आरटीई २५ टक्के ऑनलाईन प्रवेश सुरु – 2025-26
सन २०२५-२६ या वर्षासाठी बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ मधील कलम १२ (सी) (१) नुसार दुर्बल व वंचित घटकांतील बालकांना स्वंय अर्थसहाय्यित शाळा, विना अनुदानित शाळा, पोलीस कल्याणकारी शाळा (विनाअनुदानीत) आणि महानगरपालिका शाळा (स्वंयअर्थसहाय्यित शाळा) शाळामध्ये आरटीई २५ टक्के प्रवेश (RTE Admission) प्रक्रिया ऑनलाईन पदधतीने राबविण्यात येत आहे.
प्रवेश प्रकीयेअंतर्गत पात्र शाळांची नोंदणी पूर्ण झालेली आहे, बालकांच्या पालकांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्याची प्रक्रीया दि. १४-०१-२०२५ ते दि. २७-०१-२०२५ या कालावधीपर्यंत सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
आरटीई २५ टक्के ऑनलाईन प्रवेश – RTE Admission 2025-26:
बालकांचा मोफत व सक्तीच्च्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ मधील कलम १२ (सी) (१) मुसार दुर्बल, बंचित, आर्थिक व सामाजिकदृष्ट्या मागास घटकांतील बालकांना स्वंय अर्थसहाय्यित शाळा, विनाअनुदानित शाळा, पोलीस कल्याणकारी शाळा (विनाअनुदानीत) आणि महानगरपालिका शाळा (स्वंयअर्थसहाय्यित शाळा) शाळामध्ये इयत्ता १ली किंवा पूर्व प्राथमिक वर्ग या स्तरावर २५ टक्के प्रवेश (RTE Admission) प्रक्रियेकरिता पालकांनी संकेत स्थळावर जाऊन अर्ज भरण्याची प्रक्रिया विहित मुदतीत पूर्ण करावी.
वंचित घटक व प्रवर्ग:
वंचित घटकातील बालकांमध्ये खालील प्रवर्गाचा समावेश होतो.
आर्थिक वर्षामध्ये पालकांचे वार्षिक उत्पन्न एक लाखापेक्षा कमी आहे अशा पालकांच्या बालकांचा आर्थिक दुर्बल गटामध्ये समावेश होतो. २५ टक्के प्रवेश (RTE Admission) प्रक्रीयेकरीता विचारपूर्वक १० शाळांची निवड करण्यात यावी.
पालकानी अर्ज भरताना शाळेपासून ते घरापर्यंतचे हवाई अंतर हे गुगल मॅपने निश्चित करावयाचे असल्याने शाळा निवडताना अंतराची बाब लक्षात घेऊन पालकांनी बलूनव्दारे निवास्थनाचे ठिकाण निश्चित करण्याकरिता तो बलून जास्तीत जास्त पाच वेळाच निश्चित करता येईल याची नोंद घ्यावी त्यामुळे पालकांनी निवासस्थानाचे लोकेशन अचूक नमूद करावे,
प्रवेशप्रक्रीयेबाबत विहित मुदतीमध्ये परिपूर्ण अर्ज भरला जाईल याची दक्षता घ्यावी. अर्ज सादर करावयाच्या अंतिम कालावधीमध्ये इंटरनेट अथवा इतर तांत्रिक अडचणीमूळे परिपूर्ण अर्ज सादर करण्यामध्ये व्यत्यय येण्याची शक्यता नाकारता येणार नाही सबब, शक्य तितक्या लवकर अर्ज सादर केला जाईल याची दक्षता घेण्यात यावी.
प्रवेशप्रक्रीयेबाबत आपणास काही समस्या असल्यास आरटीई पोर्टलवर मदत केंद्राची माहिती देण्यात आलेली आहे. त्यांच्याशी संपर्क करुन समस्येचे निराकरण करण्यात यावे.
