ण आणि योग्य माहिती भरा.
- अपूर्ण किंवा चुकीच्या माहितीसाठी अर्जदार पूर्णपणे जबाबदार असेल.
- अर्जदाराने अर्जाच्या भविष्यातील ट्रॅकिंगसाठी विनंती आयडी लक्षात ठेवण्याची विनंती केली जाते.
- अर्जदाराशी MSEDCL अधिकारी/कॉल सेंटरच्या प्रतिनिधीने पडताळणीसाठी तुमच्याद्वारे प्रदान केलेल्या ईमेल/मोबाइलवर संपर्क साधला जाईल.
- ईमेल पत्ता आणि मोबाईल क्रमांक अनिवार्य आहे.
- कृपया नाव बदलासाठी अनिवार्य संबंधित कागदपत्र अपलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.
- कृपया नाव बदलासाठी तुमचे संबंधित दस्तऐवज जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा.
- सिक्युरिटी डिपॉझिटच्या हस्तांतरणासाठी, जुन्या ग्राहकाने संमती दिली पाहिजे, अशा संमतीच्या अनुपस्थितीत येणारा ग्राहक सुरक्षा ठेव भरेल.
- थकबाकी असल्यास, या अर्जावर प्रक्रिया केली जाणार नाही आणि नवीन ग्राहकांना सूचना पाठविली जाईल.
- नाव बदलण्याची विनंती फक्त ऑनलाइन स्वीकारली जाईल.
- महावितरणच्या कोणत्याही कार्यालयात कोणतीही भौतिक कागदपत्रे सादर करायची नाहीत.
Form U – Change of Name मध्ये जुन्या मालकाचे नाव असेल आणि पुढे तुमचे नवीन नाव आणि इतर माहिती भरा.
तसेच नावात हस्तांतरण/दुरुस्तीचे कारण नमूद करून मी/आम्ही अटी व शर्ती मान्य करतो वर टिक करून ठिकानाचे नाव टाका आणि अर्ज सबमिट करा.
अर्ज सबमिट केल्यानंतर नाव (Name Change Application MSEB) बदलण्यासाठी अनिवार्य संबंधित दस्तऐवज अपलोड करण्यासाठी कृपया Click Here येथे क्लिक करा किंवा खालील लिंक वर क्लिक करा.
https://css.mahadiscom.in/UI/CHANGENAME/ChangeNameUploadDoc.aspx
आता इथे आपल्या मीटर ग्राहक क्रमांक किंवा अप्लिकेशन नंबर टाकून लॉगिन करा.
आता पुढे लॉगिन झाल्यानंतर महावितरणच्या वीज बिलावरील नावात (Name Change Application MSEB) बदल करण्यासाठी कारण निवडायचे आहे. यामध्ये तुम्ही पाहू शकता नावात बदल करण्यासाठी कारण निवडायचे तर हस्तांतरण किंवा दुरुस्ती असेल तर तुम्ही कारण निवडू शकता आता हे कारण पाहू शकता 10 कारणे तिथे दिलेली आहेत, त्यामध्ये योग्य ते कारण निवडून आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
- वैधानिक संस्था / सक्षम प्राधिकाऱ्याने जारी केलेले भोगवटा प्रमाणपत्र.
- मालकी दस्तऐवज/फॉर्म 8/फॉर्म 7-12/कर/स्थानिक प्राधिकरणाने जारी केलेला भाडेपट्टा.
- संबंधित कायदेशीर दस्तऐवजाची प्रमाणित प्रत (वारसा/वारसा/विल/भेटपत्राच्या बाबतीत).
- कंपनी कायदा 1956 च्या तरतुदीनुसार जारी केलेले निगमन प्रमाणपत्र.
- स्वतःसाठी प्रतिज्ञापत्र / राजपत्र अधिसूचना (जर अर्जदाराने स्वतःचे नाव बदलले असेल).
- मालकाचे भाडे आणि NOC चे समर्थन करणारे कायदेशीर दस्तऐवज. (अर्जदाराला जागा दिल्यास).
- फॉर्म “X” सुरक्षा ठेव हस्तांतरण अर्ज नमुना PDF फाईलसाठी येथे क्लिक करा.
