MahaDBT Scholarship : महाडीबिटी शिष्यवृत्ती / फ्रीशीप योजनांकरिता ऑनलाईन अर्ज सुरु !
महाराष्ट्र शासनाच्या सर्व प्रकारच्या शिष्यवृत्तीसाठी (MahaDBT Scholarship) महाडीबीटी पोर्टलवर कार्यान्वीत झाले असून, खालील MAHADBT च्या संकेतस्थळाचा वापर करुन अनुसूचित जाती, विजाभज, इमाव व विमाप्र प्रवर्गातील विद्यार्थ्याकरिता सामाजिक न्याय विभाग व विजाभज, इमाव व विमाप्र कल्याण विभागाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या विविध शिष्यवृत्ती / फ्रीशीप योजनांकरिता विद्यार्थ्यांनी आपले ऑनलाईन अर्ज नोंदणीकृत करुन हा अर्ज आपल्या संबंधित महाविद्यालयाकडून तपासून व पडताळणी करुन महाविद्यालयांनी सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण विभाग यांचेकडे मान्यतेस्तव सादर करावा.
महाडीबिटी शिष्यवृत्ती / फ्रीशीप योजनांकरिता ऑनलाईन अर्ज करण्याची प्रोसेस ( Apply Online For MahaDBT Scholarship):
शिष्यवृत्ती योजनांचा (MahaDBT Scholarship) लाभ घेण्यासाठी आपला मोबाईल क्रमांक आधार कार्डशी संलग्न करणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती / फ्रीशीप योजनांकरिता ऑनलाईन अर्ज करण्यासाठी खालील Maha DBT या संकेतस्थळाला भेट द्या आणि आपली मराठी भाषा निवडा.
https://mahadbt.maharashtra.gov.in/login/login
वरील Maha DBT या संकेतस्थळाला भेट दिल्यानंतर “पोस्ट मॅट्रिक शिष्यवृत्ती/प्रीमॅट्रिक शिष्यवृत्ती” हा पर्यायावर क्लिक करा.
पोस्ट मॅट्रिक शिष्यवृत्ती या पर्यायावर क्लिक केल्यानंतर “नवीन अर्जदार नोंदणी” या पर्यायावर क्लिक करा, जर तुम्ही अगोदर नोंदणी केली असेल तर “अर्जदार लॉगिन” वर क्लिक करा.
नवीन नोंदणी मध्ये अर्जदाराचे नाव, युजर नेम, पासवर्ड, ईमेल आयडी आणि भ्रमणध्वनी क्रमांक टाकून नोंदणी करा. नोंदणी झाल्यावर “अर्जदार लॉगिन” वर क्लिक करा.
सूचना:-
- कृपया आपला वर्तमान मोबाइल नंबर आपल्या आधार क्रमांकाशी जोडलेला आहे याची खात्री करा.
- आपले नोंदणीकृत वापरकर्ता नाव प्रविष्ट करा.
- आपला संकेतशब्द प्रविष्ट करा.
- प्रतिमेत दाखविलेले सुरक्षा मजकूर प्रविष्ट करा.
- लॉगिन पासवर्ड आणि सुरक्षा मजकूर पुष्टी झाल्यानंतर लॉगिनसाठी लॉग इन करा बटणावर क्लिक करा.
- जर रजिस्ट्रेशन करताना आपण आपला पासवर्ड विसरला असल्यास, “पासवर्ड विसरला” बटणावर क्लिक करा.
- जर रजिस्ट्रेशन करताना आपण आपला वापरकर्ता नाव विसरला असल्यास, “वापरकर्ता नाव विसरला” बटणावर क्लिक करा.
लॉगिन केल्यावर शिष्यवृत्ती अर्जा मध्ये आवश्यक माहिती, कागदपत्रे अपलोड करा आणि अर्ज सबमिट करा.
हेही वाचा – “शाळाबाह्य, अनियमित व स्थलांतरीत बालकांसाठी ‘मिशन झिरो ड्रॉपआऊट’ – (Mission Zero Dropout)
वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.
आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी इथे क्लिक करा !!