वृत्त विशेषमहाराष्ट्र शासन निर्णय - GRसरकारी कामेसरकारी योजना

पशुसंवर्धन विभागामार्फत देण्यात येणाऱ्या विविध सेवांच्या सेवाशुल्कात सुधारणा – Changes in AHD service charges

पशुसंवर्धन विभागांतर्गत सर्व प्रकारच्या पशुवैद्यकीय दवाखान्यांमार्फत शेतकरी/ पशुपालक यांचेकडील रुग्ण पशु-पक्ष्यांना विविध पशुवैद्यकीय सेवा देण्यासाठी सेवाशुल्काचे दर निश्चित करण्यात आलेले असून त्यास बराच कालावधी लोटलेला आहे. रुग्ण पशुंवर उपचार करण्यासाठी आवश्यक असलेल्या सर्व प्रकारच्या औषधी, शल्यचिकित्सेसाठी आवश्यक हत्यारे, उपकरणे, अवजारे इ. च्या किंमतीत मागील काही वर्षात वाढ झालेली आहे.

पशुसंवर्धन विभागांतर्गत रुग्ण पशु-पक्ष्यांवर उपचार करण्यासाठी सध्या आकारण्यात येत असलेल्या विविध सेवांसाठीच्या सेवाशुल्काच्या दरात सुधारणा करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. वर नमुद केलेली वस्तुस्थिती विचारात घेवून पशुसंवर्धन विभागामार्फत देण्यात येत असलेल्या विविध सेवांच्या सेवाशुल्कासंदर्भात खालील शासन निर्णयातील वाचा अनुक्रमांक १, २ व ३ येथील शासन निर्णय अधिक्रमित करून खालीलप्रमाणे शासन निर्णय निर्गमित करण्यात येत आहे.

पशुसंवर्धन विभागामार्फत देण्यात येणाऱ्या विविध सेवांच्या सेवाशुल्कात सुधारणा – (Changes in AHD service charges):

(1) राज्यातील पशुवैद्यकीय दवाखान्यांमार्फत शेतकरी/पशुपालक यांच्याकडील रूग्ण पशु-पक्ष्यांना विविध पशुवैद्यकीय सेवा देण्यासाठी आकारावयाच्या सेवाशुल्कांच्या सुधारीत दरांचा तपशिल पुढीलप्रमाणे असून, सदरचे दर हे प्रति पशु, पक्षी, तपासणी, चाचणीसाठीचे आहेत.

अ.क्र.बाबसुधारित दर (रूपये)
1पशुस्वास्थ्य विषयक सेवा केस पेपर शुल्कनिशुल्क
उपचार१०/-
खच्चीकरण (वळू, रेडा, वराह, बोकड व नर मेंढा)१०/-
2रोग प्रतिबंधक लसीकरण
जनावरे (लहान तसेच मोठी)१/-
कुक्कुट पक्षी१/-
3शस्त्रक्रिया 
लहान शस्त्रक्रिया 
कुत्री व मांजर१००/-
मोठी जनावरे (खच्चीकरण वगळून)५०/-
वासरे, शेळी, मेंढी, वराह व इतर२०/-
मोठ्या शत्रक्रीया
कुत्री व मांजर१५०/-
मोठी जनावरे७०/-
वासरे, शेळी, मेंढी, वराह व इतर५०/-
4कृत्रिम रेतन व अनुषंगिक सेवा
कृत्रिम रेतन (दवाखान्यात)५०/-
कृत्रिम रेतन (शेतकऱ्यांच्या दारात)५०/-
5गर्भधारणा तपासणी (कृत्रिम रेतना व्यतिरिक्त)१०/-
6गायी/म्हशींतील वंध्यत्व तपासणी१०/-
7रोग नमुने तपासणी
डी.एल.सी.१०/-
आरबीसी काऊंट१०/-
डब्ल्यूबीसी काऊंट१०/-
रक्त काचपट्टी१०/-
शेण नमुने१०/-
मुत्र नमुने१०/-
स्क्रॅपिंग्ज१०/-
इतर (वरील चाचण्या व्यतिरिक्त)१०/-
8रक्त व रक्तजल तपासणी
ग्लुकोज२०/-
फॉस्फरस२०/-
क्रियेटीनीन२०/-
कॅल्शियम२०/-
रक्तातील हिमोग्लोबीन२०/-
9उती नमुने तपासणी१०/-
10पाणी, खाद्य, व्हिसेरा नमुन्याची विषबाधा तपासणी१००/-
11दुध नमुने तपासणी१००/-
12क्ष – किरण तपासणी
लहान जनावरे (कुत्री, मांजर, वासरे, शेळी, मेंढी, वराह व इतर)१००/-
मोठी जनावरे१००/-
13सोनोग्राफी
लहान जनावरांच्या प्रत्येक तपासणीकरिता (कुत्रे, शेळी, मेंढी, वआरबीसी काऊंट राह व इतर लहान पशु)१००/-
सर्व मोठ्या जनावरांच्या प्रत्येक तपासणीकरिता१००/-
14आरोग्य दाखले
मोठी जनावरे५०/-
लहान जनावरे२०/-
15महाराष्ट्र प्राणी रक्षण कायदा १९७६ (सुधारणा १९९५) अंतर्गत अनुसूचित पशुची कत्तलपुर्व तपासणी२००/-
16शवविच्छेदन (न्याय वैद्यक प्रकरण वगळून)१००/-

गायी-म्हशींमधील दवाखान्यात तसेच शेतकऱ्यांच्या दारात केलेली कृत्रिम रेतने यासाठीच्या सेवाशुल्काची रक्कम प्रचलित पध्दतीनुसार महाराष्ट्र पशुधन विकास मंडळ, नागपूर या संस्थेकडे भरणा करण्यात यावी. उपरोक्त प्रमाणे सुधारित सेवाशुल्काचे दर दि.२१.०६.२०२२ पासून अंमलात येतील.

आयुक्त पशुसंवर्धन, पुणे यांनी दर तीन वर्षांनी उपरोक्त सुधारित सेवाशुल्कांच्या दरात १० टक्के वाढ करुन तसे सर्व क्षेत्रिय कार्यालयांना आगावू परिपत्रित करण्यात यावे, असे निर्देश शासन निर्णयामध्ये दिले आहेत.

शासन निर्णय: पशुसंवर्धन विभागामार्फत देण्यात येणाऱ्या विविध सेवांच्या सेवाशुल्कात सुधारणा करण्याबाबत शासन निर्णय पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

हेही वाचा – राष्ट्रीय पशुधन अभियान (NLM); शेळी-मेंढी, कुक्कुट, वराह पालन व वैरण बियाणे उत्पादनाकरीता योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करा – National Livestock Mission

वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.

आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी येथे क्लिक करा !!

शेअर करा:
WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Channel Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.