कृषी पशुसंवर्धन दुग्‍धव्‍यवसाय विकास व मत्‍स्‍यव्‍यवसाय विभागमहाराष्ट्र शासन निर्णय - GRवृत्त विशेषसरकारी योजना

देशी गायींच्या पालन पोषणासाठी अनुदान योजना ; प्रति दिन प्रति पशु रु. 50/- अनुदान !

राज्यातील गोशाळांमधील देशी गायींच्या पालन-पोषणासाठी (Desi Gaay Palan Poshan Anudan Yojana) प्रति दिन, प्रति गाय पन्नास रुपये अनुदान योजना राबवण्याचा निर्णय मा. मंत्रिमंडळाने दि. ३० सप्टेंबर, २०२४ रोजी पार पडलेल्या बैठकीत मान्यता दिली आहे. राज्यात दि. ४ मार्च, २०१५ पासून महाराष्ट्र प्राणी रक्षण (सुधारणा) अधिनियम, १९९५ लागू करण्यात आला आहे. या कायद्यानुसार संपूर्ण गोवंशीय प्राण्यांच्या कत्तलीवर प्रतिबंध करण्यात आलेला आहे. त्यामुळे शेतकामासाठी, ओझी वाहण्यासाठी व पैदाशीसाठी उपयुक्त नसलेले गोवंशीय बैल व वळू यांच्या कत्तलीवर बंदी घालण्यात आलेली आहे. परिणामी, शेती व दूध यासाठी अनुत्पादक असलेल्या गोवंशीय पशुधनाच्या संख्येत वाढ होत आहे. या सर्व पशुधनाचा सांभाळ / संगोपन करणे पशुपालकांना व्यवसायिकदृष्ट्या परवडणारे नसल्याने अशी बहूतांश जनावरे एकतर मोकाट सोडली जातात किंवा गोशाळेत ठेवण्यात येतात.

सदर पशुधन हे अनुत्पादक किंवा कमी उत्पादन क्षमतेचे असल्याने गोशाळांवर मोठ्या प्रमाणात आर्थिक भार पडत आहे. देशी वंशाच्या गोधनाचे जतन व संवर्धन करण्यासाठी देशी गोधनाचे संगोपन करण्याचे काम गोशाळा, गोसदन, पांजरपोळ व गोरक्षण संस्था यांच्यामार्फत करण्यात येते. मात्र सदर पशुधनापासून अत्यल्प उत्पन्न मिळत असल्याने गोशाळा, गोसदन, पांजरपोळ व गोरक्षण संस्थांना आर्थिकदृष्ट्या परवडत नाही. यास्तव, गोशाळा, गोसदन, पांजरपोळ व गोरक्षण संस्था बळकट करण्याकरिता त्यांना गो संगोपनासाठी आर्थिक सहाय्य देण्याच्या योजनेस मा. मंत्रिमंडळाने दि. ३० सप्टेंबर, २०२४ रोजी पार पडलेल्या बैठकीत मान्यता दिली आहे. त्यानुषंगाने खालीलप्रमाणे शासन निर्णय निर्गमित करण्यात येत आहे.

देशी गायींच्या पालन पोषणासाठी अनुदान योजना! Desi Gaay Palan Poshan Anudan Yojana:

आजमितीस देशी गार्थीची उत्पादनक्षमता कमी असल्यामुळे त्यांचे संगोपन करणे व्यावसायिकदृष्ट्या किफायतशीर ठरत नाही. तसेच भाकड / अनुत्पादक गायींचे संगोपन करणे पशुपालकांना फायदेशीर नसल्याने अशी जनावरे गोशाळेत ठेवण्यात येतात. त्यामुळे गोशाळांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याची आवश्यकता विचारात घेऊन सन २०२४-२५ पासून महाराष्ट्र गोसेवा आयोगाकडे नोदणीकृत असलेल्या गोशाळेत ठेवण्यात येणाऱ्या गायींना रु. ५०/- प्रति दिन प्रति गोवंश (Desi Gaay Palan Poshan Anudan Yojana) अनुदान देण्यासाठी पुढील प्रमाणे योजना राबविण्यास या शासन निर्णयान्वये मान्यता देण्यात येत आहे.

योजनेचे स्वरुप :-

(१) महाराष्ट्र गोसेवा आयोगाकडे नोदणीकृत असलेल्या गोशाळातील भारत पशुधन प्रणालीवर नोंद असलेल्या देशी गायींच्या परिपोषणासाठी प्रति दिन अनुदान अनुज्ञेय राहील.

(२) अनुदानाची रक्कम रुपये ५०/- प्रति दिन प्रति देशी गाय.

अनुदान पात्रतेच्या अटी :-

(१) महाराष्ट्र गोसेवा आयोगाकडे नोदणीकृत असलेल्या गोशाळा, गोसदन, पांजरपोळ व गोरक्षण संस्था अनुदानासाठी पात्र राहतील.

(२) संस्थेस गोसंगोपनाचा कमीतकमी तीन वर्षाचा अनुभव असावा.

(३) गोशाळेत किमान ५० गोवंश असणे आवश्यक राहील.

(४) संस्थेतील गोवंशीय पशुधनास ईअर टॅगिंग (भारत पशुधन प्रणालीवर) करणे अनिवार्य राहील.

(५) ईअर टॅगिंग असलेले गोवंशीय पशुधन अनुदानास पात्र राहील.

(६) संस्थेचे राष्ट्रीयकृत बँकेत खाते असणे आवश्यक आहे.

योजनेची अंमलबजावणी :-

(१) देशी गायींच्या पालन पोषणासाठी अनुदान (Desi Gaay Palan Poshan Anudan Yojana) योजना महाराष्ट्र गोसेवा आयोगामार्फत राबविण्यात येईल.

