कोतवाल विषयी संपूर्ण माहिती – पात्रता, मानधन, कर्तव्ये आणि अधिकार
कोतवाल पद मोगल काळापासून अस्तित्वात आहे. जागल्या, रामोशी इत्यादी लोक कनिष्ठ ग्राम नोकर पोलीस पाटीलाचे मदतनीस म्हणून काम पाहत होते. मुंबई कनिष्ठ गाव वतने निर्मूलन कायदा, १९५८ फेब्रुवारी १९६३ पासून अनुवांशिक कनिष्ठ गावसेवक प्रणाली संपुष्टात आली. त्यानंतर गावच्या लोकसंख्येनुसार कोतवालाचे नियमित मानधन घेणारे पद निर्माण करण्यात आले. पोलीस पाटील आणि तलाठी यांना प्रशासनात मदत करणारा कनिष्ठ नोकर म्हणजे कोतवाल होय. कोतवाल हे महसूल खात्यातील सर्वात कनिष्ठ पद आहे.
कोतवाल हा चोवीस तास सरकारी सेवेला बांधील असतो. कोतवाल हा पूर्णवेळ काम करणारा चतुर्थ श्रेणीतील (कनिष्ठ) ग्रामनोकर आहे. कोतवालाची संख्या गावाच्या लोकसंख्येवर अवलंबून असते मात्र एखाद्या गावी एकाहून जास्त कोतवाल नेमण्याचा अधिकार शासनाच्या परवानगीने संबधित जिल्हाधिकाऱ्यास असतो. कोतवालांची पदे काही काळ जिल्हा परिषदेकडे वर्ग करण्यात आली होती. पुन्हा दिनांक १ डिसेंबर १९५९ पासून कोतवालाची पदे पुन्हा महसूल विभागाकडे वर्ग करण्यात आली.
कोतवाल पात्रता:
- कोतवालाची नेमणूक तहसिलदार करतात.
- कोतवाल पदासाठी शिक्षण: १२ वी पास
- शारीरिकदृष्ट्या सक्षम आणि चारित्र्यवान असावा.
- संबंधित तालुका किंवा गावाचा रहिवाशी असावा.
- कोतवाल म्हणून नेमणूक होण्यासाठी संबंधित नेमणूक होण्यासाठी संबधित व्यक्तीचे वय कमीत कमी १८ व जास्तीत जास्त ४० वर्ष इतके असावे लागते.
कोतवालाचे सध्याचे मानधन: रु. ७५०० मानधनात वाढ होऊन आता नवीन १५,००० (रुपये पंधरा हजार फक्त) इतके मानधन)
गावची लोकसंख्या व त्याप्रमाणात कोतवालांची संख्या पुढीलप्रमाणे :
- १००० पर्यंत – १
- १००१ ते ३००० – २
- ३००० हून अधिक – ३
कोतवालाची कर्तव्ये आणि अधिकार.
- शासकीय रक्कम शासकीय तिजोरीत भरण्यात सहाय्य करणे. शेत सारा, शासकीय देणे अदा करण्यासाठी गावकऱ्यांना चावडीवर बोलावुन आणणे. शासकीय पैसा, कार्यालयीन कागदपत्रे आणि शासकीय वसुली म्हणून जप्त केलेल्या मालमत्तेवर लक्ष ठेवणे.
- अटकवलेली/जप्त केलेली मालमत्ता/जनावरे चावडीवर घेऊन येणे.
- आवश्यकतेनुसार गाव दप्तर गावातून तहसिल कार्यालयात नेणे.
- चावडीचे टपाल तहसिल कार्यालयात व तहसिल कार्यालयाचे टपाल चावडीवर नेणे.
- शासकीय अधिकाऱ्यांना त्यांच्या दौऱ्यात, पीक पाहणीत, हद्दीच्या खुणा तपासण्यात सहाय्य करणे. नोटीस/समन्स बजावणे व नोटीस/समन्स बजावण्यासाठी पोलीस पाटलास मदत करणे. गावातील जन्म, मृत्यू, लग्न आणि अर्भक मृत्यूची माहिती ग्राम पंचायत सचिवाला देणे.
- आवश्यक वेळी गावकऱ्यांना चावडी किंवा सजा येथे बोलवण्याचे कार्य कोतवाल करतो.
- शासनाच्या आदेशांबाबत गावात दवंडी देणे.
- लसीकरण मोहीमेत मदत करणे. अपघाती मृत्यू, आग, साथीचे रोग या प्रसंगी पोलीसबी पाटलांना मदत करणे.
- गुन्हेगारांच्या हालचाली पोलिसांना कळवणे तसेच तपासात आणि गुन्हे प्रतिबंध समयी पोलिसांना मदत करणे.
- पोलीस पाटलाच्या अभिरक्षेत असलेल्या गुन्हेगारावर पहारा देणे.
- गावातील अधिकाऱ्यांना जमीन महसूल वसुलीस मदत करणे. गावात शासकीय कामासाठी आलेल्या अधिकाऱ्यांना सहाय्य करणे.
- गावातील चावडी स्वच्छ ठेवणे आणि तेथे दिवाबती करणे. गावातील अधिकाऱ्यांना त्यांच्या इतर शासकीय कामात मदत करणे.
- बेवारस मृतदेहांची विल्हेवाट लावण्यास तसेच शव विच्छेदनासाठी प्रेत घेऊन जाण्यात पोलिसांना सहाय्य करणे.
- पोलीस पाटील आणि पोलीसांना रात्रीच्या गस्तीसाठी मदत करणे. संशयास्पद प्रकरणांची माहिती पोलीस पाटलास देणे.
कोतवालावर नियंत्रण:
- कोतवालावर नजीकचे नियंत्रण तलाठ्याचे असते.
- कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने कोतवालावर नजीकचे नियंत्रण पोलिस पाटील ठेवतो.
हेही वाचा – तलाठ्यांची कर्तव्य कोणती आहेत? तलाठ्यांकडून माहिती मिळवण्यासाठी माहिती अधिकार अर्ज कसा करायचा?
वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.
आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी इथे क्लिक करा !!
काही गावात लोकसंख्या 1000+असूनही कोतवाल पद अस्थीत्वात यासाठी काय करावे लागेल कृपया मार्गदर्शन करावे.
धन्यवाद