लकी डिजिटल ग्राहक योजना; योजनेच्या अटी, शर्ती, पात्रता व सविस्तर माहिती पहा !
महावितरणने ऑनलाइन वीज बिल भरणाऱ्या ग्राहकांचा टक्का वाढविण्याच्या हेतूने ‘लकी डिजिटल ग्राहक योजना’ (Lucky Digital Grahak Yojana) सुरू केली आहे. या योजनेसाठी सलग तीन वेळा ऑनलाइन पद्धतीने वीज बिल भरणा करणारे सर्व लघुदाब वीज ग्राहक पात्र ठरणार आहेत. तर पुढील वर्षी १ जानेवारी ते ३१ मे या कालावधीत सलग तीन वा तीन पेक्षा अधिक वीज बिले भरून योजनेच्या लाभाची संधी ग्राहकांना उपलब्ध करण्यात आली आहे.
लकी डिजिटल ग्राहक योजना – Lucky Digital Grahak Yojana:
आपण या लेखात महावितरणच्या LT Live ग्रहांकांसाठी लकी ड्रॉ (लकी डिजिटल ग्राहक योजना – Lucky Digital Grahak Yojana) योजनेची सविस्तर माहिती पाहणार आहोत. लकी डिजिटल ग्राहक (Lucky Digital Grahak Yojana) योजनेच्या अटी, शर्ती, पात्रता खालील प्रमाणे आहे.
योजनेचे तपशील :
१. तीन मासिक लकी ड्रॉ (Lucky Digital Grahak Yojana) योजना-उपविभाग स्तरावर
२. योजनेच्या कालावधीत सलग मागील तीन किंवा तीन पेक्षा जास्त महिन्यांपासून ऑनलाइन पद्धतीने पैसे भरणाऱ्या आणि रु.१०/- पेक्षा कमी थकबाकी असलेल्या ग्राहकांसाठी
३. योजनेचा कालावधी: पाच महिने (०१.०१.२०२५ ते ३१.०५.२०२५ पर्यंत)
४. एप्रिल-२०२५, मे-२०२५ आणि जून-२०२५ मध्ये अनुक्रमे पहिला, दुसरा आणि तिसरा लकी ड्रॉ काढण्यात येईल.
५. लकी डिजिटल ग्राहक (Lucky Digital Grahak Yojana) योजने अंतर्गत लकी ड्रॉ ऑनलाइन पद्धतीने काढला जाईल.
बक्षिसे: (प्रत्येक बक्षिसासाठी दोन ग्राहक)
लकी डिजिटल ग्राहक (Lucky Digital Grahak Yojana) योजनेअंतर्गत लकी ड्रॉ ऑनलाइन पद्धतीने काढल्यानंतर प्रथम विजेत्याला स्मार्ट फोन – १, दुसरे स्मार्ट फोन – २, तिसरे स्मार्ट घड्याळ – २ याप्रमाणे बक्षिस दिले जाईल.
पात्रता अटी:
लकी डिजिटल ग्राहक (Lucky Digital Grahak Yojana) योजना महावितरणच्या अशा लघुदाब चालू (LT Live) वीजग्राहकांसाठी लागू असेल, ज्यांनी ०१ एप्रिल २०२४ पूर्वी मागील एक वर्ष म्हणजे ०१.०४.२०२३ ते ३१.०३.२०२४ या कालावधीत एकदाही वीज देयकाचा भरणा केलेला नाही किंवा ऑनलाईन वीज देयक भरणा पर्याय वापरलेला नाही.
लकी डिजिटल ग्राहक (Lucky Digital Grahak Yojana) योजना सार्वजनिक पाणीपुरवठा आणि पथ दिवे श्रेणीतील ग्राहकांना, तसेच फ्रँचायझी क्षेत्रातील ग्राहकांना लागू राहणार नाही.
ग्राहकास योजनेच्या कालावधीत ऑनलाइन भरणा पर्याय (नेट बॅकिंग, डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, यूपीआय, वॉलेट, कॅश कार्ड, NACH, क्यूआर कोड, NEFT, RTGS इ.) वापरून सलग तीन किंवा तीन पेक्षा जास्त महिने भरणा करणे आवश्यक राहील.
