शेतकऱ्यांच्या खात्यात ५ ऑक्टोबर २०२४ रोजी पीएम किसान योजनेचा १८ वा हप्ता जमा होणार !
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजने (PM Kisan Yojana 18th Installment) अंतर्गत शेतकऱ्यांना १८वा हप्ता (2000 रू) लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करण्याची कार्यवाही सुरू होणार आहे. PM-Kisan चा 18 वा हप्ता माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 5 ऑक्टोबर 2024 रोजी वाशिम, महाराष्ट्र येथून हस्तांतरित केला जाईल. याद्वारे 9.5 कोटी लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात ₹20,000 कोटींची रक्कम हस्तांतरित केली जाईल.
पीएम किसान योजना – PM Kisan Yojana 18th Installment:
प्रधानमंत्री किसान योजनेचे वर्षाला सहा हजार रुपये ज्या ज्या शेतकऱ्यांना येतात त्या सर्व शेतकऱ्यांनी आपली आधार eKYC केली आहे का? याची खात्री करावी लागणार आहे. पीएम किसान योजनेअंतर्गत हप्ते (PM Kisan Yojana 18th Installment) मिळवण्यासाठी लाभार्थ्यांना ई-केवायसी करणं अनिवार्य आहे, असे सूचित केले आहे.
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या नोंदणीकृत लाभार्थी शेतकऱ्यांसाठी PMKisan eKYC करणे अनिवार्य आहे, अशी नोटिफिकेशन प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या अधिकृत पोर्टलवर जारी केली आहे. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेची आधार आणि बायोमेट्रिक eKYC करण्यासाठी इथे क्लिक करा.
पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (PM Kisan Yojana) या योजनेअंतर्गत दिनांक ५ ऑक्टोबर २०२४ रोजी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे या योजनेतील पुढील १८व्या (PM Kisan Yojana 18th Installment) हप्त्याचे वितरण करणार आहेत. या कार्यक्रमादरम्यान पंतप्रधान लाभार्थी शेतकऱ्यांशी संवाद साधणार असून राष्ट्राला संबोधितही करणार आहेत.
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेबद्दल – PM Kisan Yojana:
पीएम-किसान योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी शेतकरी कुटुंबांना दरवर्षी 2000/- रुपये तीन समान मासिक हप्त्यांमध्ये म्हणजे एकूण 6000/-रूपये इतका निधी दिला जातो. हा निधी लाभार्थ्यांच्या बँक खात्यात थेट हस्तांतरित केला जातो.
पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेच्या लाभार्थ्यांच्या यादीमध्ये आपले नाव पहायचे असेल तर आपल्यासाठी सरकारने आता ही सुविधा ऑनलाईन देखील प्रदान केली आहे.
पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना २०२४ ची नवीन यादी अधिकृत संकेतस्थळ PMKisan वर तपासली जाऊ शकते. पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना २०२४ च्या नवीन यादीमध्ये आपले नाव ऑनलाईन तापसण्यासाठी इथे क्लिक करा.
तुमच्या खात्यात 2 हजार जमा झाले नसतील तर ‘अशी’ करा तक्रार:
सर्वात आधी आपल्या क्षेत्रातील लेखापाल आणि कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा लागेल आणि त्यांना त्याबद्दल माहिती द्यावी लागेल. जर हे लोक आपलं म्हणणं ऐकत नसतील, तर आपण त्यासंबंधित हेल्पलाइनवर देखील कॉल करू शकता.
तुम्ही सोमवार ते शुक्रवारच्या मध्ये पीएम किसान हेल्प डेस्कच्या PM KISAN Help Desk ई मेल (Email) pmkisan ict@gov.in वर संपर्क करू शकता.
इथेही काहीच प्रतिसाद न मिळाल्यास आपण 011 23381092 (Direct HelpLine) या हेल्पलाइन नंबरवरही संपर्क करू शकता. तुमच्या खात्यात 2 हजार जमा झाले नसतील तर ऑनलाईन तक्रार करण्यासाठी (Grievance PM Kisan) इथे क्लिक करा.
पुढील लेख देखील वाचा!
- PMKISAN नोंदणीकृत शेतकऱ्यांची OTP आधारित eKYC प्रोसेस घरबसल्या कशी करायची? जाणून घ्या सविस्तर माहिती (PMKisan OTP Based eKYC)
- प्रधानमंत्री किसान योजने संदर्भात तक्रार कशी आणि कुठे करावी? जाणून घ्या सविस्तर माहिती
- प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना खात्याचे किंवा २००० हप्त्याचे स्टेट्स ऑनलाईन चेक करा !
- प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेसाठी ऑनलाईन नोंदणी कशी करायची? जाणून घ्या सविस्तर माहिती !
- PMKisan अंतर्गत लाभार्थ्यांच्या नवीन यादीमध्ये आपले नाव ऑनलाईन तपासा!
- पीएम किसान योजनेच्या खात्याचा मोबाईल नंबर अपडेट करण्याची प्रोसेस !
वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.
आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी इथे क्लिक करा !!