कृषी पशुसंवर्धन दुग्‍धव्‍यवसाय विकास व मत्‍स्‍यव्‍यवसाय विभागकृषी मंत्रालयकृषी योजनावृत्त विशेषसरकारी योजना

आता शेतकऱ्यांना मिळणार विनाहमी २ लाख रुपयांचे पीक कर्ज!

शेतकऱ्यांना RBI ने दिलासा देत कृषी कर्जाची मर्यादा विनाहमीसह (Vinahami Peek Karj) दोन लाख रुपये केली आहे. पीक कर्जाची नवी मर्यादा १ जानेवारी २०२५ पासून लागू होणार आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं (RBI) शेतकऱ्यांना नव्या वर्षाची भेट दिली आहे. शेतीचा वाढता खर्च लक्षात घेऊन रिझर्व्ह बँकेनं शेतकऱ्यांना विनाहमी देण्यात येणाऱ्या कर्जाची मर्यादा दोन लाख रुपयांपर्यंत वाढवली आहे. त्यामुळं शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.

विनाहमी पीक कर्ज! Vinahami Peek Karj:

आतापर्यंत शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या विनाहमी (Vinahami Peek Karj) पीक कर्जाची मर्यादा १.६ लाख रुपये होती. ही नवी मर्यादा १ जानेवारी २०२५ पासून लागू होईल, असं कृषी मंत्रालयानं शनिवारी जारी केलेल्या निवेदनात म्हटलं आहे. कोट्यवधी शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे.

आरबीआयनं २०१० मध्ये कृषी क्षेत्राला विनाहमी कर्ज (Vinahami Peek Karj) देण्यास सुरुवात केली होती. रिझर्व्ह बँकेनं एक लाख रुपये विनागॅरंटी देण्याची घोषणा केली. २०१९ मध्ये ही मर्यादा वाढवून १.६ लाख रुपये करण्यात आली होती. आता त्यात पुन्हा एकदा वाढ करण्यात आली आहे.

लघु व मध्यम शेतकऱ्यांना कृषी क्षेत्रातील वाढत्या महागाईमुळं अनेक अडचणींना सामोरं जावं लागत आहे. त्यामुळं त्यांच्या शेतीवर परिणाम होत होता. त्यामुळे या शेतकऱ्यांना रिझर्व्ह बँकेनं वाढवलेली मर्यादा फायदेशीर ठरणार आहे. शेतकऱ्यांकडं साधनसामुग्री अत्यंत मर्यादित होती. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना या विनाहमी (Vinahami Peek Karj) कर्जाचा फायदा होणार आहे. या निर्णयामुळं विशेषत: लहान आणि सीमांत शेतकऱ्यांना (८६ टक्क्यांपेक्षा जास्त क्षेत्रफळ) अधिक कर्ज उपलब्ध होईल, अशी अपेक्षा कृषी मंत्रालयानं व्यक्त केली आहे.

आरबीआय अधिकृत सूचना (RBI Vinahami Peek Karj Notification):

शेतीसाठी कर्ज प्रवाह – संपार्श्विक मुक्त कृषी कर्ज बाबत RBI ची अधिकृत सूचना पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

पुढील लेख देखील वाचा!

  1. पीक कर्ज मागणीसाठी ऑनलाईन अर्ज कसा करायचा? जाणून घ्या सविस्तर माहिती !
  2. शेतकऱ्यांना मिळणार ५ मिनिटांत पीक कर्ज, आरबीआय-नाबार्ड सोबत करार!
  3. शेतकऱ्यांना अल्पमुदत पीक कर्ज पुरवठा करण्यासाठी १ टक्का कमी व्याज दराने अर्थसहाय्य !
  4. शेतकऱ्यांना पीक कर्जासाठी सिबिलची अट रद्द करण्याचे सहकार आयुक्तांचे आदेश !
  5. महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना : 50 हजार प्रोत्साहनपर लाभासाठी कर्जखात्याचे आधार प्रमाणीकरण करा !
  6. शेतीशी निगडीत कर्जाच्या वसुलीस स्थगिती
  7. कृषी कर्ज मित्र योजना – Krishi Karj Mitra Yojana
  8. बँकेचे कर्ज फेडल्यानंतर बँकेकडुन हि कागदपत्रे अवश्य घ्या नाहितर होऊ शकते आर्थिक नुकसान !
  9. किसान क्रेडिट कार्डसाठी असा करा ऑनलाईन अर्ज !
  10. ॲग्रिस्टॅक योजनेअंतर्गत फार्मर आयडीसाठी ऑनलाईन नोंदणी कशी करायची? जाणून घ्या सविस्तर माहिती !
  11. E-Peek Pahani DCS App : ‘डिजिटल क्रॉप सर्व्हे’ हे सुधारित ई-पीक पाहणी व्हर्जन -३ ॲप शेतकऱ्यांसाठी उपलब्ध!

वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.

आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी इथे क्लिक करा !!

शेअर करा:
WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Channel Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.