पालकांनी ऑनलाईन अर्ज करताना अचूक माहिती भरावी. (उदा. घरचा पता, जन्मदिनांक, उत्पन्नाचा दाखला, अपंगाचा दाखला, जातप्रमाणपत्र इ.) ज्या बालकांनी यापूर्वी आरटीई २५ टक्के अंतर्गत शाळेत प्रवेश घेतला असल्यास सदर बालकाला पुन्हा अर्ज करता येणार नाही.
यापूर्वी २५ टक्के प्रवेश (RTE Admission) प्रक्रीयेअंतर्गत प्रवेश मिळालेल्या बालकाचा चुकीची माहिती भरून पुन्हा प्रवेश घेतल्याचे निदर्शनास आल्यास सदरील प्रवेश रद्द करण्यात येईल. तसेच पालकांनी एकच परिपूर्ण अर्ज सादर करावा, एकापेक्षा अधिकचे अर्ज भरल्याचे निदर्शनास आल्यास एकही अर्ज लॉटरीसाठी विचारात घेतला जाणार नाही.
पालकांनी कोणत्याही प्रकारची कागदपत्रे ऑनलाईन अपलोड करु नयेत.
आवश्यक कागदपत्रे:
बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ अंतर्गत २५ टक्के प्रवेश (RTE Admission) प्रक्रियेकरिता आवश्यक कागदपत्रांचा तपशील खालीलप्रमाणे आहे.
- निवासी पुरावा २५ टक्के प्रवेश (RTE Admission) प्रक्रीयेकरिता आपण ज्या कार्यक्षेत्रातील शाळा निवडत आहात त्या कार्यक्षेत्रात स्वतःच्या मालकीची निवासी व्यवस्था असल्यास त्या निवासी पुराव्या करिता रेशनिंग कार्ड,
- ड्रायव्हींग लायसन्स, वीज देयक, टेलिफोन देयक, प्रॉपर्टी टैक्स देयक, घरपट्टी, मतदान ओळखपत्र, पासपोर्ट, व राष्ट्रियकृत बँकेचे पासबुक यापैकी कोणताही एक पुरावा ग्राहय धरण्यात येईल.
- २५ टक्के (RTE Admission) प्रवेशप्रक्रीयेकरीता आपण ज्या कार्यक्षेत्रातील शाळा निवडत आहात उक्त कार्यक्षेत्रामध्ये स्वतःच्या मालकीची निवासी व्यवस्था नसल्यास भाडेकरार ग्राहय धरण्यात येईल. सदरचा भाडेकरार हा दुय्यम निबंधक कार्यालयाचा नोंदणी असणे अनिवार्य आहे. भाडेकरार हा फॉर्म भरण्याच्या दिनांकाच्या पूर्वीचा असाचा व त्याचा कालावधी ११ महिन्याचा किंवा त्यापेक्षा जास्त कालावधीचा असावा. जे पालक रहिवासी पुरावा म्हणून भाडेकराराची प्रत जोडतील त्यांच्या निवासाची पडताळणी करण्यात येईल ज्या ठिकाणचा भाडेकरारनामा दिला असेल त्या ठिकाणी बालक/पालक राहत नाही असे आढळून आल्यास त्या पालकांविरुध्द कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल. व प्रवेश मिळाला असल्यास तो रद्द करण्यात येईल.
- जन्म तारखेचा पुरावा ग्रामपंचायात / मनपा/ नपा यांचा दाखला/ रुग्णलयातील एएनएम रजिस्टर मधील दाखला / अंगणवाडी/बालवाडीतील रजिस्टरमधील दाखला/आईवडील अथवा पालकांनी प्रतिज्ञापत्राव्दारे केलेले स्वंयनिवेदन ग्राहय धरण्यात येईल.
