घरबसल्या मोफत करा पॅनकार्ड अपडेट – Update PAN Card Online
ज्या अर्जदारांकडे वैध आधार क्रमांक आहे त्यांच्यासाठी ई-पॅन सुविधा झटपट पॅनचे वाटप करण्यात येत आहे. अर्जदारांना पीडीएफ स्वरूपात पॅन जारी केला जातो, जो विनामूल्य आहे, तसेच आपल्या पॅनकार्ड मध्ये दुरुस्ती (PAN Card Update) करायचे असेल तर आयकर विभागाच्या पोर्टलवरून विनामूल्य मध्ये करू शकता.
घरबसल्या मोफत करा पॅनकार्ड अपडेट – Update PAN Card Online:
आधार ई-केवायसी नुसार पॅनकार्ड तपशील अपडेट करण्यासाठी खालील आयकर विभागाच्या पोर्टला भेट द्या.
https://eportal.incometax.gov.in/iec/foservices/#/pre-login/instant-e-pan/update-pan-details
आता Update PAN Details मध्ये पॅन तपशील अपडेट करण्यासाठी Update PAN वर क्लिक करा.
तुमचा 12 अंकी आधार क्रमांक टाका:
पुढे तुमचा 12 अंकी आधार क्रमांक टाका. खालील तपशील कन्फर्म करून Continue वर क्लिक करा.
- मी आधारशी पॅन लिंक केले आहे.
- माझा मोबाईल नंबर आधार क्रमांकाशी जोडलेला आहे.
- माझी पूर्ण जन्मतारीख (DD-MM-YYYY) आधार कार्डवर उपलब्ध आहे.
OTP प्रमाणीकरण – OTP Validation:
तुमच्या आधार लिंक केलेल्या मोबाईल नंबरवर SMS द्वारे OTP जनरेट करण्याची विनंती UIDAI कडे पाठवली जाईल – कृपया अटी वाचा आणि संमती देऊन Continue वर क्लिक करा.
कृपया तुमच्या आधार नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर प्राप्त झालेला आधार ओटीपी प्रविष्ट करून Continue वर क्लिक करा. तुम्ही प्रविष्ट केलेल्या ओटीपीचे यशस्वी प्रमाणीकरण केल्यानंतर, ई-केवायसी आधार डेटासाठी विनंती UIDAI कडून प्राप्त केली जाईल.
पॅन तपशील निवडा आणि अपडेट करा
तुमच्या आधार तपशिलावर आधारित तुम्हाला अपडेट करायचा असलेला डेटा निवडा.
- फोटो
- नाव
- जन्मतारीख
- लिंग
- मोबाईल नंबर
- ई – मेल आयडी
- पत्ता
लक्षात ठेवा:
- फोटो: आधारनुसार फोटो डीफॉल्टनुसार अपडेट केला जाईल.
- जन्मतारीख : PAN साठी पूर्ण जन्मतारीख (DD-MM-YYYY) अनिवार्य आहे, आधारमध्ये फक्त जन्मवर्ष असलेल्या वापरकर्त्याला DOB अपडेट करण्याची परवानगी नाही.
- ईमेल आयडी : पॅनमध्ये अपडेट करण्यासाठी आधार ईमेल आयडी सत्यापित करणे आवश्यक आहे.
- पत्ता अद्ययावत करा.
तुम्हाला अपडेट करायचे असलेल्या तपशीलांची पुष्टी करण्यासाठी Confirm वर क्लिक करा.
तुमच्या आधारनुसार ई-केवायसी तपशीलांवर आधारित आयकर विभागाकडे पॅन तपशील अपडेट करण्याची तुमची विनंती यशस्वीरित्या सबमिट करण्यात आली आहे.
त्यासाठीचा पोचपावती क्रमांक FOS……….. आहे कृपया स्थिती तपासण्यासाठी किंवा ई-पॅन डाउनलोड करण्यासाठी भविष्यातील हेतूंसाठी पावती क्रमांक जतन करा. तुमच्या मोबाईल नंबर आणि ईमेल आयडीवर पोचपावती क्रमांकही पाठवला आहे.
वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.
आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी येथे क्लिक करा !!