कृषी पशुसंवर्धन दुग्‍धव्‍यवसाय विकास व मत्‍स्‍यव्‍यवसाय विभागमहाराष्ट्र शासन निर्णय - GRवृत्त विशेषसरकारी योजना

दूध अनुदान योजना : योजनेच्या अटी व शर्ती व सविस्तर माहिती पहा !

दूध व दुग्धजन्य पदार्थाचे भाव हे प्रामुख्याने मागणी व पुरवठा आणि आंतरराष्ट्रीय बाजारातील दुध भुकटी व बटरचे दर यावर अवलंबून असतात. त्यानुसार आंतरराष्ट्रीय बाजारात दूध भुकटी व बटरचे दर कमी झाल्यास दुधाचे दर कमी होतात याचा परिणाम देशांतर्गत उत्पादित होणाऱ्या दुध भुकटी व बटरच्या विक्री वर सुद्धा होतो. याशिवाय, दुधाच्या अति पुष्ट (Super Flush) काळातही दुधाचे दर कोसळतात, ही वस्तुस्थिती आहे. तथापि, असे असुनही राज्यातील दुध उत्पादक शेतक-यांचे आर्थिक हित जोपासण्यासाठी शासन “विशेष परिस्थितीत” बाजारात उचित हस्तक्षेप करत असून, दूध उत्पादक शेतकऱ्यांना योग्य न्याय देण्याचा प्रयत्न करीत असते.

दूध अनुदान योजना – Dudh Anudan Yojana:

दूध भुकटी व बटरचे दर कोसळलेले असल्याने दुधाच्या भावात झालेली घसरण तसेच दूध अनुदान योजना (Dudh Anudan) पुनश्चः सुरू करण्याची दूध उत्पादक शेतकऱ्यांकडून मागणी विचारात घेऊन दि. २८.६.२०२४ रोजी अतिरक्त अर्थसंकल्प सादर करतेवेळी मा. उपमुख्यमंत्री (वित्त) यांनी दूध उत्पादक शेतकऱ्यांना दि. १ जुलै, २०२४ पासून रू. ५/- अनुदान देण्याची घोषणा केली होती. तसेच दि. १.७.२०२४ रोजी मा. मंत्री (दुग्धव्यवसाय) यांचे अध्यक्षतेखाली राज्यातील प्रमुख दूध संघ व शेतकरी प्रतिनिधींसोबत बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यानुषंगाने, दि. २.७.२०२४ रोजी सभागृहात मा. मंत्री (दुग्धव्यवसाय) यांनी दूध अनुदान विषयक निवेदन केले त्यानुसार, आंतरराष्ट्रीय बाजारात दूध पावडर व बटरचे दर कमी झाल्यामुळे दूध पावडरचा साठा शिल्लक असल्याने, यावर उपाययोजना म्हणून राज्यातील जे प्रकल्प दूध भुकटी निर्यात करतील, त्यांना निर्यातीस प्रोत्साहन म्हणून रू. ३०/- प्रतिकिलो अनुदान देण्याची घोषणा केली होती.

सदर घोषणांच्या अनुषंगाने दि. ५.७.२०२४ रोजी मा. मंत्रिमंडळाच्या मान्यतेने शासन निर्णय निर्गमित करण्यात आला होता. तसेच दि. १२.०७.२०२४ रोजीच्या मा. मंत्रीमंडळाच्या बैठकीतील मान्यतेने दि. १२.०७.२०२४ रोजीच्या शासन निर्णयान्वये दूध भुकटी रूपांतरणास ही प्रती लीटर रू. १.५०/- इतके अनुदान देण्यास मान्यता देण्यात आली होती.

सद्यस्थितीत आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील दूध भुकटी व बटरचे दर हे कोसळलेले आहेत. परंतू, राज्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या दुधाला रास्त भाव मिळावा, या हेतूने सहकारी दूध संघ व खाजगी दूध प्रकल्पांनी दूध उत्पादक शेतकरी यांना किमान रू. २८/- प्रतिलिटर इतका खरेदी दर निश्चित करून राज्यातील दूध उत्पादक शेतक-यांना यापूर्वी शासन निर्णयानुसार दिल्या जाणाऱ्या रू. ५/- प्र.लि. दूध अनुदानामध्ये रू. २/- प्र.लि. वाढ करून रु. ७/- प्रतिलिटर इतके अनुदान दि. १ ऑक्टोबर, २०२४ पासून पुढे देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

अ) दूध योजना:-

१) राज्यातील सहकारी दूध संघ व खाजगी दूध प्रकल्पांमार्फत संकलित होणाऱ्या गाय दुधाकरीता दूध उत्पादक शेतकरी यांना प्रतिलिटर रू. ५/- इतके अनुदान देण्यात येत होते. त्यामध्ये दि. १ ऑक्टोबर, २०२४ पासून रू. २/- वाढ करून गाय दुधाकरीता दूध उत्पादक शेतकरी यांना प्रतिलिटर रू. ७/- इतके अनुदान देय करण्यात येत आहे.