- सामाजिक वंचित जात संवर्गातील बालक असल्यास वडिलांचे / बालकांचे सादर करावयाचे कागदपत्र- तहसिलदार / उपजिल्हाधिकारी / उपविभागीय महसूल आधिकारी यांनी निर्गमित केलेला पालकांचा (वडिलांचा / बालकांचा जातीचा दाखला. परराज्यातील जातीबा दाखला प्रवेशप्रक्रीयकरिता ग्राहय धरण्यात येणार नाही.
- आर्थिक दृष्ट्या दुर्बल संवर्गातील प्रवेशाकरिता वार्षिक उत्पन्नाचा दाखला आरटीई २५ टक्के अंतर्गत (RTE Admission) प्रवेशाकरिता विदयार्थ्यांच्या पालकाचा आर्थिक वर्ष २०२३-२४ किंवा २०२४-२५ या वर्षाचा एक लाखापेक्षा कमी वार्षिक उत्पन्न असलेला तहसिलदारांचा दाखला. उत्पन्नाच्या दाखल्याकरिता पगाराचा दाखला (सॅलरी स्लीय), कंपनीचा किंवा मालकाचा दाखला ग्राहय धरण्यात येईल.
- दिव्यांग मुलांसाठी वैदयकीय प्रमाणपत्राचा पुरावा जिल्हाशल्य चिकीत्सक / वैदयकीय अधिक्षक, अधिसूचित जिल्हा शासकीय रुग्णालय यांचे ४० टक्क्यापेक्षा जास्त दिव्यांग असल्याचे प्रमाणपत्र.
- पालकांनी ऑनलाईन प्रवेश (RTE Admission) अर्ज भरताना एकल पालक (सिंगल पॅरेंट) (विधवा, घटस्फोटीत आई अथवा वडिल यापैकी कोणताही एक) पर्याय निवडला असेल तर संबंधित बालकोचे पालकत्व स्विकारलेल्या व्यक्तीचे प्रवेशासाठी लागणारे आवश्यक कागदपत्र ग्राहय धरण्यात येईल.
- आरटीई २५ टक्के प्रवेश प्रक्रीयवेळी विदयार्थी व पालक यांचे आधारकार्ड व आधार क्रमांक मिळण्याकरिता केलेल्या अर्जाची पावती घेणे अनिवार्य करण्यात येत आहे. परंतु काही कारणांमुळे बालक व पालक आधार कार्ड सादर करणे शक्य झाले नाही तर अशा प्रकरणामध्ये बालकांचे आधारकार्ड सादर करण्याच्या अर्टीच्या अधिन राहून बालकांना तात्पुरता प्रवेश देण्यात यावा तात्पुरत्ता प्रवेश दिल्याच्या दिनांकापासून ९० दिवसाच्या आत बालकांचे आधारकार्ड शाळेकडे सादर करणे बंधनकारक राहील. बालकाच्या आधारकार्डची विहीत कालावधीत पुर्तता न झाल्यास आटीई २५ टक्के आंतर्गत दिलेला तात्पुरता प्रवेश रद्द करण्यात येईल.
- अनाथ बालके (वंचित घटक) आवश्यक कागदपत्रे अ अनाथ बालकांच्या बाचतीत अनाथालयाची / बालसुधारगृहाची कागदपत्र ग्राहय धरण्यात येतील. ब) जर बालक अनाथालयात राहत नसेत तर जे पालक त्यांचा सांभाळ करतात त्यांचे हमीपत्र आवश्यक राहील. क) अनाथ बालकांच्या संदर्भात इतर कागदपत्र उदा. वार्षिक उत्पन्नाचा दाखला विचारात घेतला जाणार नाही.
- एच.आय.व्ही. बाधित / प्रभावित असल्यास आवश्यक कागदपत्रे जिल्हा शल्यचिकित्स/वैदयकिय अधीक्षक, अधिसूचित जिल्हा शासकीय रूग्णालय यांचे प्रमाणपत्र अनिवार्य राहील.
