फिरत्या वाहनावरील दुकानासाठी ऑनलाईन अर्ज कसा करायचा? जाणून घ्या सविस्तर प्रोसेस!
दिव्यांग व्यक्तीना स्वावलंबी होण्याच्या दृष्टीने हरित उर्जेवर चालणाऱ्या पर्यावरण स्नेही फिरत्या वाहनावरील दुकान (मोबाईल ऑन ई व्हेइकल – Mobile Shop on eVehicle) महाराष्ट्र राज्य दिव्यांग वित्त व विकास महामंडळामार्फत मोफत उपलब्ध करुन देण्याबाबतची योजना आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी दि. ६ फेब्रुवारी २०२५ पूर्वी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन केले आहे.
फिरत्या वाहनावरील दुकान योजनेचा लाभासाठी ऑनलाईन अर्ज – Mobile Shop on eVehicle:
दिव्यांग व्यक्तीना पुरेशा सोयी उपलब्ध करुन देवून रोजगार निर्मितीस चालना देणे, दिव्यांग व्यक्तीचे आर्थिक, सामाजिक पुनर्वसन करणे, त्यांना कुटुंबासोबत जीवन जगण्यास सक्षम करणे हा या योजनेचा उद्देश आहे. दिव्यांग व्यक्तीनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी नाव नोंदणी, अर्ज करण्यासाठी पोर्टल २२ जानेवारी २०२५ रोजी पासून सुरू करण्यात आले आहे.
या योजनेत लाभ घेण्यासाठी खालील लिंक उपलब्ध करुन देण्यात आली आहे. या लिंकद्वारे दिव्यांग व्यक्तींना ऑनलाईन अर्ज सादर करण्याची मुदत ६ फेब्रुवारी २०२५ रोजी सायंकाळी ६ वाजेपर्यंत उपलब्ध असेल. या योजनेचा जास्तीत जास्त दिव्यांग व्यक्तींनी लाभ घेण्याचे आवाहन दिव्यांग व वित्त विकास महामंडळाने केले आहे.
योजनेच्या अटी व शर्ती:
1) अर्जदार हा महाराष्ट्र राज्याचा रहिवाशी असावा.
2) अर्जदाराकडे दिव्यांगत्वाचे प्रमाण किमान ४०% टक्के असावे तसेच जिल्हा शल्य चिकित्सक / सक्षम प्राधिकारी यांनी प्रमाणित केलेले प्रमाणपत्रधारक असावे.
3) अर्जदारा कडे दिव्यांगत्वाचे UDID प्रमाणपत्र असणे बंधनकारक आहे.
4) अर्जदार दि.०१.०१.२०२५ या अहर्ता दिनांकाच्या दिवशी १८ ते ५५ या वयोगटातील असावा.
5) मतिमंद अर्जदाराच्या बाबतीत त्यांचे कायदेशीर पालक अर्ज करण्यास सक्षम असतील.
6) दिव्यांग अर्जदाराचे वार्षिक उत्पन्न रु. २.५० लाख पेक्षा अधिक नसावे.
7) लाभार्थी निवड करताना जास्त दिव्यांग्त्व असलेल्यास प्रथम प्राधान्य दिले जाईल. त्यामुळे निवडीचा क्रम हा अतितीव्र दिव्यांगत्व ते कमी दिव्यांगत्व या क्रमाने राहील.
8) अतितीव्र दिव्यांगत्व असणाऱ्या दिव्यांग व्यक्तीस वाहन चालविण्याचा परवाना नाकारला असल्यास अशा परिस्थितीत देखील परवाना धारक नसलेल्या अतितीव्र दिव्यांग व्यक्तीच्या बाबतीत सोबत्याच्या (Escort) सहाय्याने फिरता मोबाईल (Mobile Shop on eVehicle) व्यवसाय करण्यास प्राधान्य दिले जाईल.
9) अर्जाच्या वेळी अर्जदाराने सर्व अटी मान्य असल्याचे तसेच संबंधीत वाहनाची योग्यती काळजी घेण्याचे बंधपत्रसादर करणे आवश्यक राहील.
10) जिल्हानिहाय लाभार्थ्यांची घोषणा दिव्यांगांच्या संख्येच्या प्रमाणात केली जाईल.
11) अर्जदार हा शासकीय/निमशासकीय/मंडळे/महामंडळे यांचा कर्मचारी नसावा.
12) फिरत्या वाहनावरील दुकानासाठी (Mobile Shop on eVehicle) योजनेसाठी अर्ज करणारा अर्जदार जर दिव्यांग वित्त व विकास महामंडळाचा कर्जदार असेल तर तो थकबाकीदार नसावा.
