महाराष्ट्र शासन निर्णय - GRवृत्त विशेष

ब्राह्मण समाजासाठी परशुराम आर्थिक विकास महामंडळ स्थापन !

राज्यातील ब्राह्मण समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना शैक्षणिक तसेच व्यवसाय उभारण्यासाठी आर्थिक पाठबळाअभावी अडचणी येतात. अशा घटकांना आर्थिक सहाय्य मिळण्याकरीता आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्याची मागणी होत आहे. सदर घटकातील पात्र लाभार्थ्यांना शैक्षणिक तसेच व्यवसायासाठी शासनामार्फत आर्थिक सहाय्य करण्याचे नियोजित आहे. त्यासाठी ब्राह्मण समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

ब्राह्मण समाजासाठी परशुराम आर्थिक विकास महामंडळ स्थापन !

ब्राह्मण समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील सुशिक्षीत बेरोजगार तरुणांकरीता शेतीपूरक व्यवसाय, विपणन, प्रक्रिया, उद्योग, पुरवठा आणि साठवणूक याचंबरोबर लघु उद्योग, वाहतुक, अन्य व्यावसायिक उद्योग उपलब्ध करुन देणे किंवा त्यास अर्थसहाय्य करुन स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करुन देणे तसेच आर्थिक स्तर उंचावण्यासाठी ब्राह्मण समाजासाठी परशुराम आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्याचा निर्णय दिनांक २३.०९.२०२४ रोजीच्या मंत्रीमंडळ बैठकीमध्ये झाला आहे. त्यानुसार ब्राह्मण समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी कंपनी अधिनियम, २०१३ च्या कलम ८ अंतर्गत शासकीय हमी असलेली व भाग भांडवल नसलेली कंपनी म्हणून परशुराम आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्यात येत आहे.

महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक हे किमान मंत्रालयीन सह सचिव दर्जाचे असतील. महामंडळाचे मुख्यालय पुणे येथे राहील. महामंडळाचे अधिकृत भाग भांडवल हे रु. ५० कोटी इतके राहील. दरवर्षी या महामंडळाच्या भागभांडवलासाठी निधीच्या उपलब्धतेनुसार तरतूद केली जाईल. तसेच प्रस्तावित महामंडळाच्या कार्यालयासाठी जागा व आवश्यकतेनुसार असलेला कर्मचारीवृंद उपलब्ध करून देण्यात येईल.

सदर महामंडळाच्या स्थापनेनंतरही ब्राह्मण समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील युवक, युवती व इतर उमेदवारांना अमृत या संस्थेच्या विविध योजना/उपक्रम/कार्यक्रम यांचा लाभ नेहमीप्रमाणे घेता येईल.

नियोजन विभाग शासन निर्णय :

ब्राह्मण समाजासाठी परशुराम आर्थिक विकास महामंडळ स्थापन करणेबाबत शासन निर्णय पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

पुढील लेख देखील वाचा!

  1. महाराष्ट्र ऑटो-रिक्षा आणि मिटर्ड टॅक्सी चालक कल्याणकारी मंडळाची स्थापना!
  2. राज्यातील सुतार समाजासाठी सुतार समाज आर्थिक विकास महामंडळाची स्थापना!
  3. राजपूत समाजासाठी वीर शिरोमणी महाराणा प्रताप आर्थिक विकास महामंडळ स्थापन!

वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.

आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी येथे क्लिक करा !!

शेअर करा:
WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Channel Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.