(PAN 2.0) – पॅन कार्ड वरील मोबाईल नंबर, ईमेल आयडी व पत्ता अपडेट करण्याची ऑनलाईन प्रोसेस !
भारत सरकार वित्तीय व्यवहारविषयक मंत्रिमंडळ समितीने (सीसीईए) प्राप्तिकर विभागाच्या पॅन 2.0 प्रकल्पाला मंजुरी दिली आहे. पॅन कार्ड (PAN 2.0 – PAN Card Update) अपडेट करण्यासाठी आणि चांगले पॅन देण्यासाठी आयकर विभागाने ही घोषणा केली आहे. यामुळे अर्जदारांच्या नोंदणीकृत ईमेल आयडीवर क्यूआर कोड असलेले ई-पॅन कार्ड मोफत पाठवले जातात. सध्याचे पॅन कार्ड क्यूआर कोडशिवायही वैध राहतील. तर तुम्ही सुद्धा पॅन 2.0 ऑनलाईन पद्धतीने घरी बसून पॅन कार्ड वरील मोबाईल नंबर, ईमेल आयडी व पत्ता (PAN Card Update) अपडेटसाठी अर्ज करू शकता.
पॅन 2.0 प्रकल्प हा करदात्यांच्या सुधारित डिजिटल अनुभवासाठी पॅन/टॅन सेवांच्या तंत्रज्ञानावर आधारित परिवर्तनाद्वारे करदाता नोंदणी सेवांच्या व्यावसायिक प्रक्रियेच्या पुनर्अभियांत्रिकीकरणाचा एक ई-गव्हर्नन्स प्रकल्प आहे. हे सध्याच्या पॅन/टॅन1.0 इको-सिस्टीमचे अपग्रेड असून ते कोअर आणि नॉन-कोअर पॅन/टॅन क्रियाकलाप तसेच पॅन प्रमाणीकरण सेवेचे एकत्रीकरण करेल.
पॅन 2.0 प्रकल्पामध्ये सरकारच्या डिजिटल इंडियाचे व्हिजन प्रतिध्वनित झाले आहे ज्याद्वारे निर्दिष्ट सरकारी एजन्सीच्या सर्व डिजिटल प्रणालींसाठी समान ओळखकर्ता म्हणून पॅनचा वापर करणे शक्य होईल.
पॅन कार्ड क्यूआर कोड:
QR कोड हे नवीन वैशिष्ट्य नाही आणि ते 2017-18 पासून पॅन कार्डमध्ये समाविष्ट केले गेले आहे. पॅन 2.0 प्रकल्पांतर्गत सुधारणांसह (डायनॅमिक क्यूआर कोड जो पॅन डेटाबेसमध्ये नवीनतम डेटा प्रदर्शित करेल). क्यूआर कोडशिवाय जुने पॅन कार्ड असलेल्या पॅन धारकांना सध्याच्या पॅन 1.0 इको-सिस्टीममध्ये तसेच पॅन 2.0 मध्ये क्यूआर कोडसह नवीन कार्डसाठी अर्ज करण्याचा पर्याय आहे.
- क्यूआर कोड पॅन आणि पॅन तपशील प्रमाणित करण्यात मदत करतो.
- सध्या, क्यूआर कोड तपशीलांच्या पडताळणीसाठी विशिष्ट क्यूआर रीडर ऍप्लिकेशन उपलब्ध आहे.
- रीडर ॲप्लिकेशनद्वारे वाचल्यावर संपूर्ण तपशील म्हणजे फोटो, स्वाक्षरी, नाव, वडिलांचे नाव / आईचे नाव आणि जन्मतारीख प्रदर्शित केली जाते.
पॅन कार्ड वरील मोबाईल नंबर, ईमेल आयडी व पत्ता अपडेट करण्याची ऑनलाईन प्रोसेस ! (PAN 2.0) PAN Card Update Online:
पॅनकार्ड NSDL किंवा UTI च्या पोर्टलवरून ऑनलाईन मोबाईल नंबर, ईमेल आयडी व पत्ता (PAN 2.0 – PAN Card Update) अपडेट करून घरबसल्या मिळवा.
1) NSDL पोर्टल वरून पॅनकार्ड अपडेट करण्याची प्रक्रिया – NSDL PAN Card Update Online:
पॅनकार्ड अपडेट (PAN Card Update) म्हणजेच नवीन मोबाईल नंबर, ईमेल आयडी व पत्ता नोंदणीसाठी खालील NSDL ची वेबसाईट ओपन करा.
https://www.onlineservices.nsdl.com/paam/endUserAddressUpdate.html
आता आपला पॅनकार्ड नंबर, आधार नंबर, जन्म दिनांकाचा महिना/वर्ष व कॅप्चा कोड टाकून सबमिट करा.
आता “Continue with e-KYC” वर क्लिक करा.
