होमगार्ड मुख्यालयात ‘होमगार्ड समाधान कक्ष’ स्थापन; व्हॉट्सॲपवरही होणार शंकांचे निरसन
होमगार्ड संघटनेच्या अधिपत्याखालील जिल्हा होमगार्ड कार्यालयातील मानसेवी होमगार्ड, वेतनी कर्मचारी व अधिकारी यांच्या प्रशासकीय व अन्य शासकीय बाबीशी संबंधी अनेक प्रकारच्या तक्रारींवर विहित वेळेत कार्यवाही करुन तक्रारदारांच्या शंकाचे निरसन करणे. त्यांना योग्य व समर्पक उत्तरे देणे. त्यानुसार पुढील कार्यवाही करण्याकरिता होमगार्ड मुख्यालयात ‘होमगार्ड समाधान कक्ष – Homeguard Samadhan Kaksh’ स्थापन करण्यात आले आहे, असे महासमादेशक होमगार्ड, मुंबई कार्यालयाने प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.
होमगार्ड समाधान कक्ष – Homeguard Samadhan Kaksh:
सर्व मानसेवी होमगार्ड यांना काही सूचना / निवेदने करावयाचे असल्यास होमगार्ड मुख्यालयाच्या समाधान कक्षाचा व्हॉट्सॲप क्रमांक ८३५५८६४९३२ यावर निवेदने / सूचना सादर करता येणार आहेत.
सर्व मानसेवी होमगार्ड यांचेकडुन सुचना/निवेदने समाधान कक्षास प्राप्त झाल्यावर महासमादेशक डॉ. बी. के. उपाध्याय, उपमहासमादेशक ब्रिजेश सिंह हे व्यक्तीश: लक्ष देवून संबंधितांच्या शंकांचे निरसन करणार आहेत.
सर्व मानसेवी होमगार्ड/अधिकारी यांनी होमगार्ड संघटना सक्षम व त्याचे नाव उज्वल करण्याकरिता प्रयत्नशील रहावे, असे आवाहनही प्रसिद्धीपत्रकाद्वारे करण्यात आले आहे.
हेही वाचा – नागरी संरक्षण दलातील स्वयंसेवक विषयी सविस्तर माहिती; – निकष, अटी व शर्ती, कर्तव्य व जबाबदाऱ्या
वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.
आमच्या सोशल मीडिया ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी इथे क्लिक करा !!