कृषी पशुसंवर्धन दुग्‍धव्‍यवसाय विकास व मत्‍स्‍यव्‍यवसाय विभागकृषी मंत्रालयकृषी योजनावृत्त विशेषसरकारी योजना

ॲग्रिस्टॅक योजनेअंतर्गत फार्मर आयडीसाठी ऑनलाईन नोंदणी कशी करायची? जाणून घ्या सविस्तर माहिती !

ॲग्रिस्टॅक हे कृषि क्षेत्रात डेटा आणि डिजिटल सेवा वापरुन शासनाच्या विविध योजनांचा लाभ पात्र शेतकऱ्यांपर्यंत जलद गतीने व परिणामकारकरित्या पोहचण्यासाठी स्थापित केले जाणारे डिजिटल फाउंडेशन आहे. कृषि क्षेत्रासाठी सर्वसमावेशक डिजिटल पायाभूत सुविधा निर्माण करणे हा ॲग्रिस्टॅक (Agristack Farmer ID) उपक्रमाचा उद्देश आहे. या प्रकल्पामुळे माहिती आधारित योग्य निर्णय घेणे, गरजू शेतकऱ्यांना योग्य वेळी सेवा प्रदान करणे, कृषि उपक्रमांची कार्यक्षमता सुधारणे शक्य होईल. विविध शेतकरी आणि कृषि-केंद्रित योजनांची आखणी करणे व अंमलबजावणी करणे सुलभ होईल.

ॲग्रिस्टॅक योजनेअंतर्गत फार्मर आयडीसाठी ऑनलाईन नोंदणी करण्याची प्रोसेस – Agristack Farmer ID:

ॲग्रिस्टॅक योजनेअंतर्गत फार्मर आयडी (Agristack Farmer ID) काढण्यासाठी खालील वेबसाईवर क्लिक करा.

https://mhfr.agristack.gov.in/farmer-registry-mh/#/

नवीन वापरकर्ता खाते तयार करा:

वेबसाईट ओपन केल्यानंतर उजव्या बाजूला Log in as मध्ये दोन पर्याय दिसतील, त्यापैकी Farmar या पर्यायावरती क्लिक करून खालील Create new user account वरती क्लिक करायचे आहे.

Log In as Farmer - Agristack Farmer ID
Log In as Farmer

त्यानंतर एक नवीन पेज ओपन होईल त्यामध्ये Aadhaar e-KYC साठी आपला आधार नंबर प्रविष्ट करून सबमिट या बटनावर क्लिक करायचे आहे.

पुढे आपल्या आधार नंबरला लिंक असलेल्या मोबाइल नंबर वर OTP पाठविला जाईल तो OTP प्रविष्ट करून Verify बटनावरती क्लिक करायचे आहे.

त्यानंतर नवीन पेज वरती Verified OK असा मेसेज येईल व तुमचा आधार नंबर, नाव, वय, लिंग, जन्मतारीख ही आधार कार्ड वरील संपूर्ण माहिती तुम्हाला दिसेल.

त्यामध्ये खाली Provide Mobile Number to Link with Agristack Platform या पर्यायामध्ये मध्ये आपण Farmar ID साठी जो मोबाईल नंबर लिंक करायचा आहे तो नंबर येथे प्रविष्ट करायचा आहे व जो OTP येईल तो टाकून Verify बटनावरती क्लिक करायचे आहे.

त्यानंतर तुम्हाला पासवर्ड सेट (Set Password) करायचा आहे व Create My Account  या पर्याया वरती क्लिक करायचे आहे नंतर स्क्रीन वरती एक Confirmation येईल त्यामध्ये तुमचा अकाउंट तयार झाला आहे असे दाखविले जाईल तिथे OK या बटनावरती क्लिक करायचे आहे.

Agristack Farmer ID Registration Successful
Agristack Farmer ID Registration Successful
लॉग इन करा:

त्यानंतर पुन्हा वेबसाईट वर येऊन Farmer या पर्याया वर क्लिक करून मोबाईल नंबर, OTP, पासवर्ड, captcha Code टाकून Log in या पर्याया वरती क्लिक करायचे आहे.