महावितरणच्या वीज बिलावरील नावात बदल (Name Change Application MSEB) करण्यासाठी कारण निवडल्याप्रमाणे आणि वरील आवश्यक कागदपत्रे अपलोड केल्यानंतर अर्ज सबमिट करा आणि प्रक्रिया शुल्क भरा म्हणजे आपला अर्ज अर्जाच्या विनंतीवर प्रक्रिया करण्यासाठी महावितरणकडे पाठवला जाईल.
महावितरणच्या वीज बिलावरील नावात बदल अर्जाची स्थिती तपासा:
खालील लिंक वरून आपण महावितरणच्या वीज बिलावरील नावात बदल (Name Change Application MSEB) अर्जाची स्थिती तपासू शकतो, त्यासाठी आपल्या मीटर ग्राहक क्रमांक किंवा अप्लिकेशन नंबर टाकून लॉगिन करा.
https://css.mahadiscom.in/UI/CHANGENAME/ChangeNameUploadDoc.aspx
आता आपण खालील अर्जामध्ये Application Status मध्ये Application Received म्हणून अर्जाची स्थिती दिसून येते.
महावितरणच्या वीज बिलावरील नावात बदल (Name Change Application MSEB) अर्जाच्या विनंतीवर प्रक्रिया करण्यासाठी प्रक्रिया शुल्क भरल्याच्या तारखेपासून साधारणतः 2 बिलिंग सायकल लागू शकतात. 2 बिलिंग सायकल झाल्यानंतर आपण पुन्हा अर्जाची स्थिती तपासू शकता.
2 बिलिंग सायकल झाल्यानंतर अर्जाची स्थिती आपण खालील अर्जामध्ये Application Status मध्ये Application Approved म्हणून अर्जाची स्थिती दिसून येते, याचा अर्थ आपला अर्ज मंजूर होऊन पुढील महावितरणच्या वीज बिलावरील नावात (Name Change Application MSEB) बदल होऊन येईल.
आपला अर्ज 2 बिलिंग सायकल झाल्यानंतरही मंजूर करत नसतील तर खालील संपर्क यादीतील आपल्या भागातील अधिकारी व कर्मचार्यांच्या नंबरवर फोन करा आणि आपला अर्ज क्रमांक सांगून तो मंजूर म्हणजेच Application Approved करण्यासाठी सांगा.
महाराष्ट्र महावितरणच्या अधिकारी व कर्मचार्यांची संपर्काची माहिती PDF फाईल:
महाराष्ट्र महावितरणच्या अधिकारी व कर्मचार्यांची संपर्काची माहिती PDF फाईल डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.
- राष्ट्रीय टोल-फ्री: १९१२ / १९१२०
- महावितरण टोल-फ्री: १८००-१०२-३४३५ / १८००-२३३-३४३५
- ऊर्जा मंत्री हेल्पडेस्क: 9833717777 / 9833567777
- ईमेल: customercare@mahadiscom.in / helpdesk_pg@mahadiscom.in
खालील लेख देखील वाचा!
- महावितरणच्या वीज बिलावरील पत्त्याची दुरुस्ती करण्यासाठी ऑनलाईन अर्ज कसा करायचा? – Online Address Correction Application MSEB
- थकबाकीमुळे वीज कनेक्शन तोडलेल्या ग्राहकांसाठी महावितरणची अभय योजना!
- रोहित्र दुरुस्तीसाठी आता महावितरण ॲपवर माहिती देण्याची सुविधा !
- महावितरणच्या ‘गो- ग्रीन’ योजनेंतर्गत नोंदणी करा आणि दरमहा वीजबीलामध्ये 10 रुपये वाचवा – MSEDCL Go Green Ebill Application
- वीज बिल जास्त आले असेल तर काय करायचे? खराब मीटर बदलून नवीन मीटर कसा घ्यायचा? जाणून घ्या सविस्तर माहिती !
- मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना; आता शेतकऱ्यांना मिळणार मोफत वीज!
- विजेचे युनिट रेट/आकार आणि वीज ग्राहकांचे अधिकार
- शेतातून वीजेची लाईन गेल्यास किंवा टॉवर उभारल्यास आता इतका मोबदला मिळणार !
वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.
आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी येथे क्लिक करा !!