महाराष्ट्र शासन निर्णय - GRवृत्त विशेषसरकारी कामेस्पर्धा परीक्षा

आता राज्यातील शाळांमधील शिक्षक व विद्यार्थ्यांची हजेरी MahaStudent App द्वारे नोंदविली जाणार !

राज्यात प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमांतर्गत तंत्रस्नेही शिक्षकांची आणि डीजीटल शाळांची चळवळ मोठ्या प्रमाणात उभी राहिली आहे. तंत्रस्नेही शिक्षकांच्या मदतीने राज्यात सरल प्रणालीवर सर्व शाळा, शिक्षक व विद्यार्थ्यांची माहिती भरण्यात आली आहे. भारत सरकारने PGI (Performance Grading Index) हा निर्देशांक विकसित केला आहे. यामध्ये शिक्षक व विद्यार्थ्यांची डिजीटल पध्दतीने उपस्थिती घेतली जाणार. राज्याने विकसित केलेल्या सरल प्रणाली मध्ये शाळांच्या विद्यार्थी व शिक्षक यांच्या माहितीच्या आधारे राज्यातील शाळांमधील विद्यार्थ्यांची व शिक्षकांची उपस्थिती नोंदविण्यासाठी सरल प्रणाली आधारित सुविधा उपलब्ध करून राज्यातील सर्व विद्यार्थ्यांची व शिक्षकांची उपस्थिती डिजीटल पध्दतीने MahaStudent App द्वारे भरून घेण्यास मान्यता देण्यात आली आहे.

यानुसार विभागामार्फत MahaStudent हे App विकसित करण्यात आले आहे. सदर App हे गुगल प्ले स्टोअर वर MahaStudent या नावाने उपलब्ध आहे. या App मध्ये शिक्षकांसाठी विद्यार्थ्यांची उपस्थिती डिजीटल पध्दतीने नोंदविण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

MahaStudent App च्या आधारे शिक्षकाला आपल्या वर्गातील अनुपस्थित विद्यार्थ्यांची गैरहजेरी काही क्लिक सरशी नोंदविता येणार आहे. याचसोबत शाळेमधील सर्व शिक्षकांची उपस्थिती नोंदविण्याची सुविधा देखील उपलब्ध करून देण्यात आली आहे.

MahaStudent App मुळे शिक्षकांना विद्यार्थ्यांचे हजेरीपत्रक वेगळ्याने ठेवण्याची आवश्यकता राहणार नाही. याचसोबत मध्यान्ह भोजन योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांची वेगळी माहिती भरण्याची आवश्यकता राहणार नाही यासाठी आवश्यक असणारे दोन्ही App चे एकत्रीकरण करण्यात येईल. यामुळे राज्य, जिल्हा, तालुका व केंद्रस्तरावर एका क्लिकवर विद्यार्थ्यांची उपस्थिती व शिक्षकांची उपस्थिती कळण्यास मदत होणार आहे.

अशा प्रकारे राज्यातील सर्व विद्यार्थ्यांची व शिक्षकांची उपस्थिती डिजीटल पध्दतीने MahaStudent App  द्वारे भरून घेण्यास मान्यता देण्यात आली आहे.

महास्टुडन्ट ऍप – MahaStudent App:

MahaStudent मोबाईल ऍप्लिकेशन शालेय शिक्षण आणि क्रीडा विभाग, सरकारसाठी विकसित केले आहे. SARAL पोर्टलवरील शाळेतील विशिष्ट इयत्ता आणि विभागासाठी नियुक्त केलेले शिक्षक MahaStudent मोबाइल अॅप वापरून नोंदणी करू शकतात. कॅटलॉगमधील विद्यार्थ्यांना दैनंदिन उपस्थिती जमा करण्यासाठी तसेच परीक्षेचे गुण भरण्यासाठी मोबाईलवर उपलब्ध करून दिले जाते.

MahaStudent App डाउनलोड करा:

MahaStudent App डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा.

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग शासन निर्णय: राज्यातील शाळांमधील शिक्षक व विद्यार्थ्यांची हजेरी MahaStudent App द्वारे नोंदविण्याबाबत दि. 03-11-2021 रोजीचा शासन निर्णय पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

हेही वाचा – COVID 19 स्कॉलरशिप 15 ते 75 हजारसाठी असा भरा ऑनलाईन फॉर्म – HDFC Bank launches Covid Crisis Support Scholarship

वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.

आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी इथे क्लिक करा !!

शेअर करा:
WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Channel Join Now

2 thoughts on “आता राज्यातील शाळांमधील शिक्षक व विद्यार्थ्यांची हजेरी MahaStudent App द्वारे नोंदविली जाणार !

  • satyapal madne

    aapli mahiti copy pest hot nahi karnyasathi kay karave lagel.

    Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.