13) राज्यातील इतर कोणत्याही योजने अंतर्गत मोफत ई-व्हेईकल प्राप्त झालेल्या दिव्यांग अर्जदारास सदर योजने अंतर्गत लाभ घेण्यास अपात्र ठरविण्यात येईल.
आवश्यक कागदपत्रे:
1) अर्जदाराचा फोटो
2) अर्जदाराची सही
3) जातीचा दाखला
4) अधिवास प्रमाणपत्र
5) निवासी पुरावा
6) दिव्यांगत्वाचे प्रमाणपत्र
7) UDID प्रमाणपत्र
8) ओळखपत्र
9) बैंक पासबुकचे पहिले पान
फिरत्या वाहनावरील दुकानासाठी ऑनलाईन अर्ज करण्याची प्रोसेस – Mobile Shop on eVehicle:
फिरत्या वाहनावरील दुकानासाठी (Mobile Shop on eVehicle) खालील पोर्टलला भेट द्या.
https://register.mshfdc.co.in/home
पोर्टल उघडल्यानंतर, फॉर्म भरण्याच्या सूचना प्रदर्शित केल्या जातील. नोंदणी करण्यापूर्वी आणि फॉर्म भरण्यापूर्वी प्रत्येक प्रथमच वापरकत्यनि या सूचना वाचणे आवश्यक आहे. वापरकत्यनि नोंदणी बटणावर क्लिक केल्यानंतर वापरकर्त्यास नोंदणी पृष्ठावर निर्देशित केले जाईल.

पोर्टल उघडल्यानंतर सर्वप्रथम यामध्ये नोंदणी फॉर्म हे पेज ओपन होईल, वैयक्तिक माहिती यामध्ये मोबाईल क्रमांक, आधार क्रमांक, यूडीआयडी क्रमांक, ईमेल आयडी टाकून पुढे जा या पर्यायावर क्लीक करा.

वैयक्तिक माहिती यामध्ये लाभार्थ्यांचे पहिले नाव, वडिलांचे/पतीचे नाव, लाभार्थ्यांचे आडनाव, आईचे पहिले नाव, आईचे पतीचे नाव, आईचे आडनाव, जन्मतारीख, लाभार्थ्यांचे वय, लिंग, रक्तगट, जात/ प्रवर्ग, व त्यानंतर जात प्रमाणपत्र अपलोड करायचे आहे. त्यानंतर वाहन प्रकार, वैवाहिक स्थिती ही सर्व माहिती भरून पुढे जा या पर्यायावर क्लिक करा.
पुढे निवासाचा तपशील टाकायचा आहे, यामध्ये सध्याचा पत्ता, पिनकोड, राज्य, विभाग, जिल्हा, तालुका, गाव व पत्ता पुरावा अपलोड करून पुढे जा या पर्यायावर क्लिक करा.
पुढे दिव्यांगाची माहिती टाकायची आहे, यामध्ये दिव्यांगत्व प्रमाणपत्र अपलोड करायचे आहे, तसेच दिव्यांगत्त्वाचे प्रमाण, दिव्यांगत्त्वाचा प्रकार, दिव्यांगत्त्वाचे क्षेत्र टाकून पुढे जा या पर्यायावर क्लिक करा.
पुढे रोजगाराची सद्यस्थिती याबद्दलची माहिती यामध्ये रोजगाराची स्थिती, सरकारी कर्मचारी आहात का ?, दारिद्रयरेषेबद्दल माहिती व लाभार्थ्यांचे वार्षिक उत्पन्न भरून पुढे जा या पर्यायावर क्लिक करा.
पुढे ओळख आणि बँक तपशील यामध्ये ओळख प्रमाणपत्र, ओळख प्रमाणपत्र अपलोड करायचे आहे, यानंतर लाभार्थ्यांचा बँक तपशील यामध्ये खातेदाराचे नाव, खाते क्रमांक, बँकेचे नाव, शाखेचे नाव तसेच बँक पासबुक चे पहिले पान अपलोड करायचे आहे, तसेच फोटो अपलोड करायचे आहे, व सही अपलोड करून पुढे जा या पर्यायावर क्लिक करा.
फिरत्या वाहनावरील दुकानासाठी (Mobile Shop on eVehicle) योजनेच्या सर्व आवश्यक कागदपत्र व माहिती परिपूर्ण असेल तरच आपला फॉर्म सबमिट होईल याची खात्री करावी. फॉर्म सबमिट झाल्यानंतर आपणास आपण नोंदणी केलेल्या मोबाईल क्रमांकावर तसेच आपण दिलेल्या ई-मेल पत्यावर आपला रजिस्ट्रेशन नंबर पाठविण्यात येईल. भविष्यात आपल्या अर्जाची परिस्थिती तपासायची असल्यास कृपया त्या रजिस्ट्रेशन नंबरचा वापर करावा.