२) सहकारी दूध संघ व खाजगी दूध प्रकल्पांनी दूध उत्पादक शेतकरी यांना ३.५ फॅट /८.५ एसएनएफ या गुणप्रतिकरीता किमान रू. २८/- प्रतिलिटर इतका दर (दि.१ ऑक्टोबर, २०२४ पासून पुढे) संबंधित दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या वैयक्तिक बँक खात्यावर रोख विरहीत पध्दतीने (ऑनलाईन) अदा करणे बंधनकारक राहील. तद्नंतर, शेतकऱ्यांना शासनामार्फत रू. ७/- प्रतिलिटर बँक खात्यांवर थेट वर्ग (डीबीटी) करण्यात येईल.

३) फॅट व एसएनएफ ३.५/८.५ या गुणप्रतिपेक्षा प्रति पॉईन्ट कमी होणाऱ्या फॅट व एसएनएफ करीता प्रत्येकी ३० पैसे वजावट करता येईल. तसेच प्रति पॉईन्ट ३० पैसे वाढ करण्यात यावी.

४) सदर योजनेच्या अंमलबजावणीकरीता संगणक प्रणालीद्वारे (सॉफ्टवेअर) अनुदान दूध उत्पादक शेतकरी यांच्या बँक खात्यावर डीबीटीद्वारे थेट वर्ग करण्यास मान्यता देण्यात येत आहे.

५) दूध (Dudh Anudan Yojana) योजना दि. १ आक्टोबर, २०२४ पासून राबविण्यास मान्यता देण्यात येत आहे. तथापि, प्रस्तुत योजनेचा आढावा घेऊन योजनेस पुढील कालावधीकरीता मुदतवाढ देणेबाबत शासन स्तरावरून निर्णय घेण्यात येईल.

६) शासन निर्णय दि. १२.७.२०२४ रोजीनुसार घोषित करण्यात आलेल्या दूध भुकटी निर्यातीस रु. ३०/- प्रतिकिलो प्रोत्साहनपर अनुदान व दूध भुकटी रूपांतरणास प्रतिलिटर रू. १.५० अनुदान दि. ३० सप्टेंबर, २०२४ पर्यंतच देय राहील. तद्नंतर सदर योजना बंद करण्यात येत आहे.

७) माहे जुलै, २०२४ मधील आकडेवारीनुसार सहकारी दूध संघ व खाजगी दूध प्रकल्पांमार्फत होणारे गायीचे दुध संकलन सुमारे १६० लक्ष लिटर प्रतिदिन इतके आहे. संदर्भ क्र.२ येथील योजनेतंर्गत मंजूर निधी विचारात घेऊन, प्रस्तुत प्रतिलिटर रू. ७/- अनुदानप्रमाणे अतिरीक्त सुमारे रू.८७९.२० कोटी इतक्या निधीस मंजूरी देण्यात येत आहे. तथापि, प्रत्यक्ष होणाऱ्या दूध संकलनातील घट वा वाढ यानुसार उपरोक्त रकमेत बदल होण्याची शक्यता आहे.

८) सदर योजनेतंर्गत कोणताही पात्र दूध उत्पादक शेतकरी अनुदानापासून वंचित राहू नये, यासाठी संगणक प्रणालीमध्ये दूध उत्पादक शेतकऱ्यांचा डाटा भरणाऱ्या सहकारी दूध संघ व खाजगी दूध प्रकल्पांना प्रोत्साहनपर प्रतिलिटर रू.०.०५ पैसे देण्यास आणि यापोटी रू. ६.८४ कोटी इतक्या खर्चास मान्यता देण्यात येत आहे.

९) वित्तीय भार वगळता योजनेच्या इतर बाबींमध्ये बदल करण्याचे अधिकार प्रशासनिक विभागास राहतील.

ब) दूध भुकटी रूपांतर योजनाः

शासन निर्णयान्वये घोषित दूध भुकटी रूपांतरणासाठी दि. १ जुलै, २०२४ ते दि. ३० सप्टेंबर, २०२४ पर्यंत प्रतिलिटर रू. १.५० अनुदान हे प्रतिदिन ६० लक्ष लिटर मर्यादेऐवजी प्रतिदिन ९० लक्ष लिटर मर्यादेपर्यंत रूपांतरीत होत असलेल्या दुधास लागू करण्यात येत आहे. त्यानुषंगाने, दूध भुकटी रूपांतरणासाठी रू. ७९.२० कोटी इतक्या अतिरीक्त निधीस मान्यता देण्यात येत आहे.