- घटस्फोटित महिला पालक असल्यास आवश्यक कागदपत्रे १) न्यायालयाचा निर्णय २) घटस्फोटित
- महिलेचा/बालकाच्या आईचा रहिवासी पुरावा ३) बालक वंचित गटात असल्यास बालकांचे किंवा त्यांचे वडीलांचे जातीचे प्रमाणपत्र व बालक आर्थिक दुर्बल घटकातील असल्यास तर बालकाच्या आईच्या उत्पन्नाचा दाखला इ. कागदपत्रे दाखल करणे अनिवार्य राहील.
- न्यायप्रविष्ठ असलेल्या घटस्फोट प्रकरणातील महिला १) प्रकरण न्यायप्रविष्ठ असल्याचा पुरावा २) घटस्फोट प्रकरण न्यायप्रविष्ठ असलेल्या महिलेचा अथवा बालकांच्या आईच्या रहिवासी पुरावा ३) बालक वंचित गटातील असल्यास बालकांचे किंवा त्यांचे वडीलांचे जातीचे प्रमाणपत्र व बालक आर्थिक दुर्बल घटक असल्यास बालकाच्या आईच्या उत्पन्नाचा दाखला इ. कागदपत्रे दाखल करणे अनिवार्य राहील.
- विधवा महिला- १. पतीचे मृत्यु प्रमाणपत्र २) विधवा महिलेचा/बालकाच्या आईचा रहिवासी पुरावा. ३) बालक बंचित गटातील असल्यास बालकांचे व त्याच्या वडिलांचे जातीचे प्रमाणपत्र व बालक आर्थिक दुर्बल घटकातील असल्यास तर बालकाच्या आईच्या उत्पन्नाचा दाखला इ. कागदपत्रे दाखल करणे अनिवार्य राहील.
इतर सूचना:
ऑनलाईन अर्ज सादर करण्याची प्रक्रीया पुर्ण झाल्यानंतर व्यापक प्रसिध्दी देऊन ऑनलाईन सोडत (लॉटरी) काढण्याकरिता दिनांक निश्चित केली जाईल. उक्त तारखेस ऑनलाईन पध्दतीने सोडत (लॉटरी) काढण्यात येईल. सन २०२५-२६ या शैक्षणिक वर्षाकरिता आरटीई अंतर्गत २५ टक्के राखीव जागांवरील प्रवेश (RTE Admission) प्रक्रीयेसाठी एकाच टप्यात लॉटरी काढली जाईल. तसेच शाळेत आरटीई अंतर्गत उपलब्ध जागांएवढी एक प्रतिक्षा यादी (बेटींग लिस्ट) तयार केली जाईल, लॉटरी लागलेल्या विदयार्थ्यांना प्रवेश घेण्यासाठी पुरेसा कालावधी देण्यात येईल.
या कालावधीमध्ये विदयार्थ्यांनी प्रवेश घेऊन शाळेत जागा रिक्त राहिल्या असतील तर पहिल्या प्रतिक्षा यादी (वेटींग लिस्ट) मधील अनुक्रमे विदयार्थ्यांना प्रवेश घेण्याबाबतचा मेसेज पाठविला जाईल. मगच प्रतिक्षा यादीतील विद्यार्थ्यांनी अलॉटमेंट लेटर काढून विहित मुदतीत प्रवेश घ्यावा, या कालावधीत विदयार्थ्यांनी प्रवेश (RTE Admission) घेऊन शळेत जागा रिक्त राहिल्या असतील तर दुसऱ्या प्रतिक्षा यादी (वेटींग लिस्ट) मधील अनुक्रमे विदयार्थ्यांना प्रवेश घेण्याबाबतचा मेसेज एनआयसीव्दारे पाठविला जाईल. मगच दुसऱ्या प्रतिक्षा यादीतील विदयार्थ्यांनी अलॉटमेंट लेटर काढून विहीत मुदतीत प्रवेश घ्यावा. अशा पदधतीने आरटीई (RTE Admission) प्रवेशपात्र शाळांची प्रवेश क्षमता पूर्ण होईपर्यंत तिसऱ्या आणि चौथ्या प्रतिक्षा यादीतील विदयाच्यर्थ्यांना एन. आय. सी. कडून मेसेज पाठविले जातील.