Log In as agristack Farmer
Log In as agristack Farmer

Log in झाल्यावर खाली Register as Farmer या पर्यायावरती क्लिक करायचे आहे, क्लिक केल्यानंतर तुम्हाला एक Confirmation येईल त्यामध्ये जर तुम्हाला मोबाइल नंबर बदलायचा असेल तर Yes वर क्लिक करा किंवा नसेल तर No वरती क्लिक करा.

त्यानंतर खाली तुमची माहिती येईल ती माहिती बरोबर आहे का ते सर्व चेक करायचे आहे, तसेच खाली तुमचा फोटो दिसेल तो चेक करून तुमचा New Business आहे का असेल तर Yes करा नसेल तर No करा.

त्यानंतर Land Holder Details मध्ये Owner टाकायचे आहे व Occupation Details मध्ये Agriculture मध्ये क्लिक करायचे आहे.

त्यानंतर Fetch Land Details वरती क्लिक करायचे आहे तिथे आपल्याला जमिनीची माहिती टाकायची आहे यामध्ये ज्या ठिकाणी तुमची जमीन आहे त्या ठिकाणचा जिल्हा, तालुका व गाव टाकून sarvey नंबर टाकून सर्च करा.

त्यानंतर तुमच नाव तुम्हाला select करायचे आहे, पुढे तुमची सर्व माहिती तुम्हाला दाखवली जाईल. त्यामध्ये काही माहिती तुम्हाला Add करायची असेल तर ती करू शकता.

त्यानंतर खाली Land Details वर क्लिक करून तुम्हाला जर अजून सातबारा add करायचा असेल तर करू शकता व Verify All Land वरती क्लिक करायचे आहे त्यामध्ये Social Registry Details मध्ये Family ID टाकायचा असेल तर टाका किंवा सोडून द्या.

त्यानंतर Department Approval मध्ये Agriculture सिलेक्ट करा व I agree सिलेक्ट करून Save वरती क्लिक करा. नंतर स्क्रीन वरती एक Confirmation येईल त्यामध्ये Proceed to E – Sign वरती क्लिक करा.

त्यानंतर तुम्हाला इथे आधार Details टाकायची आहेत व OTP टाकायचा आहे. व सबमिट बटनावरती क्लिक करायचे आहे. येथे तुमची डिजिटल KYC पूर्ण होईल. डिजिटल KYC पूर्ण झाल्यानंतर कोपऱ्यामध्ये Farmer Enrollment ID दिसेल.

त्याच्या बाजूला Download PDF वरती क्लिक करून Farmer Enrollment ID Details Download करून ठेवायची आहे जोपर्यंत आपला Agristack Farmer ID Approved होत नाही.

पुढील लेख देखील वाचा!

  1. ॲग्रिस्टॅक योजना : डिजिटल सेवांचा वापर करुन शासनाच्या विविध योजनांचा लाभ शेतकऱ्यांना जलद गतीने मिळणार !
  2. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेसाठी ऑनलाईन नोंदणी कशी करायची? जाणून घ्या सविस्तर माहिती !
  3. किसान क्रेडिट कार्डसाठी असा करा ऑनलाईन अर्ज !
  4. आंबिया बहार फळ पीक विमा योजना : फळ पीक विमा योजनेसाठी असा करा ऑनलाईन अर्ज !
  5. E-Peek Pahani DCS App : ‘डिजिटल क्रॉप सर्व्हे’ हे सुधारित ई-पीक पाहणी व्हर्जन -३ ॲप शेतकऱ्यांसाठी उपलब्ध!
  6. नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पांतर्गत विविध पोकरा अनुदान योजना – PoCRA Scheme.

वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.

आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी येथे क्लिक करा !!

शेअर करा:
WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Channel Join Now

One thought on “ॲग्रिस्टॅक योजनेअंतर्गत फार्मर आयडीसाठी ऑनलाईन नोंदणी कशी करायची? जाणून घ्या सविस्तर माहिती !

  • Chandrashekhar

    ॲग्री स्टेक मध्ये कोणतेही कॅपच्या ऍक्टिव्हेट होत नाही कृपया संबंधितांनी या गोष्टीची नोंद घेऊन कृपया कॅप्चा ऍक्टिव्हेट होण्यासाठी काहीतरी करावे जेणेकरून लोकांना याच्यामध्ये भाग घेता आहे

    Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.