दूध भुकटी रूपांतरण योजनेच्या शासन निर्णयातील अटी व शर्ती कायम राहतील.

दूध अनुदान योजना राबविताना पुढील अटी व शर्ती:

१. या योजनेत सहभागी होण्यासाठी राज्यातील सहकारी दूध संघ व खाजगी दूध प्रकल्पांनी आयुक्त, दुग्धव्यवसाय विकास यांचेकडे अर्ज करणे बंधनकारक राहील.

२. डीबीटी करण्यासाठी दूध उत्पादक शेतकऱ्यांचे बँक खाते हे त्यांच्या आधार कार्डशी व पशुधनाच्या आधार कार्डशी (Ear Tag) संलग्न (लिंक) असणे आवश्यक असेल. त्याची पडताळणी संबंधित जिल्हा दुग्धविकास अधिकारी, सहाय्यक निबंधक सहकारी संस्था (दुग्ध), जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त यांच्या समितीमार्फत करण्यात यावी.

सर्वसाधारण अटी व शर्ती:-

१. उपरोक्त योजनेमध्ये सहभागी झालेल्या सहकारी दूध संघ व खाजगी दूध प्रकल्पांनी दूध खरेदीबाबतचे अभिलेख दररोज अद्ययावत ठेवणे व संबंधित जिल्हा दुग्धव्यवसाय विकास अधिकारी यांना देणे बंधनकारक राहील. त्याची प्रत आयुक्त, दुग्धविकास यांना सादर करण्यात यावी.

२. आयुक्त, दुग्ध विकास यांनी शहानिशा (Verification) करुन योजनेच्या अनुदानाची अंतिम अदायगी करण्यात यावी.

३. उपरोक्त योजनेची नियमितपणे तपासणी करण्यासाठी आयुक्त, दुग्धव्यवसाय विकास आवश्यकतेनुसार कार्यवाही करतील.

४. या योजनेमध्ये कोणत्याही सहकारी दूध संघ व खाजगी दूध प्रकल्पांमार्फत अनियमितता झाल्याचे आढळून आल्यास संबंधित संघांवर कायदेशिर कारवाई करून, अनुदानाची रक्कम व्याजासह वसूल करण्यात येईल. तसेच सदर संघ/प्रकल्प अनुदानास अपात्र ठरविले जातील.

५. सदर अनुदान परराज्यातून संकलित होणाऱ्या दुधास लागू राहणार नाही.

६. प्रस्तुत दूध (Dudh Anudan Yojana) अनुदान योजना केवळ राज्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांना लागू राहील.

७. योजनेत सहभागी होणाऱ्या शेतकऱ्यांकडील दुधाळ जनावरांची नोंदणी (EAR TAG) महाराष्ट्र राज्यात INAPH/भारत पशुधन पोर्टलवर असणे बंधनकारक राहिल.

८. शेतकऱ्यांचे आधार लिंक बँक खात्याची पशुधनाची INAPH / भारत पशुधन पोर्टलवर नोंदणी करण्यात यावी.

९. उपरोक्त अटी व शर्तीची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याची जबाबदारी आयुक्त, दुग्धव्यवसाय विकास यांची राहील.

शासन निर्णय – (Dudh Anudan Yojana GR):

राज्यातील सहकारी दूध संघ व खाजगी दूध प्रकल्प यांना दूध पुरवठा करणाऱ्या दूध उत्पादक शेतकऱ्यांना दुधासाठी प्रतिलिटर रू.7/- अनुदान देणेबाबत शासन निर्णय पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

पुढील लेख देखील वाचा!

  1. दुग्ध विकास प्रकल्प टप्पा-2 : या 19 जिल्ह्यांमध्ये गाई म्हशी गट वाटप साठी शासनाची नवीन योजना !
  2. राष्ट्रीय पशुधन अभियान (NLM) ; शेळी-मेंढी, कुक्कुट, वराह पालन व वैरण बियाणे उत्पादनाकरीता योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करा – National Livestock Mission
  3. ७५ टक्के अनुदानावर दुधाळ जनावरे गट वाटपाची योजना सुरु !
  4. पशु किसान क्रेडिट कार्डसाठी असा करा अर्ज !

वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.

आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी इथे क्लिक करा !!

शेअर करा:
WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Channel Join Now

One thought on “दूध अनुदान योजना : योजनेच्या अटी व शर्ती व सविस्तर माहिती पहा !

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.