आपले सरकार - महा-ऑनलाईनवृत्त विशेषसरकारी कामे

आधार PVC कार्ड ATM सारखं दिसणार आधार कार्ड ऑनलाईन ५० रुपयात बनवा, जाणून घ्या सविस्तर प्रोसेस !

आपण या लेखामध्ये आधार PVC कार्ड कसे बनवायचे याची सविस्तर माहिती पाहणार आहोत. आधार कार्ड (Aadhar Card) हे देशातील प्रत्येक नागरिकासाठी महत्त्वाचा दस्तावेज आहे. आधार कार्ड चा उपयोग शासकीय तसेच सरकारी कामासाठी होत असतो. अशावेळी तुमचे आधार कार्ड सुरक्षित असणे आवश्यक आहे. हेच लक्षात घेता UIDAI ने आता एटीएम प्रमाणे दिसणारे Aadhaar PVC Card जारी केले आहे. हे कार्ड तुम्ही केवळ 50 रुपयात बनवू शकता. जाणून घ्या हे कार्ड तुम्ही ऑनलाइन कसे मागवू शकता. ऑर्डर केल्याच्या 5 दिवसानंतर कार्ड डिपार्टमेंटकडून तुमच्या घरी पाठवले जाईल. PVC कार्ड एक प्रकारचे प्लॅस्टिकचे कार्ड असते.

आधार पीव्हीसी कार्ड ऑनलाईन ऑर्डर करण्याची प्रक्रिया – Aadhaar PVC card:

सर्वप्रथम नवीन आधार PVC कार्ड ऑनलाईन ऑर्डर करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करून UIDAI ची myaadhaar वेबसाईट ओपन करा.

https://myaadhaar.uidai.gov.in

वरील UIDAI च्या MyAadhaar पोर्टल वरती गेल्यावर त्यामध्ये तुम्हाला Login या ऑप्शन वर क्लिक करा.

Login
Login

Login वर क्लिक केल्यानंतर तुमचा १२ अंकी आधार नंबर, कॅप्चा कोड टाका व Send OTP या ऑप्शन वर क्लिक करा नंतर रजिस्टर मोबाइल नंबर वर जो OTP नंबर येईल तो टाकून Login ऑप्शन वर क्लिक करायचे आहे.

Login with Aadhaar and OTP
Login with Aadhaar and OTP

लॉगिन केल्यानंतर Order Aadhaar PVC Card या वरती क्लिक करायचे आहे.

Order Aadhaar PVC Card
Order Aadhaar PVC Card

Order Aadhaar PVC Card या वरती क्लिक केल्यानंतर आधार पीव्हीसी कार्डसाठी ऑर्डर देण्यापूर्वी कृपया आपल्या Demographic तपशीलांचे पूर्वावलोकन करा आणि Next बटन वर क्लिक करा.

सूचना : जर तुम्हाला तुमच्या आधारशी कोणतीही चुकीची/गहाळ/जुनी/कालबाह्य माहिती आढळली, तर तुम्ही जवळच्या आधार सेवा केंद्राला भेट देऊन किंवा या पोर्टलवरून अद्ययावत आधार डेटा पर्याय access करून प्रथम तुमचे आधार अपडेट करण्याचा पर्याय निवडू शकता.

तुम्हाला Aadhaar PVC Card साठी ₹ 50 (फक्त पन्नास रुपये) भरावे लागतील. तुम्ही क्रेडिट/डेबिट कार्ड किंवा नेट बँकिंग द्वारे पेमेंट करू शकता.

पुढे “I hereby confirm that I have read and understood the Payments / Cancellation / Refunds Process.” या ऑप्शन वर क्लिक करून Make Payment या ऑप्शन वरती क्लिक करा.

Make Payment
Make Payment

पेमेंट केल्यावर तुम्ही (Acknowledgement Slip) पोचपावती Download Acknowledgement बटन वर क्लिक करून डाउनलोड करून ठेवा.

Acknowledgement Slip Aadhaar PVC card
Acknowledgement Slip

Aadhaar PVC Card स्टेट्स चेक करण्यासाठी पुन्हा डॅशबोर्ड वर येऊन Requests मध्ये बाण चिन्हावर क्लिक करून विनंतीची तपशीलवार स्थिती तपासू शकता.

पीव्हीसी कार्डसाठी आपली विनंती प्राप्त झाली आहे असे दाखवेल आणि त्यावर प्रक्रिया चालू आहे. कृपया अद्यतनित स्थिती पाहण्यासाठी 24 तासानंतर साइटवर पुन्हा भेट द्या किंवा रजिस्टर मोबाईलवर एसएमएस द्वारे सूचना मिळेल.

पुढील लेख देखील वाचा!

  1. आधारकार्ड PDF फाईल मध्ये डाउनलोड करण्याची प्रोसेस ! Download Aadhaar Card in PDF File
  2. आधार कार्ड वरील पत्ता अपडेट करण्याची ऑनलाईन प्रोसेस !
  3. मुलींच्या लग्नानंतर आधार कार्डवरील नाव बदलण्याची प्रोसेस !
  4. आधार कार्डचा गैरवापर टाळण्यासाठी आधार बायोमेट्रिक लॉक/अनलॉक कसे करायचे?
  5. तुमच्या आधारकार्डवर किती मोबाईल नंबर सक्रिय आहेत ते पहा !
  6. तुमचे आधार कार्ड कुठे वापरले जातेय ? असे तपासा !
  7. घरबसल्या आधारकार्डला नवीन मोबाईल नंबर अपडेट होणार!
  8. आता पोस्टमन काढणार लहान मुलांचे आधारकार्ड; जाणून घ्या सविस्तर माहिती !

वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.

आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी इथे क्लिक करा !!

शेअर करा:
WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Channel Join Now

One thought on “आधार PVC कार्ड ATM सारखं दिसणार आधार कार्ड ऑनलाईन ५० रुपयात बनवा, जाणून घ्या सविस्तर प्रोसेस !

  • Tilak.D. Ingole

    Name : Tilak.D.Ingole ,At.Post.Ridhora Rade, kondhali taluka.katol Dist.Nagpur. Maharashtra Pin.441103

    Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.