सोडत (लॉटरी) झाल्यांनतर पडताळणी समितीला आरटीई पोर्टलवर त्यांच्या लॉगीनला विदयार्थ्यांची नावे व मोबाईल क्रमांक दिले जातील, विदयार्थ्यांच्या नावापुढे ज्या दिनांकास विदयार्थ्यांना (RTE Admission) प्रवेशासाठी बोलविले आहे त्या पालकांकडून मूळ कागदपत्रे व एक छायांकित प्रत पडताळणी समितीने प्राप्त करुन घ्यावी.
कागदपत्राची प्राथमिक तपासणी करुन योग्य असलयास विद्यार्थ्यांच्या नावापुढे ऑनालाईन नोंद करावी तसेच पालकाकडील अलॉटमेंट लेटरबर तात्पुरता प्रवेश दिला असे नोंद कराये व ती नोंद करून पालकांना परत कराये तसेच पालकांकडून हमीपत्र भरुन घ्यावे.
काही पालक मुळ गावी किंवा अन्य जागी स्थलांतर होण्याची शक्यता असते. त्यामुळे दिलेल्या तारखेस पालक कागदपत्र पडताळणीस उपस्थित राहू शकले नाही तर त्यांना पुन्हा दोन संधी देण्यात याव्यात बालकांना प्रवेश (RTE Admission) घेण्याकरिता पालकांनी पडताळणी समितीशी संपर्क साधाचा.
पडताळणी समिती:
कागदपत्रे तपासणी करण्याकरिता राज्यातील सर्व गटशिक्षणाधिकारी/प्रशासन अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली पडताळणी समिती गठीत करण्यात यावी. पडताळणी समितीची रचना खालीलप्रमाणे-
पडताळणी समितीने प्रवेशपात्र बालकांच्या प्रवेशाकरीता आवश्यक त्या सर्व कागदपत्रांची पडताळणी करण्यात यावी. गटशिक्षणाधिकारी यांनी प्रत्येक बालकाला प्रवेशाकरीता तीन संधी देऊनही पालकांनी संपर्क केला नाही अथवा प्रवेशासाठी आले नाही तर विहित मुदतीत आरटीई पोर्टल वर Not Approch करावे. पडताळणी समिती केंद्रावर गर्दी होणार नाही व बालक प्रवेशापासून वंचित राहणार नाही याची दक्षता घ्याची.
पडताळणी समितीने सविस्तर माहिती सर्वांना दिसण्यासाठी पोर्टलवर भरावी व दिसते का याची खात्री करावी,
पडताळणी समितीने मागील वर्षी प्रवेशित विद्यार्थ्यांची आकडेवारी विचारात घेवून पडत्ताळणी विषयक कामकाज वेळेत होईल या दृष्टीने नियोजन कराये. पडताळणी समितीने रहिवासी पत्ता, गुगल वरील पत्ता व वय याची पडताळणी सर्व पात्र विद्यार्थ्यांची करावी. सामाजिक वंचित संवर्गातील विद्यार्थ्यांकरीता जात प्रमाणपत्राची तर आर्थिक दुर्बल संवर्गातील विद्यार्थ्यांकरीता उत्पन्न प्रमाणपत्राची पडताळणी करावी. या दृष्टीने आवश्यक सुविधा गटशिक्षणाधिकारी स्तरावर करण्यात यावेत.