लकी ड्रॉ महिन्याच्या अगोदर सलग तीन किंवा तीन पेक्षा जास्त महिन्यात, दरमहा एक असे, ऑनलाईन भरणा पर्याय वापरून देयक अदा करणे आवश्यक राहील.
दरमहा वीज देयक भरणा किमान रक्कम रु. १००/- असणे आवश्यक आहे.
ज्या महिन्यामध्ये लकी ड्रॉ घोषित केला जाईल, त्याच्या आधीच्या महिन्याच्या शेवटच्या दिवशी ग्राहकाची वीज देयक थकबाकीची रक्कम रु. १०/-पेक्षा कमी असावी.
लकी डिजिटल ग्राहक (Lucky Digital Grahak Yojana) योजनेच्या कालावधीत ग्राहक /ग्राहक क्रमांक फक्त एकाच बक्षिसासाठी पात्र असेल.
योजनेला लागू अटी व शती:
लकी डिजिटल ग्राहक (Lucky Digital Grahak Yojana) योजना महावितरणच्या वतीने ग्राहकांना ऑनलाइन पेमेंट करण्यास प्रोत्साहित करण्याच्या प्रयत्नांपैकी एक आहे. सदर योजना कोणत्याही प्रकारचे जुगार किंवा तत्सम गोष्टींना पाठिंबा / प्रोत्साहन देत नाही.
लकी डिजिटल ग्राहक (Lucky Digital Grahak Yojana) योजना सर्व ग्राहकांना विजेते बनवण्याची हमी देत नाही. सदर योजने अंतर्गत विजेत्यांच्या निवडीसाठी पारदर्शक संगणकीय पद्धतीने याद्रीच्छिक क्रमांक निवड प्रक्रिया (computerised random number selection process) वापरली जाईल.
लकी डिजिटल ग्राहक (Lucky Digital Grahak Yojana) योजने बाबत ग्राहकांना जागरूक करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले गेले जातील परंतु महावितरण प्रत्येक ग्राहकाशी थेट संवाद साधण्याची हमी देत नाही. सदर योजनेच्या प्रसिद्धी साठी महावितरणकडून विविध माध्यमांद्वारे प्रयत्न केले जातील जसे कि, महावितरणच्या वेबसाइट वर, वर्तमान पत्रांद्वारे , ग्राहकांच्या नोंदणीकृत मोबाइल क्रमांकावर संदेश इत्यादी.
उपलब्ध डेटानुसार बक्षीस जिंकणाऱ्या ग्राहकांच्या नोंदणीकृत मोबाइल क्रमांकावर ग्राहकांना संपर्क / सूचित केले जाईल. विजेत्या ग्राहकाकडून १० दिवसांच्या आत प्रतिसाद न दिल्यास, सोडतीच्या प्रतिक्षा यादीत निवडलेल्या ग्राहक क्रमांकांना बक्षीस वाटप कारणेबाबतचा निर्णय पूर्णपणे महावितरणच्या अखत्यारीत राहील,/ असेल.
अकस्मात घटना घडल्यास (जसे की आग, पूर, संप, युद्ध, वैधानिक आवश्यकता इत्यादींसह परंतु इतकेच मर्यादित नाही.) सदरचा लकी ड्रॉ निलंबित कारणेबाबतचा निर्णय पूर्णपणे महावितरणच्या अखत्यारीत राहील/ असेल आणि कोणताही विजेता ग्राहक अशा बक्षीसावर दावा करू शकत नाही.
विजेत्याने ओळखीचा पुरावा जसे की पॅन कार्ड आणि वास्तव्याचा पुरावा जसे की आधार कार्ड आणि चालू महिन्याचे वीज देयक व देयक भरणा केल्याची प्रत सादर करणे आवश्यक आहे.
भाषांतरित आवृत्ती मधील एखादया अटी व शर्तीच्या अर्थाबाबतीत विवाद असल्यास इंग्रजी अवृत्ती ग्राह्य धरण्यात येईल.
