कृषी योजनामहाराष्ट्र शासन निर्णय - GRवृत्त विशेषसरकारी योजना

मातोश्री ग्रामसमृध्दी शेत/पाणंद रस्ते योजना अंतर्गत गावांची यादी !

पालकमंत्री शेत/पाणंद रस्ते योजनेतुन कामे पूर्ण करतांना येणाऱ्या अडचणी व निधीची कमतरता यामुळे सदर योजना अधिक कार्यक्षम करणे गरजेचे झाले होते. त्यानुषंगाने “पालकमंत्री शेत/पाणंद रस्ते योजनेचे” सर्व शासन निर्णय व शुध्दीपत्रके अधिक्रमित करुन सदर योजना अधिक सुटसुटीत करण्यात आली असुन सदर योजनेचे नामकरण “मातोश्री ग्रामसमृध्दी शेत/पाणंद रस्ते योजना” असे करण्यात आले आहे.

मातोश्री ग्रामसमृध्दी शेत/पाणंद रस्ते योजना अंतर्गत गावांची यादी !

मनरेगा आणि राज्य रोहयो यांच्या अभिसरणातुन सदर योजना राबवायची असुन शेत/पाणंद रस्त्यांच्या कामांकरीता पुरक कुशल निधी राज्य रोहयोंतर्गत उपलब्ध करुन देण्याबाबत सदर शासन निर्णयात तरतुद करण्यात आली आहे. तसेच, अन्य योजनांच्या अभिसरणाव्दारे आणि मनरेगांतर्गत अनुज्ञेय इतर कामे यांच्या संयोजनातुन देखील शेत/पाणंद रस्ते योजना राबविण्याबाबत सदर शासन निर्णयाव्दारे सुचना देण्यात आल्या आहेत.

“मातोश्री ग्रामसमृध्दी शेत/पाणंद रस्ते योजने अंतर्गत शेत/पाणंद रस्त्यांच्या कामांकरीता पुरक कुशल निधी प्राप्त होण्यासाठी सदर शेत/पाणंद रस्त्यांच्या आराखड्यास शासन स्तरावरुन मान्यता घेणे आवश्यक आहे. त्याकरीता संबंधीत ग्रामपंचायत, पंचायत समिती आणि जिल्हा परिषद यांच्यामार्फत शासनस्तरावर प्रस्ताव सादर करण्याबाबतचे वेळापत्रक उपरोक्त शासन निर्णयात नमूद करण्यात आले आहे.

तथापि, लोकप्रतिनिधींची मागणी आणि चालु आर्थिक वर्षाचा उर्वरित कालावधी विचारात घेऊन “मातोश्री ग्रामसमृध्दी शेत/पाणंद रस्ते योजने अंतर्गत यावर्षीही शेत/पाणंद रस्त्यांचे प्रस्ताव मागविण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्यानुसार “मातोश्री ग्रामसमृध्दी शेत/पाणंद रस्ते योजने अंतर्गत शेत/पाणंद रस्त्यांच्या आराखड्यास मान्यता देण्यासंदर्भात काही जिल्ह्यांचे प्रस्ताव प्राप्त झाले आहेत. त्यानुषंगाने निर्णय घेण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

सदर शासन निर्णयासोबत जोडलेल्या परिशिष्ट “अ” मध्ये नमूद शेत/पाणंद रस्त्यांच्या कामांचा “मातोश्री ग्रामसमृध्दी शेत/पाणंद रस्ते योजनेच्या ”आराखड्यात समावेश करण्यास पुढील अटी व शर्ती यांच्या अधिन राहुन शासनाची मान्यता देण्यात येत आहे.

मातोश्री ग्रामसमृध्दी शेत/पाणंद रस्ते योजना अटी/शर्ती:

१) खालील शासन निर्णयातील परिशिष्ट “अ” मध्ये नमूद शेत/पाणंद रस्त्यांचे कामे तरतुदीनुसार करण्यात येतील.

२) खालील शासन निर्णयातील परिशिष्ट “अ” मध्ये नमूद शेत/पाणंद रस्त्यांची कामे सुरु करण्यापुर्वी सदर शेत/पाणंद रस्त्यांचा समावेश महसुल विभागाच्या संबंधित गाव नकाशामध्ये असल्याबाबत खातरजमा करावी.

३) आराखडयात समावेश असलेली कामे सुरु करण्यापुर्वी सदर कांमांकरीता संबंधित ग्रामपंचायतीने ठराव केला असल्याबाबत खातरजमा करण्यात यावी.

४) उक्त शेत/पाणंद रस्त्यांच्या कामामुळे कोणत्याही खाजगी जमिनीवर अतिक्रमण होणार नाही, याची दक्षता घेण्यात यावी.

५) तसेच सदर शेत/पाणंद रस्त्यांच्या कामांकरीता कोणतेही भुसंपादन “मातोश्री ग्रामसमृध्दी शेत/पाणंद रस्ते योजने अंतर्गत अनुज्ञेय असणार नाही.

६) सदर शेत/पाणंद रस्त्यांची कामे मनरेगा आणि राज्य रोहयो यांच्या अभिसरणातुन राज्य रोहयोमधुन पुरक कुशल अनुदान उपलब्ध करुन पुर्ण करण्यात येतात. त्यामुळे सदर योजनांसंदर्भात केंद्र शासन व राज्य शासन यांच्याव्दारा वेळोवेळी निर्गमित करण्यात आलेल्या आदेशांचे पालन करण्यात येईल.

७) एखाद्या विवादग्रस्त शेत/पाणंद रस्त्यासंदर्भात मा. न्यायालयाचे मनाई आदेश/जैसे – थे आदेश असल्यास अशा प्रकरणी मा. न्यायालयाचा अवमान होणार नाही, याची दक्षता घेण्यात यावी.

८) अन्य योजनेंतर्गत शेत/पाणंद रस्त्यांचे काम मंजुर असल्यास अशी कामे पुन्हा मातोश्री ग्रामसमृध्दी शेत/पाणंद रस्ते योजनेंतर्गत अनुज्ञेय असणार नाहीत.

मातोश्री ग्रामसमृध्दी शेत/पाणंद रस्ते योजना अंतर्गत गावांची यादी आणि शासन निर्णय:

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत मातोश्री ग्राम समृध्दी पाणंद रस्ते सहमती प्रदान कामांची यादी आणि शासन निर्णय पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

पुढील लेख देखील वाचा!

  1. मातोश्री ग्रामसमृध्दी शेत/ पाणंद रस्ते योजना; शेत रस्त्यासाठी शेतकऱ्यांना मिळणार अनुदान !
  2. शेत रस्त्यासाठी कायदेशीर मागणी अर्ज कसा करायचा? जाणून घ्या सविस्तर !

वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.

आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी इथे क्लिक करा !!

शेअर करा:
WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Channel Join Now

One thought on “मातोश्री ग्रामसमृध्दी शेत/पाणंद रस्ते योजना अंतर्गत गावांची यादी !

  • आनंता शेळके

    मातोश्री ग्राम सम्रुद्धी पांदणशेत रस्ते योजना प्रत्येक शेतकऱ्यांच्या शेतात राबविणार का ? की फक्त डंका पिटविणार

    Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.