आधार आधारित ई-केवायसी जनरेट करण्यासाठी तुमच्या आधारशी नोंदणीकृत तुमच्या मोबाइल/ईमेल आयडीवर वन टाइम पासवर्ड (OTP) पाठवला जाईल तो टाकून सबमिट करा.
पॅन डेटाबेसनुसार मोबाईल क्रमांक आणि ईमेल आयडी दाखवला जाईल तो (PAN Card Update) अपडेट करायचा असेल तर Yes वर क्लिक करा आणि नवीन मोबाईल क्रमांक आणि ईमेल आयडी ओटीपी टाकून अपडेट करा किंवा अपडेट करायचा नसेल तर No वर क्लिक करून सबमिट वर क्लिक करा.
पुढे आधार कार्ड वर जो पत्ता आहे तो दाखवला जाईल तो चेक करा आणि व्हेरिफाय बटनावर क्लिक करा.
तुमची ॲड्रेस अपडेट (PAN Card Update) करण्याची विनंती यशस्वीरित्या स्वीकारली जाईल व पोचपावती क्रमांक नोट करून ठेवा. आयकर विभागाकडून पुष्टी मिळाल्यानंतरच पत्ता अपडेट केला जाईल आणि त्यानुसार दिलेल्या ईमेल आयडीवर ईमेल पाठवला जाईल.
पुढे जनरेट आणि सेव्ह प्रिंट वर क्लिक करून pdf फाईल मध्ये पत्ता अपडेट सुविधेची पोचपावती डाउनलोड करा.
2) UTI पोर्टल वरून पॅनकार्ड अपडेट करण्याची प्रक्रिया – UTI PAN Card Update Online:
पॅनकार्ड अपडेट म्हणजेच नवीन मोबाईल नंबर, ईमेल आयडी व पत्ता नोंदणीसाठी खालील UTI ची वेबसाईट ओपन करा.
https://www.pan.utiitsl.com/PAN_ONLINE/homeaddresschange
आता आपला पॅनकार्ड नंबर, आधार नंबर, मोबाईल नंबर, ईमेल आयडी व डिजीलॉकर सेवेद्वारे किंवा आधार आधारित eKYC मोडद्वारे सुविधा निवडा व कॅप्चा कोड टाकून सबमिट करा.
अर्जदाराला UIDAI रेकॉर्डमध्ये नोंदणीकृत असलेल्या मोबाइल नंबर आणि ईमेल आयडीवर आधार प्रमाणीकरणासाठी OTP मिळेल. जर UIDAI रेकॉर्डनुसार मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी अस्तित्वात नसेल किंवा OTP प्रमाणीकृत नसेल, तर या सेवा UIDAI रेकॉर्डनुसार पत्ता अपडेट (PAN Card Update) करण्याची सुविधा देणार नाहीत.
पुढे UIDAI रेकॉर्डमधून मिळवलेला पत्ता अर्जदाराच्या पुष्टीकरणासाठी दाखवला जाईल.
यशस्वी व्यवहारानंतर अर्जावर प्राप्तिकर विभागाच्या नोंदी अद्ययावत करण्यासाठी प्रक्रिया केली जाईल. जे UIDAI आधार रेकॉर्डनुसार पत्ता अपडेट करण्यास इच्छुक नाहीत त्यांनी पत्ता (PAN Card Update) अपडेट करण्यासाठी बदल विनंती मोडद्वारे अर्ज करण्याची विनंती केली जाते.
डाउनलोड वर क्लिक करून pdf फाईल मध्ये अपडेट सुविधेची पोचपावती डाउनलोड करा.
पॅन कार्ड धारकाने त्याच्या विद्यमान पॅन मध्ये कोणतेही अद्ययावतीकरण/ दुरुस्ती करण्याची विनंती केलेली नसेल तर नवे पॅन कार्ड वितरीत केले जाणार नाही.
खालील लेख देखील वाचा !
- 5 मिनिटात मोफत पॅन कार्ड काढा – इन्स्टंट पॅन वाटपाची सर्वसाधारण योजना !
- पॅनकार्ड हरवल्यास काय करावे? तुमचा पॅन कार्ड नंबर आठवत नसेल तर कसा शोधावा ?
- पॅनकार्ड आधार कार्डला लिंक करण्याची ऑनलाईन प्रोसेस – PAN Card Aadhar Card Link
- या तारखेपर्यंत तुमचे आधार कार्ड ऑनलाईन मोफत अपडेट करा !
- आधारकार्ड PDF फाईल मध्ये डाउनलोड करण्याची प्रोसेस ! Download Aadhaar Card in PDF File
- आधार कार्ड वरील पत्ता अपडेट करण्याची ऑनलाईन प्रोसेस !
- मुलींच्या लग्नानंतर आधार कार्डवरील नाव बदलण्याची प्रोसेस !
- तुमच्या आधारकार्डवर किती मोबाईल नंबर सक्रिय आहेत ते पहा !
वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.
आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी इथे क्लिक करा !!