प्रत्येक लकी ड्रॉसाठी अपेक्षित वेळापत्रकः
विजेते ग्राहक देखील लकी ड्रॉ घोषित केल्यानंतर तीन दिवसांच्या आत जवळच्या महावितरण कार्यालयात संपर्क साधू शकतात. विजेत्या ग्राहकाने खालील कागदपत्रांच्या प्रती महावितरणच्या संबंधित उपविभागीय / विभागीय कार्यालयात सदर करणे आवश्यक आहे.:
१) ओळखीचा पुरावा जसे की पॅन कार्ड
२) वास्तवाच्या पुरावा जसे की आधार कार्ड
३) चालू महिन्याच्या वीज देयकाची प्रत
४) जर बिलाचे ग्राहक नाव (नोंदणीकृत ग्राहक) बक्षीसाचा दावा करणाऱ्या व्यक्तीपेक्षा वेगळे असेल तर, भाडेकरू करार किंवा संबंधित दस्तऐवज आणि मालक / नोंदणीकृत ग्राहकाकडून ना- हरकत प्रमाणपत्र.
५) जर नोंदणीकृत ग्राहक मयत झाला असेल आणि कायदेशीर वारस बक्षीसाचा दावा करत असेल, मृत्यू प्रमाणपत्र आणि कायदेशीर वारस प्रमाणपत्र.
विजेत्या ग्राहकाने पडताळणीसाठी मूळ कागदपत्र सदर करणे आवश्यक आहे.
विजेत्या ग्राहकाने मिळालेले बक्षीस उघडण्याचा (unwrapping) व चालू (activate) करण्याचा व्हिडिओ रेकॉर्ड करणे अनिवार्य आहे.
विजेते ग्राहक बक्षीस वस्तूच्या उत्पादक/सेवा प्रदात्यां कंपनीच्या जवळच्या सेवा केंद्राला भेट देऊन वॉरंटी सेवांबाबत दावा करू शकतात.
विजेत्यांसाठी सूचनाः
१. महिन्याच्या पहिल्या आठवड्यात लकी ड्रॉ घोषित केला जाईल. विजेत्यांची यादी महावितरणच्या वेबसाइटवर प्रसिद्ध केली जाईल.
२. महावितरणकडे उपलब्ध डेटानुसार बक्षीस जिंकणाऱ्या ग्राहकांच्या नोंदणीकृत मोबाइल क्रमांकावर ग्राहकांना संपर्क/सूचित केले जाईल.
महावितरणचे अधिकृत संकेतस्थळ : www.mahadiscom.in
या लेखात, आम्ही लकी डिजिटल ग्राहक योजना (Lucky Digital Grahak Yojana); योजनेच्या अटी, शर्ती, पात्रता विषयीची संपूर्ण माहिती दिली आहे. मला आशा आहे की तुम्हाला हा लेख आवडला असेल. तुम्हाला हा लेख आवडला तर नक्की शेअर करा. तुम्हाला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया टिप्पणी द्या.
खालील लेख अवश्य वाचा !
- थकबाकीमुळे वीज कनेक्शन तोडलेल्या ग्राहकांसाठी महावितरणची अभय योजना!
- महावितरणच्या ‘गो- ग्रीन’ योजनेंतर्गत नोंदणी करा आणि दरमहा वीजबीलामध्ये 10 रुपये वाचवा !
- महावितरणच्या वीज बिलावरील पत्त्याची दुरुस्ती करण्यासाठी ऑनलाईन अर्ज कसा करायचा? जाणून घ्या सविस्तर !
- महावितरणच्या वीज बिलावरील नावात बदल करण्यासाठी ऑनलाईन अर्ज कसा करायचा? जाणून घ्या सविस्तर माहिती !
- वीज बिल जास्त आले असेल तर काय करायचे? खराब मीटर बदलून नवीन मीटर कसा घ्यायचा? जाणून घ्या सविस्तर माहिती !
- विद्युत ट्रान्सफॉर्मर जळाले अथवा बिघडल्यास तातडीने दुरुस्त करून वीजपुरवढा चालू करण्यासाठी अशी करा ऑनलाईन तक्रार !
- शेतातून वीजेची लाईन गेल्यास किंवा टॉवर उभारल्यास आता इतका मोबदला मिळणार !
- मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना २०२४; आता शेतकऱ्यांना मिळणार मोफत वीज!
- मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना २.० : राज्यातील शेतकऱ्यांना दिवसा अखंडित वीज मिळणार !
- पीएम सूर्यघर मोफत वीज योजनेसाठी अर्ज सुरु ! PM Suryaghar Yojana
- विजेचे युनिट रेट/आकार आणि वीज ग्राहकांचे अधिकार
आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी इथे क्लिक करा !!