(२) योजनेंतर्गत अनुदानासाठी Online पध्दतीने अर्ज महाराष्ट्र गोसेवा आयोगाकडून अर्ज मागविण्यात येतील.

(३) देशी गायींच्या पालन पोषणासाठी (Desi Gaay Palan Poshan Anudan Yojana) अनुदानासाठी अर्ज करतांना संबंधित गोशाळांनी मागील तीन वर्षाचा लेखापरीक्षण अहवाल सादर करणे आवश्यक राहील.

(४) प्राप्त अर्जाची छाननी, त्रुटींची पूर्तता गोसेवा आयोगाच्या स्तरावर करण्यात येईल.

(५) गोसेवा आयोगास प्राप्त झालेले ऑनलाईन अर्ज व त्याचा तपशिल संबंधित “जिल्हा गोशाळा पडताळणी समिती” यांना पडताळणीसाठी उपलब्ध करुन देईल.

(६) प्रत्येक जिल्हयात  “जिल्हा गोशाळा पडताळणी समिती” गठित करण्यात येत आहे:-

जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त (संबंधित जिल्हा)अध्यक्ष
जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी, जिल्हा परिषद, (संबंधित जिल्हा)सदस्य
नोदणीकृत गोशाळा, गोसदन, पांजरपोळ व गोरक्षण संस्था ज्या कार्यक्षेत्रात असेल त्या तालुक्यातील तालुका लघुपशुवैद्यकीय सर्व चिकीत्सालयातील सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धनसदस्य
सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन, जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त कार्यालय, संबंधित जिल्हासदस्य सचिव

(७) “जिल्हा गोशाळा पडताळणी समिती” संबंधित गोशाळेस प्रत्यक्ष भेट देऊन विहित अटी व शर्तीची तपासणी करुन महाराष्ट्र गोसेवा आयोगास वस्तुनिष्ठ अहवाल सादर करील.

(८) जिल्हा गोशाळा पडताळणी समितीचा अहवाल व त्यानुसार अनुदानास पात्र गोधनाची संख्या विचारात घेऊन आवश्यक निधीची मागणी गोसेवा आयोगाकडून शासनाकडे करण्यात येईल.

(९) प्राप्त पडताळणी अहवालानुसार गोशाळांना दोन टप्प्यात सहा महिन्यांच्या अंतराने अनुदान वितरणाची कार्यवाही करण्यात येईल.

(१०) जिल्हा गोशाळा पडताळणी समितीने गोशाळांची प्रत्यक्ष पडताळणी वर्षातून दोन वेळा (एप्रिल ते सप्टेंबर व ऑक्टोबर ते मार्च) करुन पडताळणी महाराष्ट्र गोसेवा आयोगास सादर करील.

(११) पडताळणी अहवाल विचारात घेऊनच गायींच्या संख्येनुसार पुढील अनुदान वितरित करण्यात येईल.

(१२) गोशाळांना अनुदान हे थेट लाभ हस्तांतरण (DBT) व्दारे संबंधित संस्थेच्या बँक खात्यामध्ये वर्ग करण्यात येईल.

(१३) दुसऱ्या हप्त्यांतर्गत देय अनुदान वितरीत करण्यापूर्वी संस्थेस पहिल्या हप्त्यात दिलेल्या अनुदानाचे उपयोगिता प्रमाणपत्र संबंधित जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त यांच्या प्रतिस्वाक्षरीने सादर करणे बंधनकारक राहील.

(१४) संस्थेत संगोपन करण्यात येत असलेल्या पशुधनाची भारत पशुधन प्रणालीवर नोंद करणे बंधनकारक राहील. तसेच सर्व पशुधनाची टॅगनिहाय स्वतंत्र नोंदवही ठेवणे बंधनकारक राहील.

(१५) संबंधित गोशाळेने नजीकच्या काळात प्रथम प्राधान्याने कायम स्वरूपी चाऱ्याची सोय करण्याकरिता वैरण उत्पादन, चारा प्रक्रिया, मुरघास निर्मिती याबाबत कार्यवाही करणे आवश्यक राहील.

(१६) योजनेच्या अंमलबजावणी संदर्भात वित्तीय बाबी वगळता किरकोळ स्वरूपाचे बदल करण्याचे अधिकार प्रशासकीय विभागास राहतील.

कृषि, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभाग शासन निर्णय :

गोशाळांमध्ये ठेवण्यात येणाऱ्या देशी गायींच्या पालनपोषणासाठी प्रति दिन प्रति पशु रु.50/- अनुदान (Desi Gaay Palan Poshan Anudan Yojana) योजना राबविण्याबाबत शासन निर्णय पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

पुढील लेख देखील वाचा!

  1. दूध अनुदान योजना : योजनेच्या अटी व शर्ती व सविस्तर माहिती पहा !
  2. दुग्ध विकास प्रकल्प टप्पा-2 : या 19 जिल्ह्यांमध्ये गाई म्हशी गट वाटप साठी शासनाची नवीन योजना !
  3. राष्ट्रीय पशुधन अभियान (NLM) ; शेळी-मेंढी, कुक्कुट, वराह पालन व वैरण बियाणे उत्पादनाकरीता योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करा – National Livestock Mission
  4. ७५ टक्के अनुदानावर दुधाळ जनावरे गट वाटपाची योजना सुरु !
  5. पशु किसान क्रेडिट कार्डसाठी असा करा अर्ज !

वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.

आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी इथे क्लिक करा !!

शेअर करा:
WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Channel Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.