फिरत्या वाहनावरील दुकानासाठी ऑनलाईन अर्ज (Mobile Shop on eVehicle) सबमिट झाल्यानंतर आपणास आपण नोंदणी केलेल्या मोबाईल क्रमांकावर आपला रजिस्ट्रेशन नंबर पाठविण्यात येईल.
फिरत्या वाहनावरील दुकानासाठीच्या (Mobile Shop on eVehicle) अर्जाचा मागोवा घेण्यासाठी: https://register.mshfdc.co.in/trackApplication (आपला नोंदणी क्रमांक आणि नोंदणी केलेला मोबाईल क्रमांक प्रविष्ट करावा. त्यावर OTP पाठवण्यात येईल. OTP प्रविष्ट करून आपल्याला आपल्या अर्जाचा मागोवा घेता येईल)
अन्य कसलीही समस्या असल्यास, माहिती हवी असल्यास किंवा तांत्रिक अडचणी असल्यास आपण 7820904081 /9090118218 वर कॉल, एसएमएस किंवा व्हाट्सअप करू शकता किंवा evehicle.mshfdc@gmail.comवर आपली समस्या ईमेल देखिल करू शकता.
फोन हेल्प डेस्क दिनांक २२/०१/२०२५ सकाळी १०.०० ते सायं. ६.०० पर्यंत प्रत्येक दिवशी ०६.०२.२०२५ सायं. ६.०० पर्यंत उपलब्ध असेल.
या लेखात, आम्ही फिरत्या वाहनावरील दुकानासाठी (Mobile Shop on eVehicle) ऑनलाईन अर्ज कसा करायचा? विषयीची संपूर्ण माहिती दिली आहे. मला आशा आहे की तुम्हाला हा लेख आवडला असेल. तुम्हाला हा लेख आवडला तर नक्की शेअर करा. तुम्हाला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया टिप्पणी द्या.
खालील लेख देखील वाचा !
- नवीन उद्योग सुरु करायचा आहे? तर सरकारच्या “मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम योजनेचा लाभ घेण्यासाठी हे वाचाच!
- प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना – कृषि प्रक्रिया उद्योगांकरीता प्रोत्साहन योजना (PMFME).
- उद्योगिनी योजनेतून महिलांना व्यवसायासाठी बिनव्याजी कर्ज व 30% अनुदान !
- हे 40 व्यवसाय सुरु करण्यासाठी महाराष्ट्र सरकार देणार १ लाख रुपयांपर्यंत बिनव्याजी कर्ज ! Maharashtra government business loan scheme
- कृषी क्लिनिक आणि कृषी व्यवसाय केंद्र योजना
- डेल्हीवरी कुरिअर कंपनी सोबत तुमचा व्यवसाय सुरु करा आणि महिना कमवा हजारो रुपये !
- ॲमेझॉन IHS सोबत व्यवसाय करा आणि कमवा हजारो रुपये (Amazon IHS Registration)
- शून्य क्रेडिट आणि १००% रिकव्हरी राखण्यासाठी व्यवसाय धोरण !
- बटण मशरूम व्यवसाय संकल्पना!
- शेतमाल तारण कर्ज योजना – Shetmal Taran Karj Yojana (MSAMB)
- पीएम स्वनिधी योजना : फेरीवाल्यांना ५०,००० पर्यंत कर्जासाठी ऑनलाईन अर्ज सुरु !
- आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील तरुणांनी उद्योग कर्जासाठी असा करा ऑनलाईन अर्ज !
- नवीन उद्योजकांसाठी मोफत एमएसएमईच्या उद्यम नोंदणी ऑनलाईन कशी करायची? जाणून घ्या सविस्तर.
- FSSAI फूड लायसन्स (फूड परवाना) ऑनलाईन कसे काढायचे? जाणून घ्या सविस्तर माहिती!
- घरबसल्या शॉप एक्ट लायसन्स ऑनलाईन कसे काढायचे? जाणून घ्या सविस्तर प्रोसेस (Shop Act Licenses)
- कृषी सेवा केंद्र परवाना (बियाणे, खते, कीटकनाशके विक्री परवाना) ऑनलाईन कसा काढायचा? जाणून घ्या सविस्तर माहिती!
वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.
आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी येथे क्लिक करा !!