समितीने संबंधित विद्यार्थ्यांची कागदपत्रे तपासणी करून प्रमाणित केल्यांनतर सदर विद्यार्थ्यांना प्रवेश देण्याची सुविधा आर.टी.ई. पोर्टलवर करण्यात येत आहे. पडताळणी समितीने तपासणी केलेले पात्र विद्यार्थी गटशिक्षणाधिकारी यांचे स्वाक्षरीचे पत्र घेवून शाळेत जातील. शाळा स्तरावर कोणत्याही कागदपत्रांची तपासणी करण्यात येणार नाही. जे विद्यार्थी कागदपत्रे तपासणीमध्ये अंपात्र होतील त्यांची निवड रद्द करण्यात यावी व अशा रद्द झालेल्या विद्याथ्यांना शिक्षणाधिकारी (प्राथमिक) जिल्हा परिषद यांचेकडे तक्रारीची दाद मागता येईल. शिक्षणाधिकारी (प्राथमिक) जिल्हा परिषद यांचा निर्णय मान्य नसल्यास विभागीय शिक्षण उपसंचालक यांचेकडे दाद मागता येईल व त्यांचा निर्णय अंतिम राहील, शासन निर्णय दिनांक २१.०४.२०१४ नुसार शिक्षणाधिकारी (प्राथमिक) यांनी जिल्हा, तालुका व न.पा./म.न.पा. स्तरावर तक्रार निवारण केंद्र व मदत केंद्राची स्थापना करावी.
प्रतिक्षा यादीमध्ये नाव आहे याचा अर्थ प्रवेश निश्चित होईलच असा नाही. पालकांनी केवळ SMS वर अवलंबून न राहता RTE Portal वर वेळोवेळी दिलेल्या सूचनांचे अवलोकन करावे व सदरील माहितीचा लाभ घ्यावा.
विहित मुदत्तीनंतर प्रवेशासाठी शाळेत जागा रिक्त असल्या तरीही कोणत्याही परिस्थितीत बालकाला प्रवेश दिला जाणार नाही, याची सर्व पालकांनी नोंद घ्यावी. विहित मुदतीनंतर प्रवेशासाठी कोणत्याही पालकांच्या अर्जाची किंवा निवेदनाची दखल घेतली जाणार नाही याची सर्व पालकांनी नोंद घ्यावी.
विद्याथ्यांनी खोटी / चुकीची माहिती भरून प्रवेश (RTE Admission) निश्चित केला व सदर बाब प्रशासनाच्या निदर्शनास आल्यास खोटी / चुकीची माहिती भरुन दिशाभूल केल्या प्रकरणी आरटीई २५ टक्के (RTE Admission) प्रवेश कोणत्याही टप्यावर रद्द करण्यात येईल याची सर्व संबंधितांनी नोंद घ्यावी.
ऑनलाईन अर्ज (RTE Admission Apply Online) : ऑनलाईन अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा.
खालील लेख देखील वाचा !
- सरकारी योजना किंवा सरकारी कामे असो; मोबाइलमध्ये नक्की ठेवा हे ३ ॲप्स! Best 3 Mobile Apps for Government Schemes and Works
- पीएम श्री शाळा योजना – PM SHRI Schools (PM ScHools for Rising India)
- पुर्व प्राथमिक ते इयत्ता 4 थी पर्यंतच्या विद्यार्थ्यांच्या शाळेच्या वेळेमध्ये बदल !
- राजीव गांधी विद्यार्थी अपघात सानुग्रह अनुदान योजनेत सुधारणा
- शैक्षणिक कर्ज व्याज परतावा योजना
- महाडीबिटी शिष्यवृत्ती / फ्रीशीप योजनांकरिता ऑनलाईन अर्ज सुरु !
- माझा लाडका भाऊ योजना – मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना, ऑनलाईन अर्ज सुरु !
- परदेशात शिक्षणासाठी राजश्री शाहू महाराज शिष्यवृत्ती योजनेसाठी अर्ज करण्याचे आवाहन!
- आता राज्यातील मुलींना मोफत उच्च शिक्षण मिळणार !
वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.
आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी येथे क्लिक करा !!